Skip to main content

धुकं.. फोटोज!

लेखक राघव यांनी रविवार, 02/11/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
केरळच्या छोटेखानी ट्रीपवर गेलेलो असताना केरळ बॉर्डर वर नाक्यावर एक-दीड तास थांबवे लागले होते.

आजच्या म. टा. मधील एक अस्वस्थ करणारे हे पत्र

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 02/11/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म. टा. मधील संवाद पुरवणीतल्या 'माझेही मत' मध्ये प्रसिद्ध झालेले हे पत्र म. टा. च्या संकेतस्थळावर मी नोंदविलेली ही प्रतिक्रिया मा. संपादक, आजच्या म. टा. संवादमधील ’माझेही मत’ या सदरात श्री. विजय दांडेकर यांनी लिहिलेल्या पत्रातून एकुण असा सूर असल्याचे जाणवले की स्वा. सावरकर यांनी बोटीतुन समुद्रात उडी मारलीच नव्हती. या साठी श्री. दांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक व स्व्तातंत्र्यसंग्रामाचे अभ्यासक कै. डॉ. य. दि. फडके यांचा दाखला दिला आहे. या संबंधी मला असलेल्या दोन शंका १) दांडेकरसाहेबांनी ह प्रश्न डॉ.

कोणी माहीती देता का माहीती ?

लेखक सातारकर यांनी रविवार, 02/11/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
Wikipedia वरील स्वातंत्र्यसैनिकांवरील माहीतीची वानवा Wikipedia वरच Bombay च Mumbai करताना माझ्या लक्षात अजून एक गोष्ट आली की तिकडे स्वातंत्र्यसैनिकांवरील माहीतीची अगदीच वानवा आहे. सावरकर, टिळक अशी माणसं सोडली तर बाकी आनंदच आहे. चाफेकर बंधू, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती एक पानदेखील अस्तित्वात नाही. जिथे आहे त्याची अवस्था अशी आहे..

पतंग

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 02/11/2008 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
लाल निळा शेपूटवाला पतंग उडवू चला चला
खाऊचे पैसे देऊन रीळ आणले वाण्याकडून केला मांजा काचा कुटून हात काचले घोटून घोटून
...........
दादाने मग ताव कापला कमच्या बांधुन पतंग केला झिरमिळी शेपट्या बांधल्या मैदानावर जाउ चला
लाल निळा शेपूटवाला पतंग उडवू चला चला ...........
ताणुन दोरी उंच फ़ेकला सरसर भरभर हवेत चढला गिरक्या घेता नाच नाचला पक्षासंगे मजेत फ़िरला
.............
आणा खाली ढील सोडुनी घ्या बाजुला हिसका देऊनी चढवा दुसऱ्या मांजाखालुनी वळसे घाला गोल फ़िरवु
Taxonomy upgrade extras

लक्ष्मी-नारायण

लेखक निमीत्त मात्र यांनी रविवार, 02/11/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गामधल्या "बाल-कवी' मार्गावरील "मुक्तांगण' प्रासादातील "फुलराणी' दालनात पु. ल. देशपांडे बसले होते. त्यांच्यासमोर वाजवायची पेटी होती. शेजारी तबलजी बनून वसंतराव देशपांडे बसले होते. पु. ल. तल्लीन होऊन गात होते.. "उगीच का कांताऽऽ' आणि पेटीवरून विविध प्रकारची स्वरांची नक्षी काढत आपल्याच गाण्याला साथ करीत होते... एक कडवे झाले की तबला वाजवता वाजवता वसंतराव पुढचे दुसरे कडवे गात होते. दोन देशपांड्यांची मैफल आता अगदी ऐन रंगात आली होती. .. दारात कुणाची तरी पावले वाजली. "कोण आहे?' पु. ल. "मी आहे.' ती "पण "मी' कोण? नाव, गाव, काही आहे की नाही?' "नाही ना!' "असं कसं होईल?

गुरुपूजन!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 01/11/2008 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅन्टीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला. हॉलमध्ये टाळ्या वाजतच होत्या, आणि स्टेजवर राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून तो बराच वेळ तसाच बसला होता... महाराजला हेच दृश्‍य अपेक्षित होतं. काही वेळानं टाळ्या थांबल्या. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये केवळ शांतता पसरली होती. ...

इयत्ता ८वी - पत्रलेखन

लेखक टारझन यांनी शनिवार, 01/11/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : णमस्कार लोक्स, पुन्हा नेहमी प्रमाणे शनिवार संध्याकाळचा एक कंटाळवाणा टाईम आला. अशा वेळेस काहीही सुचत नाही. पण काही दिवसांपुर्वी आपल्या शाळेतले दिवस आठवले, आणि पुन्हा 'ते'दिवस आणि 'हे' दिवस सुरू झाले. आठवलं आपलं आयुष्य (माफ करा, लै मोठा शब्द आहे पण आता आर्ध संपलं त्यामुळे संदर्भापुरता वापरायला हरकत नाही) कसं बदलंत गेलं ? विचारचक्र उलटे फिरायला लागतात, मग आठवतात, .............. * जॉब लागण्यापुर्वीचे दिवस ,त्यावेळी रेझ्युमे बनवने, टेक्निकल , ऍप्टिट्युड प्रिपेयर करणे, इंटरव्युची तयारी करणे हे अजुन ताजंच असतं, आणि जोवर कमवू जॉब चेंज करू तोवर चालत रहाणार.

रम्य एका सकाळी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 01/11/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक काल्पनिक कविता.... रम्य एका सकाळी तु वेचित होतीस बकुळी अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी तुला पाहुन मावळणारा चंद्र जरा थबकला ढगांच्या गावाक्षातुन हळु हळु डोकावू लागला जेव्हा तुझी चाहुल लागली रवीराजांची तर झोपच उडाली धुक्याचा पडदा बाजुला सारुन स्वारी लगेच बघु लागली तुझ्या गुलाबी गालांना बघुन भुंगा सुद्धा फसला गुलाब समजुन गालांना क्षणभर विसावला तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................
Taxonomy upgrade extras

बार-ऍट-लॉ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 01/11/2008 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती. सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही. "अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीतराहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली." मी त्याना म्हाणालो, "तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?" "तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १

लेखक कपिल काळे यांनी शनिवार, 01/11/2008 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही. पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा.