तात्या'ज झानटामाटिक ब्रेड, अर्थात फोडणीचा पाव! :)
मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
राम राम!
परवाच मिपावर झानटामाटिक ब्रेडची पाकृ एका मिपाकराने दिली होती. त्यातला 'झानटामाटिक' हा शब्द मला इतका प्रचंड आवडला होता की आपण स्वत:ही एकदा घरी ही झानटामाटिक ब्रेडची पाकृ करायची असं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आम्ही इथे सौताच्या हाताने केलेल्या झानटामाटिक ब्रेडची पाकृ व फोटू देत आहोत. आपल्याला तो फोटू आवडेल अशी आशा आहे! :)
पाकृ एकदम सोप्पी. ब्रेड चांगला कुस्करून घ्यायचा आणि नंतर फोडणी करून त्यावर छान परतून घ्यायचा. चवीप्रमाणे तिखट-मीठ घालायचं, चिमुटभर साखर घालायची! झाला तिच्यायला झानटामाटिक बिरेड तैय्यार! हाय काय अन् नाय काय!
मिसळपाव
२.
३.
४.
५.