Skip to main content

आसाराम बापु

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
Taxonomy upgrade extras

कुत्र आणि कानमंत्र

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहानपणा पासुनच कुत्र्यांची भीती वाटायची. ज्या रस्त्यावर कुत्रे आहेत त्या रस्त्यावरून मी जातच नसे. कुत्र्यांच भूंकण, त्यांचे विषारी दात, कुत्रं चावल्यामुळे होणारा रोग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुत्रा चावल्यानंतर पोटात घ्यावे लागणारे इंजेक्शन या सर्व गोष्टींची आठवण काढली की अंगाला काटा येतो. या सर्व गोष्टींमुळे मला कुत्र्यांची फार भीती वाटायची. मी कुत्र्याला घाबरतो म्हणून माझे सर्व मित्र मला हसायचे. ते मला नेहमी सांगायचे की, "कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही.

टी-शर्ट

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेश विसर्जनाचा दिवस. सर्वत्र ढोल ताशे वाजत होते. मी सुध्दा माझ्या मित्रांसोबत गणपती पहायला गेलो. गणपतीचा सण म्हणजे, ढोल-ताशे, विविध गणेश मंडळ. त्या-त्या गणेश मंडळाचे लेझीम पथक, टी-शर्ट. मी लहान असताना त्या गणपतीच्या सणाच्या काळात लेझीम खेळणा-यांना देण्यात येणा-या टी-शर्टचे मला फार आकर्षण होते. पण मला ते कधीच मिळालेच नाही. असो. अशा सार्वजनिक सणाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. आमच्या येथे तर चौका-चौकामध्ये पोलीस उभे असतात. सध्या बॉम्बस्फोटाच्या चर्चेमुळे सुरक्षा व्यवस्था अजूनच कडक करण्यात आली होती.

प्राणिपात कोटि कोट

लेखक सतिश यांनी सोमवार, 08/12/2008 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि शन एक खालि झुकले हे उन्च उन्च ईमले पायातली तयानच्य मज्बुत वीट हलली तुम्च्याच दर्शनचि तीज आस होति दादा करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि वय थोरेले परन्तु वारधक्य नाहि आले सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले अव्घया नभास भेदुनि वैकूनट लीन झाली प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला कवि सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि २२/११/२००८

ह्या आठवड्याचे संपादकीय?

लेखक सुनील यांनी सोमवार, 08/12/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही सोमवार नित्यनेमाने येणारे पाहुण्या संपादकाचे संपादकीय आज प्रसिद्ध झालेले दिसले नाही. संपादकीयाच्या प्रतिक्षेत आहोत.

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/12/2008 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

थोडे आतही डोकवा !

लेखक वाहीदा यांनी सोमवार, 08/12/2008 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी हा लेख आज 'सकाळ' मधे वाचला. मला आवडला आणि म्हणूनच मी तो इथे देत आहे. ह्या लेखाचा दुवा - http://www.esakal.com/esakal/12082008/Saptarang2B5D198F13.htm लेखन काढून टाकलेले आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा. -आणिबाणीचा शासनकर्ता.

थोडे आतही डोकवा !

लेखक वाहीदा यांनी सोमवार, 08/12/2008 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे आतही डोकवा ! राजकारण आणि राजकारणी ही भ्रष्टतेची गंगोत्री आहे, हे निदान झालेले आहे. पाण्यावर उमटणारा पहिला तरंग ही राजकारणी मंडळी असतील, तर त्या तरंगातील शेवटच्या वर्तुळात आपणही आहोत, याचा विसर पडू देता कामा नये. ....... मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील घटनेनंतर निर्माण झालेला जनक्षोभाचा अवमान करण्याचा हेतू नाही; परंतु एक निर्भय, शिस्तबद्ध समाजच देशाची सुरक्षितता, प्रतिष्ठा यांची मुहूर्तमेढ करू शकतो. लाचार, स्वार्थी, आपमतलबी समाजात लफंग्या राजकारण्यांचेच पीक येणार, हेही विसरता येणार नाही.

दोष कोणा द्यावा ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 08/12/2008 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
वार :- रविवार वेळ :- संध्याकाळचे ७.०० - ७.१५ वाजलेले ठिकाण :- सोसायटिचे पार्किंग पात्रे :- अ, ब , क , ड (ड च्या हातात एक बाहुली), इ (सर्व वय वर्षे ४ ते ६ १/२ ) आणी तो (दूरवरुन आपल्या दुकानात बसुन खेळाचा आनंद लुटणारा) वेळ संध्याकाळची आणी अगदिच आळस दाटलेला, सोसायटित सुद्धा अगदि शांत शांत .... अशा वेळिच ति ४/५ लहानगी वेगवेगळे खेळ खेळुन मन रमवत होती. आधी ते "आयडॉल आयडॉल" खेळले, २ जण "जज" झाले २ जण "स्पर्धक" आणी एकजण झाली "महागुरु" खेळ अगदी छान रंगला होता.