Skip to main content

तात्या'ज झानटामाटिक ब्रेड, अर्थात फोडणीचा पाव! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 23/09/2008 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो, राम राम! परवाच मिपावर झानटामाटिक ब्रेडची पाकृ एका मिपाकराने दिली होती. त्यातला 'झानटामाटिक' हा शब्द मला इतका प्रचंड आवडला होता की आपण स्वत:ही एकदा घरी ही झानटामाटिक ब्रेडची पाकृ करायची असं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आम्ही इथे सौताच्या हाताने केलेल्या झानटामाटिक ब्रेडची पाकृ व फोटू देत आहोत. आपल्याला तो फोटू आवडेल अशी आशा आहे! :) पाकृ एकदम सोप्पी. ब्रेड चांगला कुस्करून घ्यायचा आणि नंतर फोडणी करून त्यावर छान परतून घ्यायचा. चवीप्रमाणे तिखट-मीठ घालायचं, चिमुटभर साखर घालायची! झाला तिच्यायला झानटामाटिक बिरेड तैय्यार! हाय काय अन् नाय काय!

..नातंच काही और असतं!

लेखक राघव यांनी मंगळवार, 23/09/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागे नागपूरला असतांना उन्हाळ्यात एकदा भर दुपारी अमरावतीला जाण्यासाठी प्रवास करावा लागला. मधे रस्त्यात एके ठिकाणी पळस फुलल्यामुळे लालेलाल झालेली झाडांची रांग लागली! इकडे कडक उन्हामुळे जीव हैराण झालेला होता. पाण्यालासुद्धा तहान लागावी अशी वेळ होती ती!! सगळ्या बाजूंनी धरणी साद घालतेय पावसासाठी असे वाटत होते. अन् त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडला वळवाचा.. जोरदार! त्या पावसानंतर इतके छान वाटले की वर्णन नाही करता येणार. त्यावेळेस स्फुरलेल्या ह्या काही ओळी.. नंतर कधी समर्पक अशी भर घालता आली नाही त्यात!
Taxonomy upgrade extras

मिपाकरांचा सल्ला हवाय! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 23/09/2008 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो, जरी हा काथ्याकूट विरंगुळा आणि मौजमजा ह्या सदरात घातला असला तरी तो सत्यघटनेवर आधारीत आहे! नुकतेच मला "अबक" नावाच्या व्यक्तिचे पोष्टकार्ड (व्य नि) आले आहे. त्यातला मजकूर साधारणत: असा आहे - "आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?" -- अबक. बापरे माझ्या! अहो मंडळी, हा तात्या गरीब आहे हो! पैशे आणणार कुठून? :) म्हणूनच मला आपल्यासारख्या मिपाकर हितचिंतकाचा सल्ला हवा आहे. काय उत्तर द्यावं आम्ही त्या 'अबक'ला?

आमचेही (देशी) गणगोत

लेखक सुनील यांनी मंगळवार, 23/09/2008 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा - मुक्तसुनीत यांचे http://www.misalpav.com/node/2920 "मने मने, अशी वेंधळ्यासारखी इकडे तिकडे काय बघतेस? ती बघ गावची चावडी. आणि तो जो माणूस उभा आहे ना, तो आहे गावचा सरपंच, तात्या अंमळ्नेरकर! " "काय म्हणालीस? त्याच्या हातातली काठी जनरल डायरच्या हंटरसारखी दिसते?" "अग, त्याच काय आहे - तात्यानं आता दुसरा घरोबा केलाय. तेव्हापासनं पहिलीच्या कडच्या काहीनी त्यांच्यावर डूख धरलाय. ते येतात कधी मधी त्याला त्रास द्यायला. त्यांना हाकलण्यासाठी ही काठी, बरे?" "तसा तात्या एकदम व्यवहारी हां.

टोमॅटोचे सार

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 23/09/2008 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! म्युन्स्टरमध्ये मिपा भ्रमणमंडळाच्या स्थापनेच्या वेळी टोमॅटोचे सार केले होते. त्याची पाककृती देत आहे. साहित्य : टोमॅटो ४ मध्यम आकाराचे कांदे २ मध्यम आकाराचे आले १ इंच लसुण पाकळ्या ४ ते ५ तिखट पाव चमचा नारळाचा चव अर्धी वाटी साखर आणि मीठ चवीनुसार फोडणीसाठी - तूप २ चमचे, जिरे, हिंग, कढीपत्त्यची ७-८ पाने, सुक्या मिर्च्या २-३ तुकडे, कोथिंबीर, ३-४ लवंगा, ३-४ काळी मिरी, दालचिनी लहानसा तुकडा, २ वेलदोडे कृती : टोमॅटो, कांदे यांच्या मोठ्या फोडी करुन उकडाव्यात.

ओंजळ (रान)फुलांची...

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 23/09/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांची फुले बघुन, आमची फुल ना (रान) फुलाची पाकळी.... १. २. ३. ४. ५.

नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 22/09/2008 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते.

`सकाळ मुक्तपीठ' मध्ये लिहा...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 22/09/2008 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, "सकाळ'ची "मुक्तपीठ' पुरवणी वाचता ना? आता या पुरवणीचं स्वरूप आम्ही थोडं बदललं आहे. काही नवी सदरं आहेत, ज्यात सर्वांनाच लिहायची संधी मिळेल. आपले अनुभव सांगता येतील. स्वतच्या ब्लॉगची चक्क जाहिरात करता येईल.