लेखकबामनाचं पोरयांनी गुरुवार, 19/03/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
होळीच्या निमित्ताने आमचा विशेष वृत्तांत... सर्व वाचकांना होळीच्या मनापासुन शुभेच्छा !!
१) चांद्रयानला अभुतपुर्व प्रतिसादामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशापूढील सर्व प्रमुख प्रश्न आता जवळपास सुटल्यात जमा आहेत. चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो पाहुन कृतकृत्य झालेल्या काही बांधकाम व्यवसायीकांनी स्वता:हुन मुंबईतल्या सर्व रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. चांद्रयानने पाठवलेल्या चित्रफीत भारतात खेड्या-पाड्यात सामुदायीकपणे दाखवल्या गेल्या. यावेळी गावकरयांनी अभुतपुर्व एकी दाखवुन आपसातले सर्व तंटे मिटवले ( चंद्राच्या साक्षिने) . " तंटमुक्त गाव" योजना एका रात्रीत पुर्णत्वास गेली आहे.
लेखकचिरोटायांनी गुरुवार, 19/03/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वि(म्हणजे १९९५ पर्यन्त वगैरे) बहुतान्शी व्रुत्तपत्रे (मराठी/इन्ग्रजी/इतर) चान्गल्या दर्जाची असायची.व्रुत्तपत्रान्ची वैचारिक बान्धिलकी जरी कुठलिही असली पत्रकारान्चे लेखन नि:स्प्रुह व भावना न भडकावणारे असे.मराठीत गोविन्द तळवल़कर्/माधव गडकरी वगैरे सम्पादकान्चे सम्पादकिय विद्वत्तापुर्ण असे.सम्पादकिय भुमिकेविषयी वाद होवु शकतील पण पूर्ण अभ्यासाअन्तीच त्यान्चे लेख असत.
लेखकजागुयांनी गुरुवार, 19/03/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे दिवस लहान व्हावे
बाल लिलांचे दार उघडावे.
बाल कल्पनांत जगावे
चॉकलेट च्या बंगल्यात रहावे.
परीच्या देशात आभाळी उडावे
गोळा, आईस्क्रिमने तोंड माखवावे.
माती, चिखलात लोळावे
पाण्यात जाऊन डुंबावे.
भातुकली, खेळ खेळावे
आयते खाउन गाढ झोपावे.
जिभ काढुन दुसर्यास चिडवावे
मार खायचा चुकवावे
शुभंकरोती रोज म्हणावे
जोरजोरात ओरडावे
खुप हसावे खुप रुसावे
हट्टालाही पेटून उठावे
थोडे दिवस निरागस, निष्पाप व्हावे
जबाबदार्यांना थोडे टाळावे.
लेखकचंद्रशेखर महामुनीयांनी गुरुवार, 19/03/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मन.....
मन आभाळ आभाळ... मन पाऊस पाऊस..
मन आभास आभास... मन सुवास सुवास...
मन चांदवा चांदवा.... नभी चांदण्याचा थवा
मन पाखरु पाखरु.... मन पारवा पारवा....
मन वेल्हाळ वेल्हाळ... मन कल्लोळ कल्लोळ
मन तुफ़ान उधाण... मन पान सळ्सळ.....
मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी...
मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी.....
मन हवंस हवंस.... मन नकोसं नकोसं....
मन चांदणी पुनव... विना चंद्राची आवस......
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....
मन काहुर-प्रतिक्षा... मन कासाविस आशा....
वाट पाहून पाहून.....
लेखकअ-मोलयांनी गुरुवार, 19/03/2009 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक "विनोदी" लेख वाचनात आला. इंग्रजीमध्ये बुकर बिकर अशी तथाकथित प्रतिष्ठेची पारितोषिके मिळवणारे लेखक म्हणे साहित्य अकादमीकडून डावलले जातात, असा हास्यास्पद आरोप त्यात करण्यात आला आहे. यंदा बुकर मिळवणारृया अडिगा यांचाही त्यात उल्लेख आहे.
यापुर्वी बुकर मिळालेल्या भारतीय लेखकांचे काही वाचलेले नाही, मात्र अडिगा यांच्या व्हाईट टायगरला बुकर मिळाल्यावर उत्सुकतेने कादंबरी वाचली...
आणि प्रचंड निराशाच पदरी आली. बुकर सारखे "प्रतिष्ठित" पारितोषिक मिळण्याइतकी गुणवत्ता या कादंबरीत खरंच आहे का, असा प्रश्न पडला.