Skip to main content

चुकले का हो ?

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 14/05/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
(इलाही जमादारांच्या 'चुकले का हो ? ' ह्या अत्यंत सुंदर गझलेचे एक असुंदर विडंबन) श्वसुराला, त्रास म्हणालो, श्वसुराला, त्रास म्हणालो, चुकले का हो? मेहुणीला, 'लै खास' म्हणालो, चुकले का हो? (उरली) चिरंजीव वेदना, मस्तकी, हळहळणारी (कसली बर ? ) भाचरांना (तिच्या) , बकवास म्हणालो, चुकले का हो? बुडत्याला, तरण्यासाठी, काय लागते?
Taxonomy upgrade extras

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे -- १ १) संगीत पुण्यप्रभाव व संगीत राक्षसी महत्वाकांक्षा या दोन नाटकांची १९५० सालातली कोकणातल्या गुहागरातील जाहिरात. नटवर्य नानासाहेब फाटक, मास्टर दामले (नूतन पेंढारकर), मा दत्ताराम अशी मातबर ष्टार कास्ट! जाहिरातींवरून गुहागरातले दामले नावाचे कुणी वकील नाटकाची तिकिटं विकण्याचे काम पाहात असत असं जाहिरातीतून कळतं!

सोबत

लेखक जागु यांनी गुरुवार, 14/05/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर असावी सोबत कर्म, प्रेम्,संयम, ज्ञानाची संगत असावे तृप्ती, आनंद, समाधान रांगत सगुण घोळक्याची असावी सोबत दुर्गुणांना झाडण्या गुणांची संगत एकांतालाही करावी सोबत बरसणार्‍या सुख, दु:खाना झेलत आधारा द्यावा निराधारास क्षणभर असावी निर्मळ, निर्व्याज सोबत चुकलेली वाट दाखवण्यास सोबत .
Taxonomy upgrade extras

हर्क्युलस मी होणार

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 14/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल कधी नाही ते वैकुंठात गेलो होतो. जवळच्या स्नेह्यांचा पत्ता कट झाला होता. बाकीचे विधी चालु असताना त्यांच्याच ऑफिस मधल्या दोन तरुणांमधला संवाद सहज कानावर आला. "यार, अती तेथे माती म्हणतात ते हेच.. पिकनीकला गेला होता, तिथेच खपला. सिलदेफिनाल चे बळी. नॅन्ड्रेनॉल पण घेत होता." नाव ऐकुन आधी वाटले च्यायला कोकेन वगैरे आजकल 'पुराने जमाने की बात' वगैरे झाले का काय? 'जंगलात' हे नवीन ड्र्ग्ज कुठले आलेत ? हा काय प्रकार बॉ? गुगुल बाबाला विचारायचे ठरवले. पण नीट स्पेलींग नव्हते माहीत. म्हणुन 'कामशेत' मुक्त विद्यापिठांच्या कुलगुरुना फोन लावला. गुरुवारी सुट्टी ह्यांना.

प्रतिसाद

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 14/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद देणार्‍या त्या कंपूस उद्देशून (चाल:- प्रतिमा उरी धरोनी) प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित रहावे ते लेख निर्मितीचे विचार करोनी लिहावे उस्फुर्त भावनानी स्वप्नात गुंग व्हावे पुष्पात गंध जैसा लेखात भाव तैसा अद्वैत लिखणीचे त्यां जीवनी असावे तुम्ही सप्तरंग वाचनाचे व्हावे अनेक मतांचे विषय जीवनाचे चर्चीत कुणी बसावे का वाचकास वाटे प्रतिसाद कुणा भावे ते भावस्वप्न कुणाचे बेकार कुणी करावे प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित रहावे श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

व्हेज चीज ऑम्लेट

लेखक सायली पानसे यांनी गुरुवार, 14/05/2009 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ( २-३ जणांसाठी ) २-३ अंडी १ मोठा चमचा बटर कांदा - १ ( छोटा ) टोमॅटो - १ लहान सिमला मिर्ची - १/४ ( यात जर पिवळी आणी लाल सिमला मिर्ची असेल तर ति सुध्दा छान लागते) कोथिंबिर किंवा पार्स्ले - १ चमचा लसूण -३-४ पाकळ्या ठेचुन घ्या. हिरव्या मिर्च्या -३-४ लाईट सोया सॉस- १/२ छोटा चमचा टोमॅटो सॉस- १ चमचा चिलि सॉस - १/२ चमचा ( हे नसले तरी चालेल ) काळि मिरि पावडर ( ब्लॅक पेपर ) मोझ्झारेल्ला चीज किंवा अमुल चिज .

३५२ वर्षांची तळमळ.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 14/05/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मि.पा.कर ! आज १४ मे , एका थोर सेनानींची जयंती ! कुणाची हे आपण ओळखले असेलच असे गृहित धरुन लिहित नाही , पण पुढील लेखावरून त्याची सहज कल्पना येईल ! या अद्वितीय योध्द्यास कोटी कोटी प्रणाम ! उदय गंगाधर सप्रे-ठाणे. ३५२ वर्षांची तळमळ..... नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो ! आमचा जन्म आजपासून बरोबर ३५२ वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्‍या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे !

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजपर्यंत गाण्याबजावण्याच्या दुनियेत खूप मुशाफिरी केली. ती करत असताना अनेक जुनी-दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, इतिहासाची साक्षिदार असलेली जुनी-दुर्मिळ प्रकाशचित्रे माझ्या संग्रही जमा होत गेली. त्यातली काही प्रकशचित्रे आज इथे देत आहे. ह्या प्रकाशचित्रांचे श्रेय त्या सर्व अज्ञात प्रकाशचित्रकारांना. परंतु त्यावरील शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी अर्थातच तात्या अभ्यंकरांची..! १) ॐ भास्कराय नम: पं भास्करबुवा बखले. संगीताच्या दुनियेत खरोखरच ज्याला भास्कर म्हणावं असा गवई, उतम गुरू. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तीन घराण्यांवर हुकुमत.

एक्झिट पोल्स

लेखक विकास यांनी बुधवार, 13/05/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
संपल्या एकदाच्या निवडणुका! आता लगेच एक्झीट पोल्स येऊ लागलीत... ह्या दुव्यामधे या पोल्सवरून चर्चा तसेच नवीन (की जुनेच?) आशास्थान काय असू शकेल यावर तमाम इच्छूकांनी मते मांडावीत अशी विनंती. शिवाय एकदा का (अक्षरशः) निकाल लागले की येथे येऊन कोण किती बरोबर आले, कोणाचे शाईनिंग झाले ते पण समजून घेऊ शकतो. तर आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार काँग्रेस आणि त्यांचे साथीदारपक्ष यांना १८५ ते २०५ तर भाजपा आणि त्यांचे साथीदार पक्ष यांना १६५ ते १८५ जागा मिळतील.