Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

दि ड्रॉईंग्ज इन बोरिंग ट्रेणिंग !!

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स !! , णव्या जॉब ला जॉईन झालो .. गेले आठवडा झाले ट्रेणिंग णावाचा एक माहा बोरिंग कार्यक्रम चालू आहे .. अस्मादिक जरा दिडशहाणे असल्याने त्यांना कसल्याही ट्रेणींगची गरज वाटत नाही ... हे आपल्यासाठी नाहीच असे समजून अस्मादिक झोपा झोडणे , कमेंट पास करणे , विंडोज स्पायडर (पत्त्यांचा गेम) खेळणे .. इत्यादी कामे करून बाकी पेंगू लागलेल्या पब्लिक्स ला चैतण्य देण्याचं एक मोलाचं काम देखिल करतात ! अशाच एका बोरिंग सेशण मधे हि कलाकृती संगणकावर (एमेस पेंट) खरडण्यात आले !~~! अर्थात टाईमपास आहे ..

जगन्नाथाची रथजात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे ।
- जयदेव, गीतगोविंद
उद्यम कमी असला तरी उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ओडिया लोकांइतके उत्साही देशात (पर्यायाने जगात) सापडणार नाहीत. ‘बारो मास तेरो पोर्ब’ अशी म्हणच आहे. पोर्ब म्हणजे पर्व – सण/ उत्सवांना इथे पर्व – पर्वणी म्हणतात. वर्षभरात इथे किती सण होतात त्याची यादीच करतोय. प्रत्येक महिन्यात सरासरी तीन-चार तरी असतातच. रथजात्रा हा इथल्या उत्सवांचा राजा. मागे सांगितल्याप्रमाणे इथे ‘य’ म्हणता येत असले तरी बऱ्याच ठिकाणी ‘ज’ वापरला जातो.

पातेलीभर खिरीची गोष्ट!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 27/03/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी घरी होतो. काम करूनही कंटाळा आला होता. थोडंसं (कथित) पाककौशल्य दाखविण्याची खुमखुमी आली. शिवाय, मुलीच्या आवडीचा पदार्थ करून तिची मर्जी संपादन करण्याची संधीही होतीच. म्हणून मुदपाकखान्याकडे वळलो. काय करावं, काही ठरलं नव्हतं. नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! त्यामुळं वेगळा बेत आखला. कधीकाळी आजी रव्याची खीर करायची. तेव्हा मीही शिकलो होतो. बऱ्याच वर्षांत तिच्याकडे (म्हणजे, खिरीकडे) ढुंकून पाहिलं नव्हतं. म्हटलं, करून बघूया आज!

नवीन वर्षाचे संकल्प

लेखक मैत्र यांनी शुक्रवार, 27/03/2009 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुढी पाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक.. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करण्यास उत्तम दिवस. सर्व मिपाकरहो, चला काही संकल्प करूया - १. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कुठेही कुठल्याही स्वरुपात कचरा न टाकणे. अगदी चॉकलेटचा, मिंट किंवा त्या आकारच्या गोळीचा कागद, रॅपर इतका लहान कागदसुद्धा, प्लॅस्टिक कचरापेटीशिवाय इतरत्र कुठेही न टाकणे. २. अनेक वेळेस आपण स्ट्रॉ वापरतो. ती कचरापेटीतच टाकणे. ३. गड किल्ले, पर्यटन स्थळे इथे फक्त पाऊलखुणाच मागे सोडणे. आपण नेलेल्या सर्व वस्तु आणि इतर कचरा जसे प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे परत आणणे व कचरा पेटीतच टाकणे. ४.

मनाच्या कुपितले-सिंदबाद आणि परिक्षा

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा १४वा लेख (गुढी पाडव्यानिमित्य प्रकाशित) रामराम सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षाच्या कशा शुभेच्छा द्याव्यात ते समजत नव्हते म्हणून म्हणले एक लेखच लिहु त्यातला त्यात सर्वाना आवडलेला माझा लेख म्हणजे सिंदबाद कोल्हापुरात म्हणूनच आज सिंदबादला सफरीवर घेवुन जातोय पुन्हा एकदा ..........सिंदबाद शाळेत तर सिंदबाद कोल्हापुरात खुप दिवस राहिला होता साहजीकच या काळात दहावी बारावीच्या परीक्षा ,इतरांच्या वार्षीक परीक्षा इत्यादी आलेच . नेहमी प्रमाणे कर्मधर्म संयोगाने तो तेथे प

माझं कोल्हापुर - भाग १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.

अवकाशातले पाहुणे

लेखक जिवाणू यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच ISRO ने एक प्रयोग हाती घेतला होता ,तो यशस्वी झाला आहे. अवकाशात तीन नविन प्रजातितले जिवाणु आढळले आहेत.त्यान्ची नावे शास्त्रज्ञान्च्या नावावरुन ठेवण्यात आली आहेत, नावे पुढिल प्रमाणे, Janibacter hoylei, Bacillus isronensis , Bacillus aryabhata,. बर्याच मिपाकराना या प्रयोगाबद्द्ल माहिती असेल /नसेल , म्हणुन कालच्या दै.सकाळ मधील डॉ. योगेश शोचे ह्यान्च्या ह्या लेखाची हि लिन्क द्याविशी वाटली. http://beta.esakal.com/2009/03/26114257/editorial-earth-and-environmen…

दादा म्हनले ... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/03/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
दादा म्हनले आंदोलन करा आमी बशी जाळ्ळ्या... दादा म्हनले चळवळ करा आमी दुकानं फोळ्ळी... दादा म्हनले सत्याग्रेव करा आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी... दादा म्हनले त्यो लै बोलतुया तेची जीभ तोळ्ळी ... दादा म्हनले आमी दिल्लीला चाल्लो आता वो.............? विशाल