Skip to main content

कबिनीकाठचे हती

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 28/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
कारापुर हे कर्नाटकातील एक छोटेसे खेडे. बंगलोर पासून २२० किमी तर म्हैसूर पासून ८० किमी अंतरावरचे हे छोटेसे गाव नागरहोळ्ळे अभयारण्याच्या दक्षिण पूर्वेस वसलेले आहे. इथे एका खाजगी विश्रामगृहात एक दिवस मुक्काम करून आम्ही पुढे मडिकेरीला जाणार होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर सुमारे २० किमी सामसूम भागातून प्रवास केल्यावर आम्ही मुक्कामावर पोचलो. खरेतर आमचा १० जणांचा चमू होता. आम्ही बंगलोरहून म्हैसूर व तिथुन कूर्गला जाणार होतो, पण मेव्हण्याच्या एका मित्राने आम्हाला कबिनी विषयी आग्रहाने सांगितले. वास्तविक अशा ठिकाणी जायचे म्हणजे मला पर्वणी!

..

लेखक प्रियाली यांनी मंगळवार, 28/10/2008 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
..

अवघा रंग एक झाला....

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :) 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..' रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..! रघुनंदन पणशीकर.. 'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द!

विचारचक्र

लेखक सहज यांनी मंगळवार, 28/10/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्याची गोष्ट. आता दिवाळी, खरेदी, आवराआवर, गाठीभेटी अश्या वातावरणात घडू नये अशी एखादी तरी घटना घडतेच. व ती घडली. ओळखीच्या एका व्यक्तिचा अपघात. ही व्यक्ती खूप जवळची अशी नाही पण जे घडले ते काही डोक्यातुन जात नाही. म्हणुन इथे उतरवण्याचा खटाटोप. ही व्यक्ती तरुण. नुकतेच ३ महीन्यापुर्वी लग्न झालेले. पेशाने डॉक्टर. अपघात झाला, दोन्ही पाय गेले. अपघात झाला तरी कसा? समोरुन रेल्वे येतीय हे दिसतेय तरी रुळ ओलांडून जायची घाई. असे अनेकदा केले असणार आयुष्यात. नेमकी वेळ यायची होती. झालं पाय अडखळून पडला; वेळेत उठू शकला नाही.

पयला पयला प्यार

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 28/10/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते. मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस. 'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं मी सुसाटलो ९३२२ १७ ३३ १४ सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू. 'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.' सूर्‍या आला 'क रं बाला क बोल्तोस? 'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.' 'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा.

स्ट्रॉबेरी जेली

लेखक वल्लरी यांनी मंगळवार, 28/10/2008 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : जिलेटिन 25 ग्रॅ. स्ट्रॉबेरी (साल काढलेली) दूध 1 कप, पिठीसाखर 50 ग्रॅ. व्हेनिला आइसक्रीम 200 ग्रॅ. घट्ट क्रीम 1/2 कप 4 स्ट्रॉबेरी सजविण्यासाठी. कृती : कोमट पाण्यात जिलेटिनला थोडावेळ ठेवावे (१०-१५ मिनिटे). स्ट्रॉबेरी, दूध, साखर,क्रीम आणि आइसक्रीमला मिक्सरमधून काढून घ्यावे. जिलेटीनला मंद आचेवर शिजवून घ्यावे. जेव्हा हे पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हा मिल्कशेकच्या मिश्रणात जिलेटीन टाकून मिक्सरमधून काढावे. तयार मिश्रणाला ग्लासमध्ये टाकावे व फ्रीज मध्ये 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवावे. वरून स्ट्रॉबेरीने सजवून सर्व्ह करावे.

लक्ष्मीपूजन

लेखक सनातन यांनी मंगळवार, 28/10/2008 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आश्‍विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया. १.

येथे रोकडा भेटेल..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी, कसं वाटतंय मिपाचं मुखपृष्ठ? साला, इतर कुठल्या संस्थळाचं मुखपृष्ठ इतकं श्रीमंत आहे काय? हज्जार रुपिया अने काजू मिठाई, अने सुको मेवो! :) सू बोले छे? :) असो, हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना...! :) मिपा व्यवस्थापनाकडून सर्वांना एक हजार सहाशे पंचाऐशी रुपये सप्रेम भेट! कृपया स्वीकार करावा! :) आपला, (पैसेवाला) तात्या.

`ब्लॉग माझा' विजेत्यांची यादी!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
`स्टार माझा'नं अखेर वेबसाइटवर `ब्लॉग माझा'चा अधिक्रुत निकाल जाहीर केला आहे. एकदा शूटिंग रद्द झालं, आता बघू! या विषयावरची आधीची चर्चा : http://www.misalpav.com/node/3984

आठवण

लेखक अभिज्ञ यांनी सोमवार, 27/10/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव करांच्या स्मृती प्रमाणे तात्या उर्फ विसोबा खेचर ह्यांनी ह्या दिवाळित रौशनी चे पुढील भाग द्यावयाचे कबूल केले होते. तरि संबधितांना त्याची आठवण करून द्यावी म्हणून हा खटाटोप. :)