Skip to main content

पाऊलखुणा

लेखक स्वप्नयोगी यांनी बुधवार, 13/05/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
तू वाटेवरुन गेलीस की माझं पाउल तिकडं वळतं, जाता जाता मन माझं तुझ्या पाऊलखुणा शोधत जातं.

मिपावाल्याचे गाणे

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 13/05/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा एक खूप गरीब मिपावाला मिपावर आनंद मिळवायला (हॅपिनेस) येत असे. टोकाच्या सालसपणामुळे त्याच्याकडील प्रतिसाद देण्याची शैली अगदी सोज्वळ असते व त्यातुन हिन आणी हिणकस काथ्याकुट, लेख डोक्यावर कधी चढुन जात हे त्याला बिचाऱ्याला मिपावर आनंद मिळवताना कळतही नसे. त्याची दया येऊन एक कंपुबाज त्याला एक नवी कोरीकरकरीत प्रतिक्रिया द्यायची स्टाईल देतो. त्यामुळे प्रतिसादातुन आसुड घेऊन मारताना साहजिकच त्याचे मन आनंदुन जाते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो- "आ देखे जरा किसमे कितना है दम".. असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!

अंत... भाग-२

लेखक दशानन यांनी बुधवार, 13/05/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग १ ******************************** तीने हसून फोन कट केला, ह्याला कुठे घेऊन जाऊ हा विचार करत मी कधी रिंकीचा विचार करु लागलो कळालेच नाही, समोरुन ट्रकचा येणार प्रखर ज्योत माझ्या डोळ्यावर पडल्यावर मी अचानक ब्रेक मारले व गाडी एका बाजूला कलंडत आहे असे वाटले .... व गाडी कश्यावर तरी जोरात आदळली..... स्टेरिंग व्हिलवर डोके जोरात आपटले व गाडी एक चक्कर घेउन बाजूच्या डिव्हाडरला धडकली...एअर बॅग एकदम फुलली व माझ्या तोंडासमोर आली..

आकर्षण

लेखक जागु यांनी बुधवार, 13/05/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक युवक अन एक युवती दोघांची एकदा भेट झाली एकमेकांच्या तरूण सौंदर्याला भाळली तिच्या नाजूकपणाची त्याला छाप पडली त्याच्या धाडसीपणाला ती मोहरली प्रेम समजून आकर्षणात गुंतली संसाराच्या स्वप्नात रंगू लागली विवाहाच्या पिंजर्‍यात अडकली एक दोन वर्ष मौजमजेत गेली तो बाबा अन ती आईही झाली जबाबदार्‍यांची ओझी पडली विचार्-मतामध्ये चिर पडू लागली अवगुणांची आता छाप पडू लागली कर्तव्याची उणीव भासू लागली "माझेच खरे" ह्या शब्दाने उचल खाल्ली एकमेकांची सोबत नकोशी झाली घटस्पोटाची नोटीस दारात आली त्याची तलवार बाळावर पडली भितीची आसवे गालावर ओघळू लागली माझे आई बाबा ही जाणिव त्यालाच राहीली बाबा की आई आवडीची, निवड कोर्टाकडे
Taxonomy upgrade extras

नको तो रविवार !!

लेखक वडापाव यांनी बुधवार, 13/05/2009 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
चौथे चिमणराव ह्या चिं. वि. जोशींच्या पुस्तकात चिमणरावांना रविवार हा कधीच सुखाचा सुवर्णदिन वाटला नाही. त्यावरुन रविवारला हल्लीच्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून नावे ठेवण्याची मला कल्पना आली. ती पुढीलप्रमाणे मांडत आहे - मौजेचे सहस्रावधी क्षण वाटते असतील विलक्षण व्यर्थ जातात पण तोचि रविवार म्हणावा थोडक्यात काय, सुट्टी मिळते, पण फुकट जाते. शनिवारी शाळेतून प्रचंड गृहपाठ मिळालेला असतो. तो रविवारावर ढकलण्यात येतो. शनिवारीच काय ती मौजमजा!

जास्वंद

लेखक वडापाव यांनी बुधवार, 13/05/2009 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
पानापानांवरती आला शहारा कोमल भासला बोचरा वारा ! शाखेवरच अडल्या जलधारा फुलला पिसारा !! जीवनाचा प्रवास झाला सुरू लाडके असे ते माझे लेंकरू ! छेडितसे तयां दुष्ट पांखरू कसे सहन करु?
Taxonomy upgrade extras

बालकवी

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 13/05/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे.

भारत भेट

लेखक दवबिन्दु यांनी बुधवार, 13/05/2009 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
माजी एक मावसबहिन आहे तिचा बाबा आजारी होता म्हनुन ती मागल्या म्हईन्यात युएस वरुन भारतात आली एक फोर्टनायिटसाठी. ४ ला आलि आनी लगेच २३ ला गेली. तसच माजी एक फ्रेंड आहे ती तीच्या भावाच्या लग्नासाठी फिजिहुन इंडियाला २६ मार्चला आली आनी २९ मार्चला रिटर्न गेलि. आता पन माजा एक काका फुडल्या म्हैन्यात पुतनीच्या बारशाला म्हनुन २-३ दिवसासाटी दुबयहुन इथ येनार आहे. माज्या मनात येत कि ह्ये एनआरआय लोक वोटींग करन्यासाटी एक-२ दिवस इंड्याला का नाय येत. ते पन इम्पोरटन्ट नाय का. तेच्यासाटी वन्स इन फाइव इयर एक बारकी सुटी का नाय काडु शकत.