Skip to main content

सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 19/04/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण
दोन - चार दिवसांपुर्वीच 'सनई-चौघडे' हा चित्रपट पाहिला. खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. 'कांदेपोहे' या नावाने मी हा चित्रपट पाहण्या अगोदर एक लेख येथे लिहिला होता. या चित्रपटाला इतके महत्व देणे अवास्तव नव्हते हे या चित्रपटाने सप्रमाण सिध्द केले. उत्कृष्ट संवाद, उत्तम अभिनय या सर्वांनी हा चित्रपट उत्तम झाला आहे. मराठी चित्रपटातील संवाद प्रभाव पाडत नाही हा समज ''सगळे पुरूष सारखे असतात, पण एकसारखे नसतात'' अशा संवादानीं खोटा ठरवलेला आहे.

फिरेन्झ -कलानगरी

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 19/04/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर 'रोमायण' घडल्यापासून इटलीला जायचा मी धसकाच घेतला होता. दिनेश कामानिमित्त मिलानला ३,४ दा जाऊन आला तरी प्रत्येक वेळी मी आपली कारणं काढून घरीच थांबले होते पण फिरेन्झ, काप्री ,नापोली आणि अशी कितीतरी जणं खुणावत होती, बोलावत होती. ते आकर्षण होतंच दडलेलं.. अशातच विपिनचं डॉर्टमुंडचं बिर्‍हाड फिरेंझला हललं. आता तिथे एक आपलं घर आहे, विपिनने फिरेन्झशी चांगली दोस्ती केली आहे, आता इटलीला जायला हरकत नाही असं मनाला समजावून, बजावून शेवटी इस्टरच्या सुटीत फिरेन्झचे बुकिंग केले.

सर्वाधिक वेळा पहायचे टाळलेले चित्रपट

लेखक टारझन यांनी रविवार, 19/04/2009 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स, आपण टिव्हीवर चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ? पण एखादा चित्रपट डोक्यात गेला , तर कधी तो पुन्हा पघायचा येडचापपणा टाळतो! खरे की नाय ? पण केबल वर पण रोज नवनवे चित्रपट कुढनं दाखवणार ? मग आपण चॅणल चेंज करतो ..खरे की नाय ? माझ्या ओळखीतल्या एका इसमाने त्याचं पोरगं अभ्यास करत नाही म्हणून , "लव्ह ष्टोरी २०५० " हा चित्रपट दररोज एकदा, ह्या दराने सलग तीस दिवस दाखवला होता, त्या पोराची जी दातखिळी बसली आणि ते जे अभ्यासाला बसलं ते डायरेक्ट १०वी बोर्डाची परिक्षा पाहिल्यावरंच उठलं .. शाळेत पैलं आलं हो ते ..

शनिवारवाड्याचे रहस्य (कथा)

लेखक सागर यांनी रविवार, 19/04/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, पुढील कथा मी कॉलेजमधे शिकत असताना लिहिली होती. त्या कथेत माफक बदल करुन मी ही कथा सर्व वाचकांच्या सेवेस सादर करत आहे, वाचकांना विनंती की आपले अभिप्राय जरुर द्यावेत. - सागर ------------------------------------------------------------ शनिवारवाड्याचे रहस्य -१- रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो.

धम्माल पिक्चर बोक्या सातबंडे

लेखक यन्ना _रास्कला यांनी रविवार, 19/04/2009 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मस्त पिक्चर पाह्यल. बोक्या सातबंडे. घरच्या सर्व लोकान्ला घेउन मुद्दाम होउन पाहन्यासारखा पिक्चर आहे तो. बच्चे कंपनीला तर फारच आवडेल पण मोठ्या माणसान्ला पन आवडेल.

मी बनवलेला ब्रेड..

लेखक मितालि यांनी रविवार, 19/04/2009 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावर या आठवड्यात प्रकाशित झालेली दिपाली ताईची ब्रेडची मस्त पाककृती वाचुन मी ब्रेड बनवायला घेतला. (थॅन्क्स टु दिपालि...) सुरुवात अगदी मैदा, यीस्ट खरेदी पासुन होती..दुकानात जाउन सर्व सामन आणले.. (परदेशी भारतीयांच्या साठी : - मैद्याला ऑल परपज फ्लॉअर म्हणतात.. ) पिठ मळताना पाणी जास्त झाले..मैदा घालुन कसे तरी एकदाचा गोळा बनवला...(प्रयत्ने वाळुचे कण रगडता तेलही गळे...) मग १ तास झाकुन ठेवला... पण काय तो डबल होइना.. कदाचित माझे यीस्ट मेलेले तर नव्हते ना अशी शंका आली...परत एकदा मिपावर रेसिपि पहिली... १५-२० मिनिटे टाइमपास केला..

आणि माझा मारुती झाला.

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 19/04/2009 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
शेवंताने दीव्याच्या ज्योतीवर भाकरी भाजली आणि मारुतीने अचंब्याने तोंडात बोट घातले. मुळ केसच्या ऑडीओ स्क्रिप्टमधले एफ वर्ड्स मी गाळलेले आहेत, आणि बरेचसे शब्द मवाळुन लिहीले आहेत _____________________________________________________ आई: अहो तुम्ही लेकीकडे बोलणेच बंद केले आहे. असे हे किती दिवस चालणार. जरा तीला जवळ घेउन बसा. नीट बोला. काय म्हणणे आहे तीचे बघा. नंतरचे त्रास वाचवायचे असतील तर आत्ताच स्पष्ट बोललेले बरे. बाबा: तु नसताना एकदा बोललेलो आहे. ती जे काही बोलते ते माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. तु बोलुन बघ. मात्र ती बोलेल ते सहन करायची ताकद आण आधी.

घर

लेखक यशोधरा यांनी शनिवार, 18/04/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.

टॉस द फिदर्स

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 18/04/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
नक्की पहा- आवडेल. मिपाकर महिलावर्गाला खासकरुन आवडेल असे वाटते.

सिक्कीममधे ट्रेकिंगबद्दल माहिती हवी आहे

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 18/04/2009 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
"मे" अंताला सिक्कीममधे ट्रेकिंगला जाण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने माहितीची जमवाजमव चालु आहे.. जालावर अनेक कंपन्यांची स्थळे आहेत, मात्र आजपर्यंत युथ हॉस्टेलच्या सिरीयस ट्रेकिंगची आवड असलेल्या मला ह्या टुरिस्ट ट्रेकिंगबद्दल साशंकता आहे. या निमित्ताने मला काहि माहिती हवी आहे ती येथे मिळेल या उद्देशाने हा काथ्याकुट उघडत आहे. मला हवी असलेली माहिती / पडलेले प्रश्न पुढिल प्रमाणे: १. टुरिस्ट ट्रेकिंग मधे खरोखर एकांत मिळातो का? का सगळा ट्रेक धोपटमार्गांवरून असतो? २. सिक्कीमधे कोणी ट्रेकिंग केले आहे का? (आम्हि साधारण ६-७ दिवसांचा ट्रेक करायचा विचार करत आहोत) असल्यास अनुभव कसा होता? ३.