आणि म्हणे मी लिंबूटिंबू!!!!
नमस्कार मिपाकर मंडळी!!!
आज तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. मी बरेच दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणत होतो पण आमच्या त्या खड्डूस मालकांनी (म्हणजे मालक आमचे, तुमचे पिडांकाका!!!!:)) कधी संधीच मिळू दिली नाही. "तू अजून पुरता तयार झाला नाहियेस" हे त्यांचं पालुपद!! तेंव्हा आत्ता कुठे तुमच्याशी जरा बोलायची मोकळीक मिळाल्येय, तिचा फायदा घेतोय!!!
"अरे पण तू कोण, कुठला, ते तरी सांग मिपाकरांना!", डांबिसकाका
"म्हणजे? त्यांना अजुन काही पत्ताच नाही?"
"पत्ता कसा असेल? अरे तू म्हणजे काय "अनुष्का" आहेस का की मिपावरच्या समस्त सभासदांना तुझी समग्र माहिती!!!
करी ऑफ कॉन्स्पीरसी.
करी ऑफ कॉन्स्पीरसी उर्फ कटाची आमटी
कटाची आमटी ही नाजूक पाककृती आहे.सरावानी जमते.बिघडली तर गुळवणी होते.या आमटीचा किचनमधून येणारा सुगंध आणि दरवळ हेच या आमटीचे आयएसओ ४१००० प्रमाणपत्र आहे.सौ.रामदास यांच्या सौजन्याने ही पाककृती येथे देत आहे.
साहीत्य : मसाल्यासाठी-जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता.
भिजवलेले कच्चे शेंगदाणे, खोबर्याचे पातळ काप खोबर्याचा तुकडा (भाजण्यासाठी)
काजू तुकडा (ऐपतीप्रमाणे),कढीपत्ता, तेजपत्ता, हिरव्या मिर्चीचे तुकडे,कोथींबीर, लिंबाएव्हढी चिंच,थोडासा गूळ.
कृती :
कट काढणे : पुरणासाठी चण्याची डाळ शिजवून घेताना त्यावर पांढरा फ
तिच्या नजरेतून...
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा.
स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.धर्म
धर्म! बाजारातुन भाजी घेऊन ये लवकर. पावशेरच आण. हे घे पैसे. उठ बघु लवकर." आईच्या बोलण्याने धर्म लेख अर्धवट सोडुन उठला. आईने टेबलवर ठेवलेले पैसे आणि पिशवी घेऊन तो घरातून खाली मान घालूनच बाहेर पडला. काही वेळापुर्वीच तो कॉलेजमधुन परत आला होता. कॉलेजमध्ये आज परत त्याचा सर्वांनी अपमान केला होता. तो सहन न झाल्याने धर्माने दु:खाश्रु ढाळले होते. माझ्या आयुष्यातच हे सर्व का घडतं? हा प्रश्न त्याला पडला होता. अल्पभाषी असणाऱ्या त्याला पदोपदी अवमान सहन करावा लागत होता. शरीराने क्रुश म्हणुन सगळॆ त्याला सुपरमॅन म्हणत. आजतर संपुर्ण वर्गासमोर एका मुलीने त्याला सुपरमॅन म्हणुन हिनवले होते.
मराठी सिनेमा
नमस्कार मंडळी!!
क्रुपया एखादी अशी साइट सुचवा जेथे मराठी मोव्हिचे "टॉरंट" मिळु शकेल. तसेच शक्य असल्यास अतिशय विनोदी असलेल्या नविन मराठी मोव्हिचे नावही सुचवा........
dishant संकेतस्थळ!
www.dishant.com या स्थळावरील गाणी कशी डाऊनलोड करावी?
चिकन बिर्याणी स्टेप बाय स्टेप....
आज परत रैवार, कोंबडीचा घातवार . लवंगीतै नी शोनुतैंनी दोन कोंबड्या आधीच कापलेल्या हैत. आम्ची बी एक गोड मानुन घ्या.
कच्चा माल :
१ कोंबडी, ३ कप बासमती तांदुळ (१०-१५ मिनिट भिजवलेला), गरम पाणी (तांदळाच्या दुप्पट).
प्रत्येकी २ चमचे हळद, मससाला/लाल तिखट, आल पेस्ट, लसुण पेस्ट,
२ मोठ्ठे कांदे लांब उभे कापुन.
खडा मसाला, जो मिलळेल तो. (माझ्याकडे दालचीनी , काळीमिरी, चक्रीफुल इतकच होत.)
३ चमचे बिर्यानी मसाला.
टोपण नांवे
मिपावर किंवा अन्यत्रही लेखन करणारे टोपण नांवाने कां लिहितात?
मी
मी
मुक्त तरीही बन्धनात मी
फुलाफुलाच्या स्पन्दनात मी
मंद ज्योत ती मीच तेवती,
विरघळणा-या चन्दनात मी
कधी मीरेची एकतारी मी
कधी राधेच्या मन्थनात मी
वससी माझ्या अंतरात तू,
अविरत तुझिया चिंतनात मी
कळी पाकळी फुलवित जाते
जणु भ्रमराच्या गुन्जनात मी
पारिजातकापरी शिंपिले
सौख्य तुझ्या रे अंगणात मी
तुझ्या प्रीतीचा चन्द्र जडविला
नक्षत्रांच्या कोंदणात मी
भाग्यदैवता, तुलाच जपले
भाळावरच्या गोंदणात मी!
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Taxonomy upgrade extras
मिसळपाव