Skip to main content

आय.टी मधील मंदी आणी उपाय

लेखक उदय यांनी सोमवार, 22/12/2008 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
तशी ही कल्पना गेले काही दिवस डोक्यात घोळत होतीच, पण आत्ताच वाचलेल्या एका लेखामुळे इथे खरडण्याचे धाडस करत आहे. लेख योग्य नसेल तर क्रुपया काढून टाकावा. बळी तो कान पिळी या तत्वाबद्दल बहुतेक जणांचे एकमत असेल. अमेरिकेत राहिल्यामुळे एक समजले आहे की पैसा असेल की बळ येते. उपाशी पोटी बळ येत नाही. कदाचित गांधीजींना येत असेल, पण मी काही गांधी नाही. मागे एकदा मी बी.पी.ओ.कॅनडा डॉट कॉम आणी गुज्जुवेब डॉट कॉम बघताना विचार आला की मराठी लोकांनी अशी प्रकारची कंपनी का चालवू नये? ड्रूपल, झूमला वगैरे ओपन सोर्स वापरून आपण सुध्धा एक कंपनी चालवू शकतो, जी इतर लोकांसाठी सर्विस देईल.

थेंब एक असा बरसून गेला..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 22/12/2008 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
थेंब एक असा बरसून गेला.. ===================== . . गडगडाट ना कल्लोळ झाला.. घननीळ मुक्याने बोलून गेला.. . सुटला ना जरा भिरभीर वारा.. वादळ थेंबात निचरून गेला.. . झाकोळ रात्रीत दडवून गेला.. अवचित पाऊस बरसून गेला.. . दिशा दिशांत पसरवून शहारा.. अंतरंगी गारवा झिरपून गेला.. . अलवार झेलता झेला नभीचा.. अलगूज कधीचे मांडून गेला.. . कितीक अश्या अबोल गाथा.. भिजल्या मला सांगून गेला.. . थेंब एक असा बरसून गेला.. थेंब एक असा भिजवून गेला.. . . ===================== स्वाती फडणीस............. २२-१२-२००८

वामा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 22/12/2008 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
वामा- स्त्री. डाव्याबाजूला (पुरूषाच्या) असते ती, खास करून कलश पूजन करताना..(वामा म्हणजे रूक्मिणी ..) जगत-जननी, माता, भगीनी बंध नवे तू जोडीत ये घेत भरारी क्षितिजाशी त्या नवे नाते जोडीत ये अलका, अचला, कोमल गंधा अभिसारीका झळकत ये विश्वस्वरूपा, दुर्गा, अंबा अग्निशलाका तळपत ये स्नेहसुमना, अधोवदना कमल नयना अलगद ये मौक्तिक मुक्ता, रूप कांचना सुवर्णलता उमलत ये चाल हंसिनी, रूप कामिनी विश्वमोहीनी , सजून ये गजगामिनी, दिप्ती दामिनी चंचल हरिणी, बनून ये रण चंडीका, मुंड मुंडीका दैत्य दंडीका, जिंकूनी ये जगतकारिणी, गर्भ धारिणी, दु:ख सोषिणी, होऊन ये रूप गर्विता, तनू अ

नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांचे समाधान

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 22/12/2008 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रिया आणि नाडी ग्रंथांविषयी उत्सुकता असणाऱ्यांसाठी, आपण नाड़ीभविष्य पाहिलेत आणि विषय काढलात म्हणून या बाबत लिहितो. आपल्याला सारख्या अनेकांना संशय येतो की आपणाकडून माहिती काढून तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो. हा आक्षेप नेहमीच घेतला जातो. त्यावर उत्तरही अनेकदा दिले गेले आहे. तरीही पुन्हा देतो. या आक्षेपामधेच त्याचे उत्तर लपलेले आहे. ते असे की - आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो.

सी.ए.एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड- २

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 21/12/2008 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तरला प्रष्न पडला तात्याबा ना गाठावे तरी कसे. कधीही फोन केला की तात्या प्रतिक्षिप्त क्रियेत उत्तर द्यायचे. "मी आता बिझी आहे. शनिवार रविवार कधीतरी भेटु" करावे तरी काय? तात्यांचे बरेच उद्योग आहेत हे मास्तराना माहित होते. त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती. जंगलात जाउन शेळीच्या जखमासाठी पाला गोळा करणे येरा गबाळांचे काम नाही. ह्या नादात तात्यानी तंबोरा वादनाचे क्लासेस तुर्तास बंद ठेवले होते. त्यामुळे देशी आणि आंग्ल युवतींची भलतीच कुचंबणा झाली होती.पण मास्तर पडला चिवट.

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 21/12/2008 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

एक "सवाई मैफिल "

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 21/12/2008 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
संगिताच्या मैफिलीचा 'तो' दिवस खास होता आजूबाजूला बघण्याचा फक्त थोडा त्रास होता बंदिश गात होते बुवा, रंग भरु लागला छान हार्मोनियम साथीला, तानपुर्याचीही डोले मान लक्ष नव्हते माझे मुळी, गायकाच्या तानांकडे टक लावुन बघत होतो, रसिकांच्या मानांकडे कित्ती छान डोलत होत्या, प्रत्येक ठेका तोलत होत्या आपले ज्ञान दाखवण्यासाठी, मध्ये मध्ये बोलत होत्या (विषय होते कितीतरी) गायकाच्या गायकीचे अन् त्याच्या लायकीचे, त्याचा लहरीच स्वभावाचे, कधी 'तयारी' तील अभावाचे लक्ष नव्हते माझे मुळी, गायकाच्या रुपड्याकडे अवाक होऊन बघत होतो, रसिकांच्या कपड्यांकडे छान, छान साड्या होत्या झब्बे देखील छान, नवे (र

समुदातील केबल तुटल्याने इंटरनेटला फटका !!!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 21/12/2008 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिस : अॅलेक्झांड्रियाजवळ समुदातील केबल तुटल्याने इंटरनेटला फटका बसला आहे. सध्या आशिया, युरोप व मध्य पूवेर्मध ्ये इंटरनेट विस्कळीत झाले असले तरी भारतावरही याचा ६५ टक्के परिणाम झाला आहे.