Skip to main content

कुणाची गं तू?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 13/10/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती. मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले. "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे.

रोज गार्डन - चंदिगड

लेखक मिंटी यांनी सोमवार, 13/10/2008 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर २००७ ला चंदिगड बघण्याचा योग आला होता...चंदिगड म्हणजे अतिशय सुरेख आणि व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे वगैरे ऐकुन होते पण जे ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे चंदिगड....अतिशय व्यवस्थित बांधकाम, स्वच्छ रस्ते आणि शिस्त.. चंदिगड मधे बघण्यासारख्या खुप गोष्टी आहेत.त्यातलंच विशेष म्हणजे तिथलं रोज गार्डन.चंदिगडच्या रोज गार्डनमधे तब्बल १६०० प्रकारचे गुलाब बघायला मिळतात.अनेक रंगी गुलाबाची फुलं मनाला प्रसन्नता देतात.त्यातल्याच काही प्रकारांच्या फुलांचे फोटो इथे टाकत आहे.उर्वरीत गुलाबांचे आणि चंदिगडच्या प्रसिध्द रॉक गार्डनचे फोटो नंतर टाकेन...

दिवाळखोरी कडे वाटचाल.............................?

लेखक वेताळ यांनी सोमवार, 13/10/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल जे आर्थिक संकट सर्व जगावर कोसळले आहे,त्यामुळे जगातील खुप देश आर्थिक दिवाळखोरी कडे झपाट्याने जात आहेत.जगातील नामंवत वित्तिय संस्था,विमा कंपन्या आपल्या दिवाळखोरया जाहिर करत असताना भारत ह्याला कसा अपवाद ठरेल? गेल्या काही महिन्यात आपल्या सरकारने जाहिर केलेल्या सवलती,सबसीडीज ह्यामुळे आपले सरकार पण संकटात येण्याची शक्यता आहे. शेतकरयाची कर्जमाफी,सहावा वेतन आयोग ,प्रेट्रोल-डिझेल वरील सबसिडी ह्यामुळे आपले सरकार नजिक च्या काळात नक्कीच संकटात येणार. आपली विमा कंपनी देखिल मार्केट मध्ये खुप अडकली आहे. कॄपया आपण आपले मत इथे मांडा. वेताळ

(कोलाज)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 13/10/2008 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
वेदाताईंचं 'कोलाज' वाचून आणखी एक कोलाज मनात उभं न रहातं तरच नवल! B) एकेक शब्द एकेक ओळ एकेक कडवं जोडतेय... अनंतकाळ... कविता नाही निदान मुक्तक तरी....? *** थोडा बेभान विचार थोडा उधाण आचार थोडा रिमझिम सदाचार थोडी काजळकाळी टीका थोडे श्रावण सुखद प्रतिसाद आणि थोडेसे शब्द... बदललेले... विडंबन पूर्ण...! चतुरंग
Taxonomy upgrade extras

सुवर्णनगरी...चित्र सफर!!!

लेखक दिनेश यांनी सोमवार, 13/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
राजा चार्ल्स -४..ओल्ड टाउन स्क्वेअर मधील भव्य पुतळा: कम्युनिझम असतानाही ह्या पुतळ्याचे पावित्र्य राखले गेले हे विशेषच म्हणायला हवे. घड्याळ असलेल्या चर्चचे मागील प्रवेशद्वार.

सज्जनगड

लेखक डोमकावळा यांनी रविवार, 12/10/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, गेल्या महिन्याच्या १३ तारखेला सज्जनगड येथे गेलो होतो. तेथील काही माहिती व प्रकाशचित्रे इथे टाकत आहे. सातार्‍यापासून साधारण १८-२० किमी अंतरावर सज्जनगड आहे. सज्जनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून जिंकला. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी या गडावर वास्तव्याला आल्यानंतर 'सज्जनगड' हे नाव दिले. समर्थांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी समाधी मंदीर व त्यावर श्रीराम मंदीर बांधले. श्रीराम मंदीरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतींच्या मूर्ती या पंचधातूच्या असून त्या तंजावर (तमिळनाडू) येथुन आणल्या आहेत.

संगीतातला माझा सहकारी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/10/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं." "मला वाटतं मी मनुष्याच्या अंगातल्या अगणीत स्वभावगुणधर्मावर जास्त केंद्रीत असतो." "असं का तू म्हणतोस?" असं मी मला संगीतात मदत करणाऱ्या सहकाऱ्याला विचारल्यावर तो मला म्हणाला, "मी देशाच्या तिन निरनीराळ्या प्रांततल्या रीतिरिवाजात वाढलो आहे.हे माझ्या म्हणण्याचं कारण आहे.माझे आईवडिल कलकत्याचे,मी गुजराथ मधे जन्मलो,आणि महाराष्ट्रात, मुंबई मधे वाढलो. मी ज्यावेळी तरूण होतो,त्यावेळी हे सगळं मला जरा गोंधळात टाकायचं.प्रत्येक प्रांतातले लोक त्यांचे रीतिरिवाज उच्च

पंथी हू मै, उस पथ का...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 12/10/2008 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
तो गायक होता, तो गवई होता, तो रंगिला होता, तो रसिला होता, तो दर्दभरा होता, तो गोड होता, तो कमालीचा सुरेल होता, तो लयदार होता, तो पेचदार होता, तो अष्टपैलू होता, तो अवलिया होता, तो एकमेवाद्वितीय होता, तो जिनियस होता...! हम जवान थे उन दिनोंकी बात है! माझ्या महाविद्यालयीन आयुष्याचे ते दिवस होते. वर्ष १९८७. असेन बहुधा तेव्हा एफ वाय किंवा एस वाय बी कॉमच्या वर्षाला. केट्या नेहमीच पडत त्यामुळे नक्की कितवीत होतो ते आता आठवत नाही! :) सुरांची आवड अगदी लहानपणापसून.. गाणं ऐकत होतो, मधुकरवृत्तीने टिपत होतो, कुणा भल्या गुणिजन मंडळींच्या पायाशी बसून कधी कधी शिकतही होतो.