Skip to main content

मौसमी....एक दुखरी सल (भाग २)

लेखक OBAMA80 यांनी शनिवार, 29/05/2021 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
.....ती रात्र मला अजून लख्ख लक्षात आहे. माझा पहिलाच दिवस. माझा मित्र अविनाश मुलांना शोधायला गेला होता आणि मी त्या तिकीट खिडकी जवळ आमची सामानाची बॅग सांभाळत उभा होतो.

दिठी- एक अनुभूती.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 28/05/2021 14:11 या दिवशी प्रकाशित केले.

दिठी, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणा-या सुखदु;खाची गाथा सांगणारी एक छोटीशी गोष्ट. अतिशय तरल, सुंदर, भावनांचा कल्लोळ, मनात निर्माण होणारे असंख्य विचार, सतत हिंदकळत राहावेत अशी एक उत्तम कलाकृती. एखादी सुंदर कथा, कादंबरी, वाचून झाल्यानंतर किंवा एखादं गाणं डोळे मिटून ऐकत राहावे, पुस्तक छातीवर उपडं करून त्या कथेत, संगीत मैफलीत रमून जावे त्यातून बाहेर पडूच नये असा आनंद देणारी कथा म्हणजे 'दिठी' मराठी चित्रपट.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

शहर सोडताना..

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 28/05/2021 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांत जास्त काय वाईट? सवय..! जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची बारची वाईन शॉपींची पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची.. शहर सोडताना अवघड जातं मग शहर काही वाईट नसतं.. पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू आणि कळतं की आता जावं लागेल.. निरवानिरव करावी लागते मग दूधवाला गॅसवाला पेपरवाला आवराआवर बांधाबांध भांडी गाद्या चादरी पडदे कपडे बॅगा सगळंच.. बडवायजरच्या साचलेल्या कॅन्सची विल्हेवाट ॲशट्रेचा कधी नव्हे तो मोकळा श्वास रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं नाही नाही म्हणता म्हणता काय काय जमवलेलं असतं ह्या डायऱ्याही संध्याकाळी नदीत सोडून दिलेल्

वामकुक्षी की जाम कुक्षी?

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुपारी झोपावे की जागे राहावे हा प्रश्न आम्हाला करोना पर्वात रोज पडत आहे. या निशा सर्व भूतानां तस्याम् जागर्ति संयमी! असे भगवंत गीतेच्या कुठच्याश्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात म्हणतात. (येथे त्या अध्यायाचा आणि श्लोकाचा क्रमांक शोधून काढून तो येथे लिहून, आम्हाला भगवद्गीतेचे किती सखोल ज्ञान आहे हे वाचकांना वरवर दाखवून छाप पाडण्याचा मोह होत होता. परंतु आम्ही पडलो कमालीचे विनम्र आणि प्रामाणिक! त्यामुळे तसे केले नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी! लोभ असावा!!) जेव्हा सामान्य भूत मात्रांची रात्र असते (आणि ते झोपलेले असतात) तेव्हा संयमी जागा असतो असा त्याचा भावार्थ आहे.

गेल्या सहस्त्रावधी वर्षांत हिंदुस्थानमध्ये लागलेल्या होळ्या!!

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या होळीला मला आठवल्या त्या राजपूत स्त्रियांनी केलेल्या जोहारच्या होळ्या पृथ्वीराज, संभाजी महाराज, राजा दाहीर यांनी केलेल्या सर्वस्वाच्या होळ्या, नंतर इंग्रजांबरोबर स्वातंत्र्ययुद्धात अनेक वीरांनी केलेल्या आपल्या संसाराच्या होळ्या. जन आला दिन होळीचा, उधळीत विविध हे रंग आसेतु-हिमाचल राष्ट्र, होलिका स्वागता दंग ! उत्साह खरोखर मोठा, पक्वान्ने घर घर बनती पण मज या हर्षोल्हासी, वेगळ्या होलिका स्मरती! भूपाल सिंध प्रांताचा, आठवतो मज दाहीर ज्याने पहिला या देशी, झेलला यावनी वार! कोणी न सहाय्या आला, आर्यावर्तातुनि वीर धन, दासी, पत्नी, कन्या, वृक लुटून गेले पार! (वृक=लांडगा) सिंधची जाहली होळी,

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 27/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

मृत्यूचा दंश

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/05/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही. पण डोळसपणे बघितलं तर कळतं की, मृत्यु ही शाश्वत गोष्ट आहे.

अर्धवट कागदे. - कथा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 26/05/2021 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.एकूण पाच भागात ही कथा प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यातील एक भाग आज प्रकाशित होत आहे. ---- माझ्या बदलीला आता फक्त एक आठवडा राहिला होता. अजून बरीच पॅकिंग राहिली होती. घरातला पसारासुद्धा काढायचा होता. आमची अडगळीची खोलीसुद्धा डोळ्याखालून घालायची होती. बराच पसारा होता त्या खोलीत. खोलीत गेलो आणि तिथले बाबांचे पुस्तकाचे शेल्फ स्वच्छ करत बसलो. एकाहून एक जाड पुस्तके तिथे कोंबून बसवली होती. त्यातली कित्येक पुस्तके वर्षानुवर्षे तिथेच पडली होती. त्यातल्या एका पुस्तकाची तर पानेही बाहेर निघत होती. ते पुस्तक नीट करायला मी ते बाहेर खेचले.