Skip to main content

तुझे भुल जाना जाना...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारची संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. पण संधीप्रकाशाचा कुठेही मागमुस नव्हता. अगदी लख्ख उजेड होता. इकडे कॅलिफोर्नियामध्ये रात्रीचे नऊ वाजले तरीही उजेड असतो. आपल्याकडे असं नसतं ना. सहा साडे सहा झाले की अंधार पडायला सुरुवात होते. आणि सात वाजता तर अंधार होऊनच जातो. आपल्याकडेही जर इकडच्या प्रमाणे रात्री आठ वाजता दिवस मावळतीला जाऊ लागला तर... अरमानचं आताच साहीलशी जिमेलवर बोलुन झालं होतं. साहील त्याचा ओरकुटवरचा मित्र. कुठूनतरी "फ़्रेंड ऑफ फ़्रेंड" असं करत त्या दोघांची मैत्री जुळली होती. अर्थात आभासीच. इंग्रजीत सांगायचं तर व्हर्चुअल. जिमेलवर बोलताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

चारोळ्यांचा चखणा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 15/09/2008 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्यायला बसला पंपू, वर चारोळ्यांचा चखणा चारोळ्यांचा चखणा, मारतो काजूंचाही बोखणा काजूच्या बोखण्यातच मानली फ़ेणीची झींग झींग नकोच फ़ेणीची, मस्त होती कढी वीथ हींग सारी शब्दांची भेंडोळी, अन वृत्तांची खांडोळी कधी अर्थाची होळी, अपुरी यमकांची खेळी शोधून फ़सलेल्या ओळी अगम्य गम्याची जाळी टाकली आज संस्थळी आयतीच तयार चारोळी आधी होता कादंबरीकार त्याची लांबण खपेना लिहील्या लघुकथा चार तरी वाचक मिळेना पाडल्या कविता वजनदार त्याही फ़ुकटात विकेना केल्या चारोळ्या तय्यार लोक म्हणे एकोळ्या द्याना! डॉक्टर बघा ताप आला चांगले औषध द्या मला तुम्ही घेउ नका टेन्शन देतो तापाचे इन्जेक्शन काय राव
Taxonomy upgrade extras

कुणी बेभान म्हणतं मला...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही भुंगा जर
Taxonomy upgrade extras

किती सुंदर विचार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/09/2008 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.त्याना जरा बरं नव्हतं.मला म्हणाले, "तुमच्या सहवासात राहून मला पण काही विचारांची प्रेरणा येते." मी म्हणालो, "भाऊसाहेब,जे सुचतं ते निर्मिती होण्यासाठीच असतं.तुम्हाला जे सुचेल तेच मला सुचणार नाही.आणि हीच तर गम्मत आहे.निसर्गातच बघा,किती विवीधता आहे.एका सारखं दुसरं नाही.मी वाचलंय समुद्रात असंख्य जीवजंतू,वनस्पती आहेत की पुढली हजार वर्ष जरी माणसाने त्याची डेटाबेस करायची ठरवली तरी प्रयत्न पुरा होणार नाही.बरं ते राहूदे तुम्हाला काय सुचतं ते सांगा" मला म्हणाले, "निसर्गाकडून खूप काही शिकता येतं.दुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रे

अत्री जीव नाडी

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 14/09/2008 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी अंक २००८ साठी अत्री जीव नाडी विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९. नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.

हौशी चित्रकला - काही रंगचित्रे

लेखक विसुनाना यांनी रविवार, 14/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझी पत्नी सुवर्णा एक हौशी चित्रकार आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तिनं चित्रकलेचा एक लहानसा कोर्स केला होता. तेव्हापासून ती अधूनमधून चित्रे काढत असते. आमचं घर म्हणजे तिच्या चित्रांचं एक छोटं प्रदर्शनच आहे. ;) ती अधूनमधून मिपावरची चित्रे पहात असते. (शार्दूल कदमांची चित्रं पाहून ती थक्क झाली.) संगणक/ आंतरजाल/ मराठी कळदाबी यापासून ती दूर असल्याने तिच्यावतीने मी तिची चित्रे चिकटवत आहे. तिनं काही प्रख्यात चित्रकारांची चित्रं नकलली आहेत तर काही चित्रं लोककला स्वरूपाची आहेत. बघा, तुम्हाला कशी वाटतात - (मूळ चित्रकार - राजा रविवर्मा .

संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा साधारण १९८५ सालची. कथानायक माधव आणि नायिका रमा त्या काळाप्रमाणे चाळीतल्या दोन खोल्यात राहणारे तसे मध्यमवर्गीय सुखी जोडपे. रमा भविष्याविषयी काहीशी जागरूक तर माधव वर्तमानात रमणारा बराचसा बेफ़िकीर वृत्तीचा. विज्ञान कथा वाचन आणि भटकंती हे माधवचे छंद, तर असल्या छंदात पैसे उडवण्यापेक्षा बचत करून घर, जमीन-जुमला अशी स्थावर मालमत्ता वाढवायची असे रमाचे व्यवहारी विचार. असे असले तरी त्यांचे निदान अजून तरी खटके उडत नव्हते कारण त्यांच्या लग्नाला आता कुठे जेमतेम वर्षं पूर्ण होत आले होते. अशात एक दिवस माधवला त्यांच्या कारखान्यात वेतनवाढ होत असल्याची बातमी कळली.

मला कळलेला "अद्वैत सिद्धांत - ओळख "

लेखक मन यांनी रविवार, 14/09/2008 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता नाडा एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं. कुठलही एक टोक मागं सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती. पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एक्मेकाला ते खेचु लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली. खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले. त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात. सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु झाली. आणि यातच... यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली.

पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन http://www.loksatta.com/daily/20061111/mv04.htm प्रतिक्रियेसाठी संपर्क :- भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com