माझी मद्रास ची सफर
नमस्कार मंडळी...
मी मिपा ची एक शांत वाचक.. ईथे बरीच मंडळी धो-धो लिहीताना पाहून वाटे.. की आपणही लिहावं.. पण का कोण जाणे.. पट्कन गूगल क्रोम उघडले जाते... नी त्यात.. एक अक्षर खोडले , की पुढची अक्षरं बोंबलतात.. पण आताशा ही उर्मी जरा जास्तच उचल लागलीय... कारणे दोनः एक, पेशावर मधल्या एका गायिकेची भावांकडून हत्या.. कारण काय.. तर ती टी. व्ही. वर गाते... आणि दुसरे.. देवांनी चालु केलेली.. मद्रास ची लेखमालीका...
चला... काही कारणाने सुरुवात तर होतेय... मी हे माझ्या तिथल्या वास्तव्यातले अनुभव मांडतेय... काही नव्याने माहीत झालेल्या गोष्टी... काही विचित्र वाटलेल्या.. त्यातल्या काही तर खुपच खटकलेल्या...
मिसळपाव