आय.टी मधील मंदी आणी उपाय
तशी ही कल्पना गेले काही दिवस डोक्यात घोळत होतीच, पण आत्ताच वाचलेल्या एका लेखामुळे इथे खरडण्याचे धाडस करत आहे. लेख योग्य नसेल तर क्रुपया काढून टाकावा.
बळी तो कान पिळी या तत्वाबद्दल बहुतेक जणांचे एकमत असेल. अमेरिकेत राहिल्यामुळे एक समजले आहे की पैसा असेल की बळ येते. उपाशी पोटी बळ येत नाही. कदाचित गांधीजींना येत असेल, पण मी काही गांधी नाही. मागे एकदा मी बी.पी.ओ.कॅनडा डॉट कॉम आणी गुज्जुवेब डॉट कॉम बघताना विचार आला की मराठी लोकांनी अशी प्रकारची कंपनी का चालवू नये? ड्रूपल, झूमला वगैरे ओपन सोर्स वापरून आपण सुध्धा एक कंपनी चालवू शकतो, जी इतर लोकांसाठी सर्विस देईल.
मिसळपाव