Skip to main content

चालुकेश्या

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 18/05/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा शरदिनी यांची गुढ कविता कारुण्याशा... चालुकेश्या... एक तारुण्यजालावरचा काव्यभीषण शब्दसेट मस्तकल्पनेच्या स्वयंभूधुंद अनर्थ काढा डुर्र डुर्र डुर्र डुर्र फक्ततात्याचा शब्दवैचित्र्याने दिपलेला सुन्नप्रतिसाद अन नवकवितेतून धनंजयाकडे वळणारा ग्रहणप्रवाह धड धड धक धक प्रतिसादांच्या दलदलीतला डबलबॅरल वाचकवॄंद स्व-हाताने बडवून घेतलेला अवलिया खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका काव्यपिंपळावरून पुनश्व हरि ओम केशवसुमारांची अचानक कडाडबूम चालुकेश्या ठो ठो ठो... अन मग सारंच शांत.. पुढच्या विडंबनापर्यंत...

एका आय सी यू तली आठवण

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 18/05/2009 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
कळिकाळाच्या हिंदोळ्यावर मीपण जळले रुसले तुटले अद्वैताच्या पुण्याईशी ललाटरेषा जुंपून घेते पुन्हा विखारी तल्लख अडसर अर्थव्यथेचे फ़ासे फ़सले प्राणपाखरू उडता उडता काय राहिले, कोणी न उरले १७ मे २००९, पुणे ________________________________________ एका गरीब रुग्णाच्या कुटुंबाला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक ताकद नसल्याने कठीण परिस्थितीतून जावे लागले, तो प्रसंग पाहिल्यानंतर त्या आठवणीत लिहिलेली ही कविता आहे..... यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देणे मला अशक्य आहे.... ...
Taxonomy upgrade extras

निरिक्षणाशा ...

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी रविवार, 17/05/2009 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा शरदिनीताईंची माफी मागून, माझी निरीक्षणाशा... एका निरीक्षणाचा कचराग्रस्त डेटासेट अभ्यासकाच्या पारख्या नजरेची कात्री कर्र कर्र कर्र उरलेल्या डेटाचे गायलेले भारूड अन डेटाचा म्यापकडे चुकतमाकत होणारा प्रवास लब डब लब डब नयनांच्या भोकांसमोर दिसणारे हिरवे बिंदू रक्तवारूणीच्या अंमलाखालचे विसंवादी बोल खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका ऑब्झर्व्हेशनमधून निघणारा पेपर त्यावर होणारा अभिनंदनाच्या इमेल्सचा वर्षाव धो धो धो... अन मग सगळंच तुलनेने शांत ... पुढच्या जी.एम.आर.टी.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १५० नेते.. ७३ वर अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 17/05/2009 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स च्या या वृत्तानुसार: "....गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सुमारे १५० नेते लोकसभेवर निवडून गेले असल्याचे ताज्या लोकसभा निवडणूक निकालांनी दाखवले आहे.

कसाब काल म्हणाला अजुन मी बाल रे '

लेखक ग्रीष्म यांनी रविवार, 17/05/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसाब काल म्हणाला अजुन मी बाल रे ' की खटला लांबवयाची तुझी नवी ही चाल रे' जर तू खरच होता लहान मग कस कल कर्म हे घान का घातली ही मरणाच्या तोंडात मान रे का माजला होता २६/११ ला तुझा तो जिहाद्चा अभिमान रे का घातला गोंधळ माजवला तांडव का थाटला ताज मधे तुमच्या जिहादचा मांडव आज जिवावर खेळुन जिंदा तुझ्या आवळल्या मुसक्या किती खाल्या लाथा अन सांगशील का कसा दावला पोलिसांनी खसक्या.. अरे शंडा ही bhumi असे करकरे सारख्या शुरांची ही माता आहे साळस्कर सारख्या शुरांची हे बच्चे असे शिवाजी सारख्या वाघाचे हे सैनिक असती मराठ्यांच्या भगव्या झेंडयाचे का आता सुटली वाचा जेंव्हा खाल्या हिन्दुस्तानी लाथा ? कशाला रे आम
Taxonomy upgrade extras

ओढ माहेरची

लेखक जयवी यांनी रविवार, 17/05/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतं लग्न होऊ दे नाहीतर लग्नाची पंचवीस वर्ष होऊ देत……. माहेरी जायचं म्हटलं की एक आगळाच आनंद होतो…….आईला आणि लेकीलासुद्धा. आपल्या कोडकौतुकात वाढलेली लेक एकदम दुस-याला देऊन टाकायची आणि मग वर्षातून किमान एकदा तरी तिला भेटायची इच्छा कुरवाळत कुरवाळत दिवस पुढे ढकलायचे. “निघाले आज तिकडच्या घरी….” म्हणणा-या लेकीला डोळ्यात साठवून अश्रूंच्या पडद्यातून निरोप द्यायचा आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं. आपल्या भारतीय संस्कृतीतच असतं मात्र हे असलं जीव लावणं. सगळं आयुष्य मुलांभोवती गुंफ़णं. त्यांच्यापलीकडे विचारच करायचा नाही.

लोकसभा निवडणुक निकालांचे अंदाज: माझे गेस्टीमेट किती बरोबर किती चूक?

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 17/05/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच उत्तर भारत , पश्चिम भारत , दक्षिण भारत , पूर्व भारत आणि एकत्रित अंदाज मार्च महिन्यात व्यक्त केले होते.लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर माझे स्वत:चे अंदाज व्यक्त करणे हा माझा आवडता प्रकार आहे.यावेळी प्रथमच मी हे अंदाज आंतरजालावर प्रसिध्द केले. आता यापैकी किती बरोबर आले आणि किती चुकले हे शक्य तितक्या थोड

मिहार

लेखक दवबिन्दु यांनी रविवार, 17/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोनतीबी सोसायटी म्हनली कि डोल्यापुढ आपसात भांडनारे सोसायटी मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन कान्दीवली मधी चारकोपला येक मिहार नावाची हायफाय हौसिंग सोसायटी हाए तिथ कोन्त्याबी मेंबराकड लग्न, एन्गेजम्येंट आस कायबी आस्ल तर सोसाटीतले सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. नंतर लग्न, एन्गेजम्येंटच्या ४-५ दिवस आधि सर्वे मिळुन रातभर नाच गाणी म्हंतात. मी गेल्या वेळला तिथ गेलो व्हतो आमच्या पाव्हन्याकड लग्न होत तर सर्वे जमले आनि परत्येकान सारी रात जुन्या हिंदी पिक्चरामधली गानी म्हटली. सोबतीला ढोल्की होती आनी घुंगरु, पन्जाबी चिपल्या आस काय काय होत. जास्त करुन लताजीची गानी म्हटली.