Skip to main content

शेव

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 03/10/2008 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात सोपी आणि झटकन होणारी म्हणजे शेव्....तसेच पटकन खाऊन संपणारी..:) साहित्यः १ वाटी तेल १ वाटी पाणी अंदाजे ४ वाट्या बेसन (हरभरा डाळीचे पीठ) शक्यतो ताजे आणि बारीक तिखट,मीठ, हळद ओव्याची पूड कृती: १. तेल आणि पाणी एकत्र करून फेटावे, हँड ब्लेंडर चा उपयोग करावा. पांढरे होईपर्यंत फेटावे. २.त्या तेलात १ च.ओवापूड, मीठ, ४ च.तिखट, पाव हळद घालावी व त्यात मावेल तेवढे बेसन घालावे व पिठ भिजवावे जास्त घट्ट नको. ३.पसरट कढईत तेल गरम करावे. शेवपात्रात वरील पीठ घालुन डायरेक्ट कढईतच शेवेचा चवंगा पाडावा.

पाकातले चिरोटे

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 03/10/2008 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
पाकातले चिरोटे साहित्यः २ वाट्या मैदा. पाव चमचा मीठ ४ टे.स्पून कडकडीत तेल २ टे.स्पून डालडा तळण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेल पाकासाठी २ वाट्या साखर केशर / केशरी रंग (ऐच्छिक) कृती: १.मैदा चाळून मीठ व तेलाचे मोहन घालून मऊ भिजवावा. भिजवताना १टे.स्पून दही घालावे. २.परातीत डालडा घेऊन हलके होईपर्यंत फेटावे, पांढरेशुभ्र झाले कि कोमट करावे. ३.मैद्याचे १० गोळे करून, तांदुळाची पिठी वापरून त्याच्या पोळ्या कराव्यात. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवाव्यात. ४.मैद्याची एक पोळी घेऊन त्यावर फेटलेला डालडा कडेपर्यंत हाताने लावावा.त्यावर दुसरी पोळी ठेऊन त्यावर डालडा लावावा. असे पाच पोळ्यांवर लावावे.

अनारसे

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 03/10/2008 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी म्हटली कि फराळाची तयारी अगोदर पासूनच सुरु होते. भाजाणीच्या पिठापासून ते अनारशाच्या पिठापर्यंत. माझी आई अनारशाचे पिठ घरीच तयार करत असे. तिची रेसिपे इथे देत आहे. साहित्यः १ किलो जाडा, जुना तांदुळ १ किलो पिवळा गुळ कोल्हापुरी वेलदोडा, जायफळ पावडर २ टे.स्पून साजुक तूप पाव किलो खसखस कृती: १. तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत, पाणी दररोज बदलावे. २.पाणी निथळून, कॉटनच्या कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पिठ चाळावे. ३.गुळ किसणीने किसावा किंवा बारीक करावा. वरील चाळलेल्या पिठात मिसळावा.

माझे सत्याचे प्रयोग

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 02/10/2008 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती.

कविता म्हणजे रे काय?........ भाऊ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/10/2008 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
कविता म्हणजे काय? असा प्रश्न खूप लोक विचारतात.माझा विचार मी थोडक्यात देतो.कवितेला प्रतिक्रिया देणं ही एक चांगली गोष्ट आहे."मला ही कविता आवडली किंवा मला आवडली नाही" अशी प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. कधी कधी काही वाचक कविता लिहायलाच सुचवतात किंवा एखादी कविता वाचून झाल्यावर उपदेश पण करतात.

अरे `देवा'!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 02/10/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस म्हणजे बुद्धीत वाढ आणि आयुष्यातील कालावधीत घट होण्याचा दिवस, असं म्हणतात. काही जण मात्र त्याला अपवाद असतात. ते स्वतःला चिरतरुण म्हणवून घेतात आणि म्हातारपणी पोरकटपणा करायला मोकळे होतात. त्यामुळं त्यांचे वाढदिवस जवळ आले, की छातीत धस्स होतं. अंगाला दरदरून घाम फुटतो आणि घशाला कोरड पडते. पुन्हा कुठला तरी नवा संकल्प जाहीर करून आपल्या माथी मारणार की काय, असा झोप उडवणारा प्रश्‍न सतावू लागतो. यंदाही असंच झालं...एव्हरग्रीन, चिरतरुण, चॉकलेट हीरो म्हणवणाऱ्या आणि अवघे 85 वयोमान असलेल्या एकेकाळच्या समस्त चित्रपटरसिकहृदयसम्राटाचा वाढदिवस होता.

भारताच्या सद्यस्थितीवरील ही मतचाचणी तुम्हाला कितपत पटते?

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 02/10/2008 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
NDTV च्या साईट वरील २ ऑक्टोबर निमित्त घेतलेल्या मतचाचणी हे निष्कर्ष पहा, फक्त 'लोकशाही' आणि 'आंतरराष्ट्रीय नीती (पॉलिसी?)' या दोनच आघाड्यांवर देश सध्या समाधानकारक स्थितीत आहे असं बहुतांश लोकांना वाटतं असं दिसतंय, आणि तुम्हाला ते निष्कर्ष कितपत पटतात ते सांगा. (मला स्वतःला या प्रश्नांत 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' यांचाही समावेश आवश्यक वाटला असता, आणि त्या क्षेत्रातील प्रगतीविषयी सामान्यांची मतं जाणून घ्यायला आवडलं असतं, इथल्या तज्ञांचीही मतं जाणून घ्यायला आवडेल.)

काळ थांबला कधीचा...

लेखक राघव यांनी गुरुवार, 02/10/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

पाककृती

लेखक अनिल हटेला यांनी गुरुवार, 02/10/2008 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! बरेच दिवस झाले विचार करत होतो की , आवडणारा खाद्य प्रकार तुम्हा सर्वा सोबत शेयर करावा !!! आणी आज आम्ही कॄती करत आहेत !!!!(आळशीपणाची हद्द म्हणा ,हव तर !!) चायना मध्ये आल्या पासुन तीन चार प्रांतातील चायनीज खाण्याचा योग आला !! साधारणपणे आपल्या ला न जमणारे हे प्रकार आहेत !! पण सिचुअन पद्धतीच फूड आपल्याला खास करून आवडते !! वर छायाचित्रात दिलेले आहे ते माझ सर्वात आवडत डीश !!! १) सुजीतो :: म्हणजे एक प्रकारची शेंग (नेमक नाव आपल्याला माहिती नाहीये .....) आधी अर्धवट शिजवून मग मस्त फ्राय केलेल