Skip to main content

नवी शीर्षके

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 13/05/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : हा केवळ कल्पनाविलास आहे. ह्यातील काहिही खरे मानु नये. मानल्यास लेखक आणि प्रतिसादक याना जबाबदार धरु नये. केवळ दोन घटका गम्मत म्हनुन हा प्रपंच आहे कोणिही भोचक जीव्हारी लागतील असे प्रतिसाद देउ नयेत ही विनन्ती. नव्या लेखा करीता संशोधीत काही नवी शीर्षके काही लेखकानी राखुन ठेवली आहेत. ती ह्या प्रमाणे राजे : पलायन : प्रकार एक राजे : पलायन : प्रकार दोन राजे : पलायन : प्रकार तीन राजे : पलायन : प्रकार चार ( एकुण प्रकार .

बाबुजी.. एक रेखाटनाचा प्रयत्न.

लेखक राघव यांनी बुधवार, 13/05/2009 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
साद स्वरांची अलगद देते स्पर्श सुखाचा नवा.. नाद सुरांचा गाऊन जातो संध्याचळी मारवा! गोड सुरावट सहज छेडती बोल अमृताचे.. ताल लयीचा तोल पेलती साज प्रेषिताचे!! राघव
From Sketches

मदत हवी

लेखक मोहन यांनी बुधवार, 13/05/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मला श्री. सुरेश वाडकरांनी गायलेल्या " आताच अमृताची बरसून रात्र गेली" ह्या गझलेची ऑडीओ फाईल हवी आहे. कुणी मिपाकर मदत करु शकत असल्यास लिंक पाठवावी. धन्यवाद मोहन

निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 13/05/2009 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई हंसत हंसत येताना पाहून मला खात्री झाली की काही तरी ते मला आनंदाची बातमी सांगणार आहेत.वाटेत ओळखीचा असो नसो ते सर्वांशी हंसत होते.हे जरा मला निराळंच वाटलं.एका लहान मुलाने त्यांना, "हाय ग्रॅन्डपा!" असं म्हटल्यावर थांबून त्याच्या पाठीवर थोपटून हंसत होते. जवळ आल्यावर मी त्याना विचारलं, "काय भाऊसाहेब,आज बरेच आनंदी दिसता.मघापासून मी बघतोय तुम्हाला तुमचा चेहरा हंसरा दिसतो.म्हणजे तो एरव्ही नसतो अशातला भाग नाही,पण आज जरा विशेष,काय गौडबंगाल आहे.?" "कर्माचं गौडबंगाल,अहो मला तुम्हाला माझी जुनी एक आठवण न विसरता सांगायची होती.म्हणून निघतानाच त्याची पूर्व तयारी करीत आलो आहे." हे त्यांच्याकडून

घाम

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 13/05/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय के.एस.देवेगौडाजी, कशी आहे आपली तब्बेत. आपल्याला मस्तकशुळ झाल्याचे विविध वाहीन्यांवर पाहीले म्हणुन हा पत्रप्रपंच. मला डोके आहे असा गैरसमज झाल्यामुळे माझ्या सासुबाईंनी विशिष्ठ प्रकारांच्या फुलांचे एक तेल पाठवले होते. मस्तक शुळावर रामबाण उपाय. कुठल्या पत्यावर पाठवायचे ते व्य. नी. ने कळवा. टोकन नंबर पुकारला जात नाही म्हणुन म्हणुन मधल्या वेळेत आपण मिपा उघडले की काय? ...... आणि माझे मारुती-१, मारुती २ हे लेख वाचलेत की काय? ह्या लेखांनी काही सदस्यांना असाच मस्तकशुळ दिला होता. त्यातल्या नायिकेच्या स्वभावाशी आपले वर्तन मिळते जुळते आहे ह्या भावनेचा आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमस्व.

माझी मद्रास ची सफर

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 13/05/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... मी मिपा ची एक शांत वाचक.. ईथे बरीच मंडळी धो-धो लिहीताना पाहून वाटे.. की आपणही लिहावं.. पण का कोण जाणे.. पट्कन गूगल क्रोम उघडले जाते... नी त्यात.. एक अक्षर खोडले , की पुढची अक्षरं बोंबलतात.. पण आताशा ही उर्मी जरा जास्तच उचल लागलीय... कारणे दोनः एक, पेशावर मधल्या एका गायिकेची भावांकडून हत्या.. कारण काय.. तर ती टी. व्ही. वर गाते... आणि दुसरे.. देवांनी चालु केलेली.. मद्रास ची लेखमालीका... चला... काही कारणाने सुरुवात तर होतेय... मी हे माझ्या तिथल्या वास्तव्यातले अनुभव मांडतेय... काही नव्याने माहीत झालेल्या गोष्टी... काही विचित्र वाटलेल्या.. त्यातल्या काही तर खुपच खटकलेल्या...

(सोडू नको)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/05/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! ;) संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे? हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको! केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको! पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! चतुरंग

एका बेसावध क्षणी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले चांदण्याचे कवडसे अंगणात शिंपून मी चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी नामदेवाची पायरी तशी दारी थांबून मी माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिन्दू तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी एक
Taxonomy upgrade extras