Skip to main content

जेट नावाचा हिमनग

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/10/2008 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जेटची कर्मचारी कपात हा सध्या ज्वलंत विषय झाला आहे. अगदी सनसनाटी. जेट - किंगफिशर एकीकरण प्रस्तावापेक्षाही गाजलेला विषय. जेटने माणसे काढली. गाजावाजा झाला. माणसे परत घेतली. संपले. पण हे इतके वरवरचे आणि सहज नाही. मल्ल्या- गोयल भेट. व्यायसायिक साहचर्याची चर्चा. लगोलग जेटने कामगार कपात केली. काही तासातच माध्यमांना माहिती मिळाली. अल्पावधीतच बहुसंख्य नोकरी गेलेले अमराठी असतानाही राज ठाकरे यांना साकडे घालतात; मुळात त्यांना राजचा ठावठिकाणा लगेच मिळतो. ते आपल्या संघटनेला जाब न विचारता थेट मनसे कार्यालय गाठतात. एकुण बरेचसे न पटण्यासारखे दिसत आहे.

जाहीर निमंत्रण - दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 17/10/2008 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांस जाहीर कळवण्यात येते की आमचे येथे श्रीकृपेकरून दिनांक ८ नोव्हेंबर २००८ रोजी दक्षिण कॅलिफोर्नियाचा मिपा कट्टा करण्याचे योजिले आहे.... कट्टा श्री. डांबिसकाका यांचे घरी करण्याचे घाटत आहे.... डांबिसकाकांतर्फे या कट्ट्यासाठी मिसळपाव (अर्थातच!!) पुरवला जाईल.... प्राण्यांची प्रेते खाणार्‍यांसाठी काहीतरी कोंबडं/ बकरं मारलं जाईल.... उपलब्धतेनुसार मासळीही आणायची योजना आहे.... येणार्‍यांपैकी कुणी फक्त गवत खाणारे असल्यास (आणि त्याची आगावू सूचना दिल्यास!!) त्यांचीही उत्त्तम सोय केली जाईल!

ओल्या नारळाच्या करंज्या

लेखक चकली यांनी शुक्रवार, 17/10/2008 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या सर्व मि. पा. करांना शुभेच्छा! ह्या करंज्या लगेच फ़न्ना कराव्यात. त्यातच गम्मत आहे !

नवजात मुलाबद्दलच्या आईच्या अपेक्षा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/10/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज नंदा पेठे आणि तिची मैत्रीण कविता भिडे दोघी तळ्यावर फिरायला आलेल्या दिसल्या.मला पाहिल्यावर नंदा म्हणाली की, " भाऊसाहेबांना आज बरं नसल्याने ते येऊ शकणार नाहित." तसा त्यानी तिच्या जवळ मला निरोप दिला होता. नंदा ही प्रो.देसायांची मधली मुलगी.कविता एका कम्युनीकेशन सेंटरवर काम करते.माझी तिच्याशी ओळख करून दिल्यावर नंदा मला म्हणाली, "कविताला एक लहान मुलगा आहे.ती त्याला आपल्या सासूकडे ठेऊन आली आहे.सहज पाय मोकळे करायला आम्ही तळ्यावर आलो.तुमच्या विषयी हिला भाऊसाहेब नेहमीच सांगत असतात.प्रत्यक्षच तुम्ही दिसला तेव्हा मी तिला म्हणाले मी तुमची ओळख करून देते." मी नंदाला म्हणालो, " तुम्ही दोघं तावातावाने का

दु:खद निधन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 17/10/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ स॑गीत-स॑योजक व अव्वल दर्जाचे हार्मोनियमवादक 'श्यामराव का॑बळे' या॑चे आज दुपारी पाच वाजता डो॑बिवली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते त्र्याऐ॑शी वर्षा॑चे होते. प्रसिद्धीपासून सतत दूर राहील्यामुळे आपल्यातल्या कितीतरी जणा॑ना श्यामराव माहीत नसतील पण त्या॑नी वाजविलेल्या हार्मोनियमच्या तुकड्या॑नी वेड लावले नाही असा स॑गीत-रसिक विरळाच. वानगीदाखलः 'बाई मी विकत घेतला श्याम' (जगाच्या पाठीवर- सुधीर फडके) ह्या गाण्यातली बेफाट हार्मोनियम!

चिकन शाकुती (मराठीत सागुती) Xaukuti

लेखक ललिता यांनी शुक्रवार, 17/10/2008 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याला पोर्तुगीजांच्या प्रभावामुळे शाकुती लॅटिनमध्ये 'X'ने लिहितात. काही बड्या पंचतारांकित हॉटेलात ही डिश Xaukuti नावाने मेन्युकार्डात मिरवताना पाहिली आहे, मागवली नाही... कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत. :''( तुमचा काय अनुभव? ही पाकृ. ओरिजिनल गोव्याची आहे असा माझा दावा आहे....

सचिनचे अभिनंदन !!

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 17/10/2008 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनचे अभिनंदन !! कसोटी क्रिकेट मधे सर्वाधीक धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिनने आज आपल्या नावावर केला आहे. मोहालीत आज आपल्या १५२ व्या कसोटी सामन्यात खेळताना सचिनने सर्वोच्च धावसंख्या केली . यावेळी प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असणे ही पण एक विशेष गोष्ट. सचिनचे अभिनंदन तसेच या कसोटीत शतक झळकवण्यासाठी त्याला शुभेच्छा !!

ती येण्याची चाहूल लागली

लेखक धुमधडाका यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
थवे फ़ुलले पक्ष्यांची शाळा भरली संध्याकाळ बासरीने गुणगुणली मला ती येण्याची चाहूल लागली पाणी बेभान थिरकले डोंगर संधीप्रकाशाने उजळले दिवसाची घालमेल थबकली मला ती येण्याची चाहूल लागली सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली अंबरात सांज ऊतू गेली पायवाटांत ओढ भिरभिरली मला ती येण्याची चाहूल लागली मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले डोळे संध्येच्या पंखांनी झाकले अरुणाने रात्रीला हाक दिली . मला ती येण्याची चाहूल लागली !!!! मला ती येण्याची चाहूल लागली !!!! ---हे वाचलेलं आवडलं अशी जर खरचं आली तर स्वागत करीन धुमधडाक्यात
Taxonomy upgrade extras

सेन्सेक्स १०,००० च्या खाली

लेखक सागर यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सेन्सेक्स १०,००० च्या खाली शेवटी ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले. सेन्सेक्स आज बंद कदाचित १०,००० च्या वर होईलही. पण आज सेन्सेक्स ने १०,००० च्या खाली बुडी मारली .आत्त्ता मी पाहीले तेव्हा सेन्सेक्स (९९४१) वर होता. काल जगात सगळीकडेच शेअरबाजारांनी दाखवलेली निराशा आपल्या बाजाराने दाखवली नाही तर नवलच. गुंतवणुकदारांनी काय करावे? हा खूप मोठा प्रश्न पडला असेन. मागच्या आठवड्यातच मी म्हटले होते की सेन्सेक्स १०,००० च्या खाली येण्याचे स्पष्ट संकेत असतानाही सेन्सेक्स लगेच ह्या मर्यादेच्या खाली जाणार नाही.

नाट्यसंगीत

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
किती सांगुं तुला..... गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर स्वर-बालगंधर्व नाटक-संगीत सौभद्र (१८८२) राग-आनंद भैरवी (मूळ संहिता) ताल-धुमाळी मिपाच्या या धोरणानुसार लेखन संपादित केले आहे... आणिबाणीचा शासनकर्ता.
Taxonomy upgrade extras