Skip to main content

घडतंय बिघडतंय...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 06/02/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळपासून मिपाचा सेवादाता गंडतोय. मिपाचा ह्याशी काहीही संबंध नाही. मात्र तरीसुध्दा मिपाकरांची गैरसोय होतेय. त्याबद्दल दिलगीर आहे. तात्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर सेवा देऊ शकत नाही म्हणून स्वतःचीच लाज वाटतेय. डोमेन नेम सर्व्हर आणि मिपाचा डेटाबेस सर्व्हरचा इश्यु आहे. शक्यता आहे की आज रात्री जेव्हा मिपावर गर्दी नसेल तेव्हा ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. तो पर्यंत अडचण येणार नाही. डोमेन नेम सर्व्हरचे काम करतांना कदाचित असं होऊ शकतं की मिपा उघडणार नाही किंवा जुणी पानं उघडली जातील. पण हे थोड्यावेळासाठी असेल. उद्या सकाळपर्यंत सर्व सुरळीत असेल. नीलकांत

असा ही एक भावानुवाद "हो ना गं आई"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 06/02/2009 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हो ना गं आई....." अंधाराची भीती मज वाटे तरी मी ते कुणा न सांगे तुला ही मी ते सांगत नाही कदर तुझी करीतो मी आई माहित आहे तुला सर्व काही हो ना गं आई........ गर्दीमधे मला नको सोडून जाऊं घराकडे आई कसा मी परत येऊं दूर दूर मला नको असा पाठवूं सांग कसा मी तुला मग आठवूं एव्हडा व्रात्य असेन का मी हो का गं आई......... बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी गं आई नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी गं आई नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई गं आई चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी गं आई ठाऊक आहे तुला सर्व काही हो ना गं आई...... नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई नसती क
Taxonomy upgrade extras

या टोपीखाली दडलंय काय?! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 05/02/2009 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेतले साहित्य संमेलन, महाराष्ट्राचे २५ लाख, संमेलनाचे मराठी संस्थळ, तात्यासारख्या यकश्चित माणसाला फोन! आखिर मामला क्या है भाई?! :) कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय, या टोपीखाली दडलंय काय? या मुगुटाखाली दडलंय काय? या संमेलनाखाली दडलंय काय? :) अजून काही दिवसांनी येणारे प्रश्न - मारुती कांबळेचं काय झालं? तात्या अभ्यंकरचं काय झालं? चांगला माणूस होता बिचारा! :) सख्या रे घायाळ मी तात्या! असो... आपला, तात्या फुले.

`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 05/02/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती हुशार आहे हो तुमची मुलगी! किती छान नाचते, हावभाव करते, समज तरी किती आहे तिला वयापेक्षा!! :) या आणि असल्या प्रशंसेने आम्ही (आणखीनच) फुगलो होतो. त्यातून भर पडली, सारेगमप सुरू झाल्यानंतर तिच्या आणि मुग्धा वैशंपायनच्या तुलनेची. "सेम टू सेम मुग्धा हं!' :S अशा कॉंप्लिमेंट्‌स मनस्वीला घडोघडी, जागोजागी मिळू लागल्या. "अगं मुग्धा, मला ओळखलंस का?' असं थेट विचारणाऱ्या अनोळखी बायकाही ठिकठिकाणी भेटू लागल्या. जणू या बया गेल्या जन्मी मुग्धाच्या आयाच होत्या आणि आता नव्या जन्मात मुग्धानं मनस्वीचं रूप घेतल्यानंतर त्या तिला जुनी ओळख दाखवू पाहत होत्या!

वादळ (अंतिम)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/02/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) आधीचा भाग.. वादळ (वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक... अचानक..दारावर थाड थाड आवाज आला...."दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो....

तुझे सब है पता... चा भावानुवाद

लेखक आचरट कार्टा यांनी गुरुवार, 05/02/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ऑर्कूट वरच्या "मराठी कविता" या समुहात माझ्यासकट अनेकांचे भावानुवादाचे प्रयत्न चालू होते. त्यात हे लिहिलं होतं. आज मिपा च्या मुखपृष्ठावर या गाण्याबद्दल वाचलं, आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावं...
Taxonomy upgrade extras

रासलीला

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 05/02/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
लाख चांदण्या लखलख करीती आणि तारका दळे उतरती आज पोर्णिमा उतरुन आलि कालिंदीच्या तटी खेळतो रास सखा श्रीहरी भरल्या मेघा परि सावळा मोरमुकुट शिरी मदनची दुसरा श्रृंगाराला स्वरात भिजवी अधरी धरुनी बासरी खेळतो रास सखा श्रीहरी गोप गोपिका जमले सारे टिपरी वरती टिपरी गाजे त्या नादाला भूलूनी आले शिवही यमुनातिरी खेळतो रास सखा श्रीहरी वाळ्वंटी त्या यमुनाकाठी रास रंगता हरी संगती तनमन अवघे विसरुन जावे प्रेम भरूनिया उरी खेळतो रास सखा श्रीहरी विषय नव्हे हा ही तर भक्ती विसरूनी रमणे देहासक्ती देवांनाही वेड लावते अशी रासमाधुरी खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

लेखक दशानन यांनी गुरुवार, 05/02/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत. तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे. स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता. आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत. ५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळ