Skip to main content

"तुमको भेजा नही" ह्या वाक्यावरून वाद

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 01/09/2008 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही. सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो. "भेजा" या शब्दावर वाद चालाला होता.पोस्टमन ही व्यक्ति नेहमी प्रमाणे लोकल मराठी माणूस,ज्याला भुमी पुत्र म्हणातात तसाच काहिसा प्रकार.

कांद्याची पातीची पातळ भाजी ?

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 01/09/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
घरात एकटा मी, रविवारचे दुपारचे १२ वाजत आलेले, कालच्या थोड्याश्या तापाने प्रकृति नरम-गरम, म्हणून बाहेर जाऊन काही खायची किंवा घरात काही कष्टपूर्वक काही मसालेदार करायची हिंमत नाही, तेंव्हा काहीतरी सोपं, पचायला हलकं असं करावं म्हणून भाज्या बघायला फ्रिज उघडलं...आत फक्त कांद्याची लुसलुशीत पात...म्हंटलं चला मुगाच्या डाळीचा तडका देऊन काही करता येतंय का पहावं.

प्रेमे नादली पंढरी..!

लेखक राघव यांनी सोमवार, 01/09/2008 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :) मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी, प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!
मी बालक अजाण मन सोडीना पदर! माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?
दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची! उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!
अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा! मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!
मुमुक्षू [टीपः अगोदरही याच नावने जालावर प्रसिद्ध केलेली आहे. किंचित बदल करून येथे प्रकाशित करतो आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

आदरणिय श्री. सखारामजी गटणे ह्यांचा जाहिर आणि तीव्र निषेध....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 01/09/2008 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणिय श्री. सखारामजी गटणे ह्यांनी 'ओळखा पाहू?' असा धागा टाकून समस्त मिपाकरांच्या डोक्याला भुंगा लावून आपण स्वतः मस्त मजा बघितली. काही बक्षिसही लावले. जवळ जवळ प्रत्येकाने डोके खाजवू खाजवू प्रतिसाद टाकले. त्यांच्या मनधरण्या केल्या की साहेब आता तरी बोला. एवढे झाल्यावर साहेब वदते झाले, काय तर नुस्तं चायनिज हाटेल आणि पुढे.... होय तेच ते मिपावरील सर्वात भितीदायक वाक्य.... क्रमशः.... ~X( ह्या कृत्याबद्दल आम्ही त्यांचा जाहिर आणि तीव्र निषेध करतो. कृपया आम्हाला ह्या निषेधात साथ द्या. :D बिपिन.

नकटीच्या लग्नाला...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 01/09/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.

नकटीच्या लग्नाला...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 01/09/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.

पठडीबाह्य/आवर्जून बघण्यासारखे चित्रपट

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 01/09/2008 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
[विजूभाऊंच्या पुस्तक चर्चे वरुन प्रेरणा घेऊन] आपल्याला आवडलेले वेगळे/ फारसे प्रसिद्ध नसलेले चित्रपटांबद्दल बोलण्यासाठीचा हा धागा विग्रजी चित्रपटांची फारशी जाणकारी नसल्याने त्याभाषेतील चांगल्या चित्रांची तोंडओळख झाली तर आनंद वाटेल .. हिंदीमध्ये सध्या बरेच भिकारपट येत असल्यामुळे त्याचा त्रागा काढण्यासाठी कृपया या धाग्याचा वापर करु नये ही विनंती :-)

भरलेली पापलेट

लेखक वृषाली यांनी सोमवार, 01/09/2008 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ मध्यम आकाराची पापलेट, १/२ नारळाचा चव, ३ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, १० लसूण पाकळ्या, थोडेसे आले,थोडासा पुदिना १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, १/२ लिंबाचा रस, १/२ वाटी तांद्ळाचे पीठ, तेल. कृती: पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी. वरूनही आड्व्या चिर्‍या द्याव्यात. नारळाचा चव ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी. हल्क्या हाताने पापलेट तांदुळ्याच्या पिठीत घोळ्वून फ्राय पॅन मध्ये तळुन घ्यावे.