Skip to main content

सेवाभावी (भाग १)

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/11/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता. आता गावालाही या तरण्या पोरांकडून चांगल्या अपेक्षा होत्या.

अमेरिकेत सारे कांही शक्य आहे ?

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 05/11/2008 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी अमेरिकेत आलो तेंव्हा इथे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पण अमेरिकेत भ्रमण करतांना रस्त्यात कोठेही मोठी छायाचित्रे असलेले अवाढव्य फलक दिसले नाहीत की कोठेही ध्वनीवर्धकांचा कर्कश गोंगाट ऐकू आला नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमधल्या मोठ्या मैदानात किंवा इतर शहरांमधल्या मोठ्या सभागृहांमध्ये प्रचाराच्या सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चालले असायचे. आजकाल इकडे प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होत असावा.

दुःखाची देवाण -घेवाण.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 05/11/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला. गेल्या वर्षी मी त्याच्या घरी गेलो होतो ते त्याचं सांत्वन करण्यासाठी.त्याला त्यावेळी लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन पाहूण्याच्या आगमनाच्या बातमीने तो खूपच खूष झालेला दिसला होता.मुलाचा जन्म झाल्या नंतर ती त्याची खूषी जास्त दिवस टिकली नाही.

सत्यमेव जयते

लेखक वडापाव यांनी बुधवार, 05/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
जयते या शब्दाचा मूळ धातू 'जय' हा धातू परस्मैपदी आहे. थोडक्यात, सत्यमेव जयति हे व्याकरणदृष्ट्या योग्य आहे. (माझ्या माहितीप्रमाणे) जय हा धातू उभयपदी असल्यास जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती !!

हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 05/11/2008 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या सटायर ची मूळ प्रेरणा "दिवाळीतले चमत्कार" असून, फक्त संवादांमधून चित्र उभे करण्याची खुमखुमी ( बराच डायल्यूट शब्द वापरला) सुद्धा एक प्रेरणा स्त्रोत आहे. सहज बसल्या बसल्या चकाट्या पिटताना सुचली कल्पना आणि मग मिपावर टाकेपर्यन्त धीर नाही निघाला... “ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?” “ह्हे, व्हूज दॅट?” “आई येम सतीश मिश्रा, मायावतीज एड फ्राम इंडिया” “मा या वा ठी , व्हाट्स दॅट?

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

लेखक संताजी धनाजी यांनी बुधवार, 05/11/2008 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला! आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात. म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.

माझी विठ्ठल माऊली..

लेखक राघव यांनी बुधवार, 05/11/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की! तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही?
Taxonomy upgrade extras