Skip to main content

कोंबडी रस्सा

लेखक लवंगी यांनी रविवार, 08/03/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजचा बेत कोंबडी रस्सा. साहित्य : १ किलो कोंबडी २ बारीक चीरलेले टोमॅटो १ बारीक चीरलेला कांदा १ लसूण - २" आल यांची पेस्ट २ चमचे लाल तिखट १ चमचा हळद बारीक चीरलेली कोथींबिर कोंबडीला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ लावून २ तास ठेवावे.

रांग रांग आणि रांग

लेखक मेथांबा यांनी रविवार, 08/03/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कुठल्यापण सरकारी कामाला जा, बहुतेक ठीकाणी आपला रांगेत बराच वेळ जातो. अगदी इलेक्शन कार्ड चं काम असो किंवा पासपोर्ट काढायचा असो किंवा रेल्वेचं टिकिट काढायच काम असो. सर्वत्र रांगच रांग. त्यामुळे किति ह्युमन वर्किंग अवर्स फुकट जातात त्याची कोणालाच खंत नाही. आता सिध्दिविनायाकाची रांग म्हणाल तर तिथं उभं राहायचं कि नाही हे आपापल्या मर्जीवर असतं पण इरत ठीकाणच्या रांगेचं काय? त्याला अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे अफाट लोकसंख्यावाढ. आता तुम्ही म्हणाल की मलाच चार मुलं आहेत तर मला याविषयी बोलायचा अधिकार काय पण आमच्या वेळी तीन चार मुलं असणं काही विशेश नव्हतं.

स्त्रीत्वदिना निमित्ताने...

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 08/03/2009 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
१. इव्ह, "मी खूप विचारात पडलेय..." दैवीशक्ती, "काय चाललय तुझ्या मनात?" इव्ह, "हे बघ, तु मला बनवलंस, ही सुंदर बाग बनवलीस, पशु-पक्षी बनवलेस, पण आजकाल मला जरा भीती वाटायला लागलीय." दैवीशक्ती, "बोलत रहा..." इव्ह, "बऱ्याच वेळा मला कंटाळा येतो- काही मजाच नाही आयुष्यात. आणि हे इकडे तिकडे फ़िरणारे जंगली श्वापदं, विषारी साप...मला खूप भीतीपण वाटते." दैवीशक्ती (विचारात पडून), "बरं..." "हे बघ इव्ह माझ्याकडे एक कल्पक विचार आहे. मी एक "पुरुष" बनविणार तुझ्यासाठी" इव्ह, "पुरुष?" हे काय प्रकरण आहे?" दैवीशक्ती, "पुरुष हा एक दोषपुर्ण प्राणी असेल. त्याला अनेक कमकुवती असतील व हलक्या सवयी असतील.

कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 07/03/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
"मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो त्याकडे सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो.

जागतिक महिला दिन..अन् बिच्चारे पुरुष ! :(

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 07/03/2009 21:35 या दिवशी प्रकाशित केले.

               जागतिक महिला दिन आला की, स्त्रियांच्या प्रश्नांची,समस्यांची, त्यांच्या प्रगतीची मांडामांड सुरु होते.मग काही तक्ते,संशोधन, निष्कर्षे आणि त्या स्थितीतून स्त्री बाहेर यावी यासाठीच्या नियोजनांची चर्चा होते. ती चांगलीच गोष्ट. स्त्रीची अधिक प्रगती व्हावी याबद्दल शंकाच नाही पण तिचा पहिला प्रश्न असतो की पुरुषांच्या जोखडातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. तिला पुरुषांइतकेच स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. लग्न हा मूर्खपणाचा कळस आहे, पुरुषांनी स्त्रियांवर कायमची मालकी हक्क गाजवण्याचा तो एक कट आहे.

