Skip to main content

कशी कोण जाणे

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शनिवार, 21/02/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कोण जाणे, तुझी याद आली मुक्या पापणीतून ओलावलेली आवर्जून मी एकेका सयीला कुलुपबंद केले मनाच्या तळाला वरी विस्मॄतीचा दगड रोवलेला तरीही...... ......तरीही पुन्हा आज डोकावलेली कशी कोण जाणे...... आवरून अवघे वेदनांचे भारे किती निग्रहाने लिंपलेले सारे तडे, चरे अन दुभंगलेले तारे तरीही...... ......तरीही पुन्हा भेग रुंदावलेली कशी कोण जाणे...... ना जाणे कुठे तू, कुणाच्या कुशीत जुनी कात टाकून, निराळ्या मुशीत अता गाठभेट, आहे स्वप्नातीत तरीही...... ......तरीही पुन्हा प्रीत आसावलेली कशी कोण जाणे......
Taxonomy upgrade extras

ह्या कवितेचे शब्द माहित आहेत का?

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 21/02/2009 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
शांता शेळके ह्यांची पावसाच्या धारा येती झरझरा ही कविता कुठल्यातरी इयत्तेला होती असे आठवते आहे. कुणाला ही कविता आठवते आहे का? कितवीला होती ही कविता? मला एवढेच आठवते पावसाच्या धारा येती झरझरा झाकोळले नभ सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहळ जाती खळखळ जागोजागी खाचांमधे तुडुंबले जळ

(काव्यप्रसववेदना)

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 20/02/2009 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
'आपला अभिजित' यांच्या ह्या कवितेच्या प्रेरणेने खालच्या ओळी रखडल्या... जमल्याच असतील असे नाही. तसेच या ओळींना शिर्षक काय द्यावे ते पण कळले नाही...
Taxonomy upgrade extras

काव्यप्रसववेदना

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 20/02/2009 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना ः या कवितेतील (अस्मादिक सोडून) सर्व पात्रे, कल्पना, घटना, प्रसंग काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
Taxonomy upgrade extras

अनुभव मासिक

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 20/02/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
युनिक फिचर्स चे अनुभव या मासिका चा प्रवास मी जवळुन पाहिला आहे. युनिक फिचर्स चे डॉ सुहास कुलकर्णी हे माझे मित्र. त्यांनी जेव्हा फिचर्स चालु केल (१९८८ )त्यावेळी ती अंधारात उडीच होती. ज्योतिषावरचे माझे सुरुवातीचे लेख युनिक फिचर्स द्वाराच प्रकाशित झाले होते. सुरुवातीला अगदी निवडक लोकांना प्रायोगिक तत्वावर हे मासिक दिले जात होती. जसजसा प्रतिसाद मिळत गेला तसे ते वाढत गेले. आज अनुभव हे एक वाचलच पाहिजे असे या सदरात आले आहे. या वेळेच्या अंकात त्यांनी वाचकांना लिहिते करण्यासाठी आवाहन केले आहे. आपण सर्वांनी जर आपले लेखन पाठवले तर छापले जाईलच असे नाही पण एक वाटचाल नक्कीच चालु होईल.

दुबई कट्टा सफळ संपुर्ण.

लेखक सायली पानसे यांनी शुक्रवार, 20/02/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे आमचा दुबई कट्टा मस्त झाला... उद्या सविस्तर रीपोर्ट मिपा वर फोटो सहित चढवण्यात येईल. अर्थात अपरिहार्य कारणास्तव बिपिन दा आणि कुंदन हजेरी लावु शकले नाहित. त्यांच्या आठवणीत सगळ्यांनी दोन घास जास्त खालले. उद्या रीपोर्ट देउच.

कचोरी (पाककृती सह फोटो.. )

लेखक मितालि यांनी शुक्रवार, 20/02/2009 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी स्वत: बनवलेली कचोरी आणि चिन्चेची चटणी :-) पाककृती: साहित्यः १ वाटी मैदा , २ चमचे तेल, मीठ, पाणी १/२ वाटी उडीद डाळ, १ चमचा मिरचिपूड, १/२ चमचा धणेपूड, १/२ चमचा आमचूर पावडर, १/२ चमचा हळद,१चमचा साखर, मीठ मोहरी, जिरे, हिंग,१ चम

आतुर

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/02/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
जागली रात्र हिरवी सांज कोवळी लाजली झोपला गं दिनमणी चंद्रकला हि फाकली गुज काजवे करती क्षितिजाही सैलावली धुंदी तव लोचनी गात्रे सारी मस्तावली चाहुल तुझी सजणी रातराणी धुंदावली प्राजक्त गातो अंगाई बघ पश्चिमा उजळली सखे रात ही जागवु चल तनुत आगळी नको आता दिरंगाई नीज नयनी जागली विशाल
Taxonomy upgrade extras

मराठी वाचवा असे म्हणण्या पेक्षा आपणच काहीतरी केले पाहीजे

लेखक बाप्पा यांनी शुक्रवार, 20/02/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी.. काही दिवसांपुर्वी कुठल्याशा मराठी वाहीनीवर एक कार्यक्रम चालु होता. छोटीशी स्पर्धा होती २ मिनीटे मराठीत बोलण्याची. पण बघुन अतीशय वाईट वाटले की फार कमी लोक असे करु शकले. ईतकी अवघड आहे का माझी भाषा बोलण्यास ? उत्तर आहे नाही. तीस आपण तसे केले. आज जर आपण १०० ते २०० वर्ष जुनी मरठी पुस्तके वाचलीत तर आज आपल्या ती मराठी समजत नाही या गोष्टी बद्दल मला खेद वाटतो. असो.. मराठी वाचवा.. मराठी वाचवा असे म्हणण्या पेक्षा आपणच काहीतरी केले पाहीजे. यात सर्वप्रथम असलेली भाषा सुधारणे हे ओघानेच आले. आज आपल्याला वापरात असलेल्या बर्याच ईंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ माहित नाहि.