Skip to main content

मैफल

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 16/03/2009 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजमधली अत्यंत हुशार, उत्साही, लाघवी आणि नंतर "श्रीमंत पतीची राणी "झालेली एक मैत्रिण अचानक एका लग्नात भेटली. त्यावेळी तिच्या भाग्याचा हेवा करणार्‍या सगळ्याच मैत्रिणींची तिच मनोगत ऐकल्यावर जी अवस्था झाली, तिच वर्णन करण कठीण होत. तरीही या गझलेत तिच्या भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मांडण्याच कारण इतकच, की सगळीच दु:ख आपली नसतात, पण ती आपली कधी होतील, याचा नेम नाही. त्यात व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर!
Taxonomy upgrade extras

आणखी काही मुक्तके

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 16/03/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती अशाश्वताच्या वळुनी मुठी, शाश्वतावर चढवु हल्ला, असंतोषाचा करुनी भाला, काळावरती घालु घाला..!!
गवंडी घाम घालतो रक्त सडा अन जखमातुन गळतो पू मरणारा परी मरे परंतू जगणा-यांचे त्यावर कंपू...!! भिकारी बन्द गिरणीच्या गेटा वरती भीक मागतो एक भिकारी घेउनी हडांची जीर्ण पंजरी द्या हो म्हणतो मला नोकरी अन गिरणीचा तो काळाठिक्कर असूनी दगड क्षणांत रडला हे श्रमाचे हात
Taxonomy upgrade extras

कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो

लेखक निखिलचं शाईपेन यांनी सोमवार, 16/03/2009 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकगीत हवे आहे : साळसूद (दिलीप प्रभावळकर) मालिकेचे "कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो......" ओळी किंवा म्पी३

<शीघ्र कवीची एक कविता>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 16/03/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते सारेच रस्ते तीच्या घराकडे जाणारे , मोरपीस. एक-दोन-तीन-चार म्हणताच काटा आणणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत सावज दाखवण्यासाठी निघालेला, ती च्या भावाच्या गँगलाही माझ्यापर्यन्त आणून सोडणारा.

हात

लेखक मी गौरी यांनी सोमवार, 16/03/2009 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
हे अजुन एक असेच.

(शीघ्र कवीच्या तीन वेता!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 16/03/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्यांच्या धाकाने आमच्यातला कवी मेला!" असं म्हणणारे प्राडॉ जेव्हा तब्बल तीन-तीन कवितांचा नजराणा घेऊन आलेले बघितले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि आम्ही लगोलग मुद्याला हात घातला ;) कवितेच्या बागेत कळ्या सजतात कविता कळ्यांना स्वतःच्या केसात खोपा करुन माळतेही. तसा विडंबक आसुसलेला असतो कळ्यांच्या निवासी खोप्याला, होतं काय, ओळींतून सुकलेली फुलं पडतात आणि विडंबक निराश होतो! दोन गावंढळासारखी दळता येत नाही पिठासारखी भसाभस कविता मुकाट्यानं शांत बसावं एका जागी, तर तेही नाही जालावर येतो हायसे वाटण्याचे क्षण मिळावेत म्हणून, तर इथेही कवीच्य

ग्लोबल वॉर्मिंग (देवद्वार छंद)

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 16/03/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पाहता पाहता काळ दारी आला सारी वसुंधरा संकटात….१ ऊतले मातले गर्वात नाचले बेफाम वागले सान थोर….२ वाहनांची रीघ जणू पाठशिव हवेचाच जीव घुसमटे….३ यंत्रांचा निघाला धूर काळा काळा प्लॅस्टिकचा मळा त्यात फुले….४ विज्ञानाने केली आपली प्रगती आणि अधोगती आपणच….५ पाहू एक स्वप्न करूया प्रयत्न जपूया हे रत्न पृथ्वी नामे….६ कापडी पिशवी प्लॅस्टिक ऐवजी जमे ही सहजी सुरूवात….७ मोटार गाडीला ठेवुनी बाजूला पायी पायी चला शक्य तेव्हा….८ लावू झाडे, वृक्ष माळरानी रूक्ष मुलांचे भविष्य तगवाया…. ९
Taxonomy upgrade extras

अर्थ कुणी सांगेल काय?...

लेखक झंडू बाम यांनी सोमवार, 16/03/2009 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायाशी पडते भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये हासशील हास मला, मला हासू ही सोसेना अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना हे गाणे ऐकताना हुरहुर लावते. खूपवेळा ऐकूनही समाधान होत नाही म्हणून वारंवार ऐकावेसे वाटते. मात्र त्यातील शब्दांचा अर्थ काही लागत नाही. गाण्याचे रसग्रहण कुणी करेल काय? किवा अर्थ कुणी सांगेल काय?...

चिकन व सुरणाचे वडे

लेखक जागु यांनी सोमवार, 16/03/2009 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य : पाव किलो बोनलेस चिकन २०० ग्राम सुरण आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण, हिंग चिमुटभर, हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धे लिंबु चवी पुरते मिठ बेसन व कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी अर्धा वाटी. तळण्यासाठी तेल. क्रमवार पाककृती: प्रथम चिकन व सुरण वेगवेगळे वाफवुन शिजवुन घ्यावेत. नंतर ते पाणी काढुन कुस्करावेत. नंतर चिकन, सुरण, वाटण, गरम मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, मिठ, हिंग हळद सर्व एकत्र करावे. आता बेसन व कॉर्नफ्लॉवर एकत्र करुन त्यात चवीपुरते मिठ हिंग हळद घालुन पाणी टाकुन भज्यांच्या पिठाप्रमाणे जरा घट्ट कालवावे.