Skip to main content

"ती एक स॑ध्याकाळ.........!!!!!"

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी सोमवार, 06/04/2009 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ती एक स॑ध्याकाळ.....!!!!" गेल्याच महिन्यात परिक्षा स॑पली आणि कामावर रूजू झालो. कामाचा ताण जरा जास्तच होता कारण १५ दिवसा॑चा गॅप पड्ला होता, त्यात आला तो मार्च एन्ड २००९ म्हणजे अजूनच काम........... तर असो काम स॑पता स॑पता अखेर एक दिवस लवकर निघालो. मनात खूप राग होता आता तो शा॑त कसा करायचा याचाच विचार करीत होतो. त्या दिवशी परिक्षा नूक्तीच स॑पली होती. पेपर देऊन एका OFFICE मध्ये गेलो होतो, तेथे जायला थोडा ऊशीर झाला.

आरोग्य आणि स्वस्थता

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 06/04/2009 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आरोग्य आणि स्वस्थता
आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती. कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. हीच विकृत अवस्था. विकृती. प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते. सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो. मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/04/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा चित्रपट बघीतलाय का? त्याचे परीक्षण द्या जरा. मी एकलेय की पब्लीक जाम खुष आहे या चित्रपटावर. थेटरात महाराजांना मुजरे होतात. जय भवानी जय शिवाजी च्या नार्‍यांनी थेटर डोक्यावर घेतले जातेय. महाराष्ट्राच्या दैवताबद्द्ल एकूणच छान चित्रपट दिसतोय. महाराजांचे नाव काढताच अंगावर रोमांच उभे राहतात तसे प्रसंग या चित्रपटात आहे काय? सचिन खेडेकर ने नेहमीसारखे यशस्वी कलाकाराचे काम केले असे समजले. जय भवानी ! जय शिवाजी !!

बुट पॉलीश

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/04/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबु, सिर्फ दो रुपीया लेगा. एकदम चकाचक पालीस करताय साब. पयले पालीस करवावो ..पसंद आया तो फीर पैसा देव, साब." मी लोकसत्तामधुन डोकं वर काढलं. 'एक तर दोन रुपयात पॉलीश आणि ते सुद्धा, तो आधी पॉलीश करणार...पसंतीस उतरलं तर पैसे द्यायचे.' काही तरी वेगळाच अनुभव होता हा. मला लगेच बोरीबंदरचे ते तथाकथीत अधिकृत पॉलीशवाले आठवले. त्यांच्या समोरच्या ठोकळ्यावर पाय ठेवले की फटदिशी पहिला प्रश्न येतो," छुट्टा है ना, बाद में झिगझिग नै मंगताय !" त्या पार्श्वभुमीवर हा सुखद वगैरे म्हणता येइल असाच धक्का होता. मी पेपर बाजुला ठेवला, त्याच्या कडे नीट पाहीलं. जेमतेम १०-११ वर्षाचं वय.

साठवणीतल्या आठवणी - २ : पोयनाड

लेखक जयबाला परुळेकर यांनी सोमवार, 06/04/2009 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही वरच्या जाहिराती या कधीं कधीं मधल्या कार्यक्रमापेक्षांहि छान असतात. आपल लक्ष वेधून घेणार्‍याहि असतात. त्या दिवशी अशीच पेप्सोडेंटची देढ गुना ची जाहिरात लागली होती. त्यात पर्स मोठी होताना दाखवली. आणखी काय काय दाखवले त्यांत एक फोल्डिंग पेला असा वर उचलून मोठा होताना दाखवला. ते मी बघितल आणि मी म्हटल जय (नातूमहाशय) बघ रे पोयनाडच्या घरी असाच पेला होता. जय म्हणाला यातून पाणी नाहीं का सांडणार? अरे मी खरच पहिलाय, हाताळलाय कित्ती वेळा अस सांगतानाच पोयनाडच्या म्हणजे माझ्या आजोळच्या असंख्य आठवणी, अरेबियन नाईट्ससारख्या सुरस आणि आता चमत्कारिक वाटतील अशा कथा आठवल्या.

बालगीत

लेखक दवबिन्दु यांनी सोमवार, 06/04/2009 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कविता स्वताच्या जबाबदारीवर वाचवी. १ होती उ आणि १ होती टु, दोघी गेल्या फिरायला, उ ला सापडला रुपया, उ म्हणाली आईला - आई, आई, याचं काय करु ? आई म्हणाली आण जा भाजी. उ : आई मी भाजी आणली. धुवु कशी ? सपासपा. चिरु कशी ? कराकरा. शिजवु कशी ? रटा रटा. खाऊ कशी ? मटा मटा. झोपु कशी ? डाव्या कुशी. पादु कशी ? ढुम्मदिशी. (लोकगित)
Taxonomy upgrade extras

तुझ्या मनात

लेखक जागु यांनी सोमवार, 06/04/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
आले होते सहजच तुझ्या मनात फेरफटका उगाच मारायला किती खोल आहे तुझ मन ते आत डोकावायला गांगरून गेले आत मी कुठल्यातरी कोड्यात फसले मी कोड्यात होती खुप घरं प्रत्येक घराला वेगवेगळे रंग प्रत्येक घराला वेगवेगळे रस्ते मध्येच कुठे कुठे बांधही घातलेले घर होत प्रतिष्ठेचं, कर्माचं खुप उंच आणि पसार्‍याचं घर होत आत्पेष्टांचं, मैत्रीचं जिव्हाळा आणि कर्तव्याने भरलेलं एक होत तुझ्या छंदाच, स्वप्नांचं सुबक पण कुंपण घातलेलं एक होत सामाजीक बांधिलकीचं गोर गरीबांच्या आश्रिवादाचं त्यातच एक घर माझही होतं सुंदर, प्रितीने सजवलेलं प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं कोड्याचा रस्ता सुटणारं.
Taxonomy upgrade extras

अहिराणी हिरा.

लेखक जिवाणू यांनी सोमवार, 06/04/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मी ऐकलेल्या, वाचलेल्या आणि पाहीलेल्या (नव साहित्यिकांनी केलेले) अहीराणी साहित्यात मला फ़ार रस वाटत नव्हता. मी तसे फ़ारसे नविन साहित्य वाचलेलं नाही किंवा वेळ मिळाला नाही ही दोघेही कारणं १०० % खरी आहेत. पण २००७ च्या दिवाळीत मला अहिराणी भाषेतली जादू कळली. मी दिवाळीत पिंगळवाड्याला (अमळनेर जि. जळगाव.) गेलो होतो. तिथे मी जत्रा , तमाशा ह्या गोष्टी फ़ार जवळून पाहील्या, तसा जत्रेशी माझा परीचय लहानपणापासुनच आहे. पण काही गोष्टी मला तेव्हा वर्ज्य होत्या त्या म्हणजे तमाशा इ. पिंगळवाडे गाव तसे लहान पण दिवाळीत तेच गाव पाच पटीनी वाढलेलं वाटायचे, याचं कारण म्हणजे भवानी देवीची जत्रा.