Skip to main content

प्रकल्प- समान संधी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 02/04/2021 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकेकाळी होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीला 'जगन्नाथ शंकर शेठ' यांच्यासारखी धनीक मंडळी मदतीला उभी असायची. आता काळ बदलला आहे. आपल्या समाजात झालेल्या शैक्षणिक क्रांतीनंतर अनेक 'मिनी जगन्नाथ शंकर शेठ' होतकरू विद्यार्थ्यांना मदत करायला सज्ज आहेत. इथे आमच्यासारखे शैक्षणिक सल्लागार त्यांना मदत करू शकतात. त्यांच्या मदतीसाठी योग्य विद्यार्थी कोण असेल याची नियमावली बनवून , त्यांना देण्यात येणार्‍या मदतीचे स्वरुप आणि प्रत्यक्ष मदत दिल्यावर त्या मदतीचा होणारा विनियोग या आवश्यक बाबींकडे लक्ष देणे हे काम आम्ही पार पाडत असतो. या कार्यक्रमाची सुरुवात २०२० साली प्रायोगिक तत्त्वावर "समान संधी" कार्यक्रमाने झाली.

छोटा बाहुबली

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 02/04/2021 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा बाहुबली ----------------- माझी लाडकी खाट अगदी खिडकीजवळ आहे . तिच्यावर बसायचं अन बाहेर पहात राहायचं . केसांमध्ये बोटं घालून गोल फिरवत . हा माझा आवडता उद्योग . काय मस्त वाटतं ! लांबवर नजर जाते . समोर नुसतं मोकळं माळरान आहे आणि निळं निळं आकाश . जोडीला भरभरणारा भन्नाट वारा ! आमचं घर मला खूप आवडतं . मोठं. मातीचं.बैठं . भरपूर अंगण असलेलं . खूपखूप जुनं ! अगदी माझ्या नऊ वारी नेसणाऱ्या , थकलेल्या आजीसारखं ! ते अगदी एकटं आहे . गावापासून लांब. आजूबाजूला एकही घर नाही. तशी वस्ती आहे. पण जवळ नाही . आई - अप्पा शेतात जातात . शेत लांब आहे घरापासून . मी शाळेत जाते . मी सातवीत आहे आता .

मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 02/04/2021 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर:- (सदर लेखन आम्हास काल इमेल बॉक्स चे उत्खनन करताना सापडलेले आहे,म्हणून त्यास हे टायटल दिले आहे. आमचे टायटल पाच वर्षांपूर्वी क्लिअर-झालेले असल्याने "असे" नाव सुचले,हे वाचकांपैकी गरजूंनी नीट ध्यानाच्या आत घ्यावे! गरजू 'नसलेल्यांबद्दल' आमची काहीही आरजूच नाही! ;) त्यामुळे त्यांनी नुसतेच वाचावे) मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न! 1) मला (सकाळची) वेळेवर आपोआप जाग आलेली आहे. 2) मेसवर शेपूची भाजी खायला मिळते आहे. 3) मी दररोज कपडे धुतो आहे. 4) रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला आहे.

श्रीरंग....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 02/04/2021 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीरंग.... सावळ्याचा शाम रंग.. भक्तिमाजी गोपी दंग.. प्रेमाचे उधळुनि रंग.. स्वानंदे भिजले अंग.. ममत्वाचा होई भंग.. अहंतेचा सुटे संग.. वैराग्याचा मनी तरंग.. उजळुन जाई अंतरंग.. जाणिवेत "मी" च गुंग.. "तो" चि "मी" श्रीरंग... "तो" चि "मी" श्रीरंग... जयगंधा... ६-३-२०१७.
काव्यरस

अदा बेगम - भाग ६

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 01/04/2021 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
अदा बेगम - भाग ६ ------------------------ बरकतखान रात्रीच्या विजयाने खुश झाला होता. त्याला नाहीतरी मराठ्यांची भितीच वाटत होती. शैतान लोग ! पण तो कामयाब झाला होता. त्यांच्यावर त्याने फत्ते हासिल केली होती. त्याला दरबाराची स्वप्नं पडत होती. बादशहा कसा खुश होईल ? आपल्याला किती हजारी मनसबदारी मिळेल ? याच विचारात तो गढून गेला होता. तोफा आणि दारुगोळ्याचं वजन वाहणं सोपं नव्हतं. हलक्या असल्या तरी त्या तोफाच ! त्यात आदल्या रात्रीची लढाई. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभरात जेवढं जाता येईल तेवढी मजल मारून त्याने छावणी टाकायचा आदेश दिला. त्यांनी काही कोस मजल मारली व तळ ठोकला. आणि सोनेपे सुहागा !

एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 01/04/2021 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मंडळी, बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले. सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो. या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली.

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/04/2021 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे. उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेत, तसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्‍प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 31/03/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

मिपाकरांच्या वाचनखुणा.

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 31/03/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.

रंग मनाचा

लेखक आवाज साधक यांनी बुधवार, 31/03/2021 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
https://youtu.be/1vXPJr7wUx8 कोरोना लॉकडाऊन च्या काळात अवघ्या जगाला मनाकडे बघायला शिकविणारे महान तत्त्वचिंतक डॉ. आनंद नाडकर्णी यांना समर्पित !