दिलिप चित्रे साहेबान्शि असहमत - पहा आजचा मटा - रविवार दिनान्क ९ नोवेम्बर २००८
दिलीप पुरुषोत्तम चित्रे साहेब,
आपल्या सारख्या थोर माणसाकडून इतकी मोठि चुक अपेक्षित नव्हती. हा देश "हिंदुस्थान" नसून "भारत" आहे. आपण "हिंदुस्थानी" शब्दाएवजी "भारतीय" शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरले असते. असो.
आपल्या सारखी माणसे अधिक आहेत महाराष्ट्रात आणि ती मराठीच आहेत याची आम्हाला देखील लाज वाटते. राज्यघटना वगैरे बोलायला ठीक आहेत हो पण नुसत्या बाता मारुन पोट भरत नाही. जर राज ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत ना. तर आपण योग्य मार्ग सुचवा. आपले हात तोंड कोणी धरले आहे. लोक आपले आभारच मानतील. आपल्या माहिती साठी सांगतो जो माणूस आपले घरदार सोडून दुसर्या ठिकाणी जातो तो पैसे कमवायला.
मिसळपाव

किल्ल्याचे प्रवेश दार..
किल्ल्याची समोरुन