Skip to main content

शिक्षणाचे ओझे जड झाले आहे का?

लेखक रेझर रेमॉन यांनी सोमवार, 05/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाचे ओझे झाले आहे का? मित्रवर्य 'एक तू ही निरंकार' यांना फोन केला. बोलणे संपताना सहज म्हणून परीवाराची चवकशी... मुलगी इयत्ता चॉथी.. अभ्यासच करत नाही. येतं सगळं, पण करायलाच मागत नाही. मी - ही - आणि आई, प्रयत्न करून थकलो. काही रीस्पॉन्सच नाही. तिला समजावून, धमकावून, चढवून, पाहिलं... नाहीच. शेवटी पूर्ण तिच्यावर सोडलं तर भलतंच... आता नव्वदच्या खाली आलीय... वार्षिक पर्यंत वर आली नाही तर तिची तुकडी बदलेल. मग 'ढ' मुलां सोबत बसायला लागेल.. सगळं फ्युचर अपसेट होईल. काय करू आम्हाला कळेनासं झालंय. मित्र अतिशय हुशार, स्वतः यशस्वी इंजिनिअर, त्यात यशस्वी शिक्षक. मुलगी किंगजॉर्जला.. गोड, लाघवी..

स्ट्रॉबेरीच्या मळ्यात

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 04/01/2009 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईकराला स्ट्रॉबेरी दिसते ती आकर्षक खोक्यात. आणि विकत घेतल्यावर समजते की स्ट्रॉबेर्‍या फक्त पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाईतक्याच आहेत, बाकी खोक्याचा खालचा भाग भरलाय कागदी कपट्यांनी. पाचगणीच्या मॅप्रो उद्यानातुन पाचगणी गावाकडे येताना एका झाडाखाली एक स्ट्रॉबेरीचा ठेला दिसला. गाडी थांबवली. ठेलेवाल्या मामांनी प्रेमानी सार्‍यांना स्ट्रॉबेर्‍या हातावर दिल्या. रसाळ होत्या खर्‍या. मामा हुशार. पोराटोरांना पाहताच म्हणाले, भाव कशाला करता घ्या आपल्या हातान खुडुन, भरा टोपली मग भावाच बघु! मामा जवळच्याच भोसे गावातले. स्वतःचा छोटा मळा होता, सध्या चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे म्हणाले.

क्षितीज

लेखक शाल्मलि यांनी रविवार, 04/01/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची, असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची; मात्र तो असतो फक्त एक अभास तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?

मौजा ही मौजा

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 04/01/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपण 'नाही ' ला घाबरतो. विचारायचे असते,पण नकार मिळेल ह्या भितीने विचारतच नाही. १९९४ साल असावे. भारतात "फ्लाय बाय कंप्युटर" ची बोईंग विमाने सुरु झाली होती. कुटुंबासकट गोव्याला कुलदैवताला जायचा बेत रचला. विमानाची तिकीटे काढली. चेक इन करेपर्यंत ३०३ बोईग आहे हे माहित नव्हते. विमानात शिरल्यावर एकंदरीत स्टाइलने खुश झालो. बायको तर अवाक झाली. टेकऑफ घेतल्यावर चिरंजिवांनी (वय सुमारे साडे पाच)कॉकपीट बघायचा हट्ट धरला. खरे तर मला पण बघायचे होते. मी उठलो. लगेच बायकोने लगेच आहेर दिला. "वेड लागले आहे का? गप्प बसा. असे कोणालाही पायलट आत घेत नाही. अपमान कशाला करुन घेताय"? मी बसलो. मुलाला धीर निघेना.

आपल्या देशावर येऊन गेलेल्या मोठ्या संकटानंतर 31st celibration कितपत योग्य ठरले?

लेखक उर्मिला०० यांनी रविवार, 04/01/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रमैत्रिणिंनो, २६नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.आपण आपल्या खुप देशवासीयांना गमावले.मुंबईकरांनी तर हे दहशतवादाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिले.प्रत्यक्ष अनुभवले.

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/01/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
तु मी अन ममा, आपला ग्रुप होता.. त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता. आता आपला ग्रुप फुटला आहे, कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर It is my Mess and i Love it पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले, बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड, मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें" तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे... कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वे