हे भारतीयांनो,
मुंबईच्या दहशतवादी हल्यानंतर तुम्ही जो आक्रोश, आदळआपट आणि तमाशा चालवला आहे तो बघून तुम्हाला जग हसत आहे.
मेणबत्त्या लावणे, मानवी साखळी तयार करणे, नेत्यांवर आगपाखड करणे, रोज पाकिस्तान सरकार तुमच्यासाठी काय करते यावर डोळे लावून बसणे, रोज त्या 'कसाब' बाळाचा फोटो पेपरांत जागोजागी छापणे असे करुन काहीच साध्य होणार नाहीये.
तुम्ही रोज किती जबाबदारीने वागता त्याचा प्रामाणिक आढावा घ्या. एवढे सगळे झाले तरी,
रहदारीचे नियम तोडणे, कायदा फक्त इतरांसाठी आहे असे समजणे, लांच देणे व घेणे, चकाट्या पिटणे हे सर्व आहे तसेच चालू आहे.