Skip to main content

दिल्ली ते दिल्ली !

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/01/2009 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डिसेंबरला घरी जाणार जाणार म्हणून तयारी करत करत मी २२ला जाण्यासाठी मोकळा झालो, पण अचानक टिकीटे तथा काहीच बाकीचे प्लान तयार नव्हते तरी म्हणालो निघायचं आहे तर निघू .. बघू काय होईल ते ! मित्राबरोबर सरळ न्यु दिल्ली रेल्वेस्टेशनला पोहचलो व टिकीटासाठी दोन तास अटापिटा करुन शेवटी मुंबई राजधानीचे टिकीट घेतले व सरळ ४.१५ च्या गाडी बसलो. योग्य वेळ योग्य काम करणे हा माझा धर्मच नाही त्यामूळे गाडीत बसल्यावर विसरलेल्या गोष्टि आठवू लागल्या.. चार्जर घेऊन आला नाहीस.. पैसे सुट्टेच खिश्यात आहेत... नशीब एटीम तथा क्रिडीट कार्ड घेऊन आला आहेस नाही तर मुंबई मध्ये बस भीक मागत..

बेळगाव नक्की कुणाचे?

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 21/01/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा स॑युक्त महाराष्ट्राच्या चळवळीची 'निपाणी, कारवार, बेळगावसहित स॑युक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' ही घोषणा गाजू लागली आहे. थोडी-फार कल्पना असली तरी माझ्या पिढीने 'ती' चळवळ पाहिलीच नाही अन त्याविषयी पूर्ण माहीतीही नाही. खर॑ तर सध्याची बरीचशी मराठी मुल॑ कॉन्व्हे॑ट कि॑वा सेमी-कॉन्व्हे॑ट्मध्ये जातात (कि॑वा गेलेली आहेत. उदाहरणच हवे असेल तर माझ्याबरोबर कार्यरत असलेले सत्तर ते ऐ॑शी टक्के मराठी डॉक्टर्स इ॑ग्लीश माध्यमातले आहेत व मराठी वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत). त्या॑ना स॑युक्त महाराष्ट्र कि॑वा मराठी अस्मिता वगैरे गोष्टी॑बद्दल काडीचे सोयरसुतक नाही. कटू असल॑ तरी सत्य आहे हे.

पाषाण युगामध्ये सुध्दा नालंदा महानगर होते

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/01/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार मध्ये नालंदा जिल्हात राजगीर पासुन पचाने नदीच्या जवळ गिरियक पाशी ताम्रपाषाण काळातील एक महानगर शोधुन काढण्यात पुरातनशास्त्रीना यश मिळाले आहे, पाच हजार वर्षा पुर्वी जेव्हा बाकी जग जंगलामध्ये कंद-मुळे खाऊन जिवन व्यतीत करत होते तेव्हा नालंदाच्या घोडांकटोरा मध्ये लोक महानगरीय जिवन सुविधा उपभोगत होते. ते एक समृध्द महानगर होते तसेच ते अखंड भारतातील बाकीच्या १६ महानगरापेक्षा समृध्द होते व ती- ते साढेंतीन हजार वर्ष ते शहर आपल्या समृध्दीच्या उच्चतम सीमेवर होते, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे अधीक्षक एन.जी.

तुला कापते रे तुला कापते

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 21/01/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न ) तुला कापते रे तुला कापते तुझी पर्स माझ्या मनी राहते जरी साधीभोळी तुला कापते तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे तुझ्या मिळकतीने मनी खर्च जागे तुझ्या कार्डने मी मॉल नाहते किती भाग्य थोर ह्या साधेपणीही दिसे वस्तू निद्रेत जागेपणीही उगी का वाण्याचे बील वाढते कधी बोका पाहतो का बडग्याला पती न्याहळी का कधी शेजारणीला लाटणे घेऊनी मी सदा राहते (चू भू द्या घ्या )
Taxonomy upgrade extras

सत्याचे प्रयोग

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 21/01/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुला मैत्रीणी किती रे? तात्यानी माझ्या चिरंजिवाना प्रश्न विचारला. त्याने काय उत्तर दिले ते कळाले नाही. कारण 'बिस्किट आंबाड्यांचा" ताजा घाणा आणायला किचन मधुन हाक आली होती. वैधानिक इशारा: 'सत्याचे प्रयोग' व्यावसायिक्(प्रोफेशनल) ट्रेनिंग असल्याशिवाय करु नयेत. अनुभव नसेल तर 'त्वांड फुटते'. हा इशारा डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. च्या पैलवानांच्या इशार्-याच्या धर्तीवर वाचावा. वरील प्रष्न तात्यानी माझ्या घरी अचानक ठरलेल्या 'अल्पोपहार कट्टा' वर विचारला. त्याचे उत्तर त्याने काय दिले हे परत विचारणे मला बरोबर वाटले नाही. गरज पण वाटली नाही. आता त्याच्या प्रश्नांची उत्तरे मी कशाला संभाळू? त्याचा मुखत्यार तो.

तुझ्या रुपातुनी दर्शन घडते...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 21/01/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रुपातुनी दर्शन घडते निर्मात्याच्या कलाकृतीचे. दिपविणारे तेज पसरले, जगी तुझ्या या मुखकमलाचे. जुलफांच्या ह्या छायेखाली, सुवर्णरूपी बहार आली. अंधारमयी अवकाशात या, पहा ही गोड चांदणी उगवली. धनुष्यकारी भ्रकुटिखाली नयन कमल ते दोन लाजरे. भासती जसे ते दोन तारे विशाल गगनी लुकलुकणारे. आरक्त अधर अन् कपोल तुझे तृशार्त मनाला सुखविणारे. दन्तपंक्ती जणू भासती, हंस नभी ते विहरणारे.

Laptop घेण्यासाठी मदत हवी

लेखक मोहन यांनी बुधवार, 21/01/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मला माझा सध्याचा Laptop बदलायचा आहे. Mackbook की Dell ( Studio /XPS) अश्या द्विधा मनस्थितीत आहे. मुख्य कारण Mackbook करता ३०/४०% जास्त किंमत द्यावी का? ऊगाच तर ब्रांड्च्या मागे जावून जास्त पैसे देत नाही ना हा मुद्दा आहे. आता मुंबईत Appleची विक्री पश्चात सेवा आहे त्यामुळे तो प्रश्न नाही. तज्ञ मिपाकर काही मदत करु शकतील का ? मोहन

सुवर्णप्रभा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 21/01/2009 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाल केशरात रंग खेळते पहाट खास दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस... तारकांत लोपली निशा उषेस पाठवून अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस... सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ... सागरात गाज आणि लाट जात उंच उंच गारवा हवेत आणि वेड लागते मनांस... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...
Taxonomy upgrade extras

बेलफास्ट---- मदत हवी आहे.......

लेखक मन यांनी मंगळवार, 20/01/2009 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो.... बेलफास्ट(नॉर्दन् आयलंड) या ठिकाणाबद्दल कुणाला अधिक माहिती आहे काय? तिथे प्रथमच पाठवण्यात येत आहे. आमच्या टीम पैकी अजुन तरी कुणीही तिथं गेलेलं नसल्यामुळं; कसं जावं, कुठं उतरावं ह्याची माहिती मिळाली तर फार बरं होइल. निदान चांगल्या B&B ची किंवा तात्पुरत्या निवासाची (सुरुवातीच्या काही दिवसांकरीता)माहिती हवी आहे. पोस्ट कोड BT13BT च्या जितक्या जवळ जागा मिळेल तितकं बरं होइल. आपलाच मनोबा....