कैरीचे रायते

लेखक मिना भास्कर यांनी शनिवार, 07/03/2009 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
ही पा.क्रु. माझ्या आजी कडून मी शिकले मी, अनेक वेळा केली पण तिच्या हाताची चव नाही आली कधी मी केलेल्या रायत्याला. बेळ्गाव , कर्नाटक या भागात करतात असे रायते. तशी थोडी त्रासदायक आहे. पण म्हणतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, तसंच जर चवीचे खायचे असेल तर थोडे कष्ट ही घ्यायला हवेत. २ कच्च्या (कडक हव्या, मऊ नकोत.) कै-या, १ वाटी भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट, ५ ते ७ हिरव्या मिरच्या, बुटुक भर चिंच, चवी पुरता गूळ, मीठ, फोडणी करीता तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्याची पाने ८ ते १० प्रथम कै-या कुकर मधे २ ते ३ शिट्ट्या करून उकडून घ्या. कै-या गार झाल्या की साली, गर वेगळा करा.

उपवासाचा बेत!

लेखक मिना भास्कर यांनी शनिवार, 07/03/2009 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
वरइचा भात :) १ वाटी वरईचे तांदूळ, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ चवी पुरते, फोडणी साठी तुप प्रथम वरईचे तांदूळ निवडून , धुवून घ्या. एका पातेल्यात २ ते ३ चमचे तुप टाका, गरम झाल्या वर जिरे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका. नंतर धुतलेले वरईचे तांदूळ टाकून छान परतून घ्या. दोन वाट्या पाणी टाका. चवी नुसार मीठ घाला. भात शिजत आला म्हणजे झाकण टाका, गॅस बंद करा. वाफेवर भात मुरू द्यात.

नवीन पुस्तक

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 07/03/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
नागपूरच्या श्याम पेटकर यांच ऋतूस्पर्श हे एक अत्यन्त सुन्दर निसर्गवर्णनपर लेखांच पुस्तक. ऋतू ख-या अर्थान अनुभवायचे तर ते गावाकडेच! त्या अनुभवांचा घरात बसून अनुभव देणार चित्रण लेखकान या लेखांमध्ये केल आहे. प्रत्येक लेख वाचताना आपण मनाने त्या ठिकाणी आहोत अस वाटत रहात. नुकतीच डिसेंबरमध्ये पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. नागपूरच्याच विजय प्रकाशनच हे नितांतसुन्दर पुस्तक संग्रही असावच अस आहे. "वसन्त भुलीला भुलून शिशिरात निमूटपणे गळून पडणा-या पानांना...." लेखकान हे पुस्तक अर्पण केल आहे. एकदा तरी वाचाव आणि पुन्हा पुन्हा वाचतच रहाव अस अप्रतिम पुस्तक आहे.

नोकरी करणारी स्त्री किंवा व्यवसायात नवर्‍याला मदत करणारी स्त्रीचे खरोखरच स्वतंत्र आहे.

लेखक चटपटीत यांनी शनिवार, 07/03/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा होणार पण खरेच आज ती स्वतंत्र आहे. तिचे माहेर खुप श्रीमंत नाही पण खाउन पिउन सुखी. चार बहीणी लग्न होउन चांगल्या घरी गेल्या. आई नाही ती पहील्या वेळेस गरोदर असताना नवव्या महिना चालू असताना अचानक गेली. लग्न झाल्यावर एक वर्ष व्यवस्थित गेले. तिचा नवर्‍याचा कॉम्प्युटर व्यवसाय ती पण त्यात त्याला मदत करती . दोघांचा प्रेम विवाह आई वडिलांच्या समंतीने झाला. एकाच जातीचे असल्याने बरेच रीतीरिवाज एक. तिचे सासरचे तीन मजली घर शिवाय भावासारखे दोन दिर. त्यांची लग्ने होवून ती परगावी असतात.

आवडलेले पुस्तक...फॉर हिअर ऑर टु गो

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 07/03/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ॊर हिअर ऒर टु गो लेखिका अपर्णा वेलणकर मेहता प्रकाशन पृष्ठ संख्या २८६ http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16335 या पुस्तकाला नुकताच एक पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली... अमेरिकेवरचे पुस्तक म्हणजे काही ठराविक कल्पना मनात घेऊन वाचायला सुरुवात केली होती. पण हे पुस्तक वेगळे आहे. हे एक टिपिकल ठराविक प्रवासवर्णन नाही.... ( अबब, केवढ्या त्या उंच इमारती अन केवढे ते गुळगुळीत रस्ते...