Skip to main content

सरप्राईज

लेखक दिपक यांनी गुरुवार, 28/05/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
"चल ऊठ चार वाजले. ऊठतोयेस ना?" आईच्या आवाजाने झोपेला झटकुन ऊठुन बसलो घड्यळ्यात पाहिले तर चार वाजुन गेले होते. ज्यासाठी दादर स्टेशनला जायचे आहे तोच विचार मनात. आई मला उठवुन परत झोपली मीच सांगितले तसे. 6.30 ची गाडी आहे लवकर पोहचायला हवे हे मनातच बोलुन फटाफट आंघोळ वगैरे आटपुन तयार झालो.. घड्याळ्यात पावणेपाच. चहा बनवला दुध टाकायला गेलो तर दुध नासलेले. चहा तसाच बेसीन मध्ये ओतुन चहाची तहान पाण्यावर भागवुन बाहेर पडलो. बिल्डींगमधुन बाहेर पडलो तेव्हा दुध पोहचवणाऱ्या पोरांची धावपळ चालु होती. शेजारच्या बिल्डींगखाली पारिजातकाचे झाड आहे काही सेंकद तिथे घुटमळलो. प्राजक्तांचा सुंगध छातीत भरभरुन घेतला.

चानी (च्यानी नव्हे चानी चांगल्यातला चा )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 28/05/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात खारीला-squirrel-चानी म्हणतात.हा तोंडाकडून उंदरासारखा दिसणारा प्राणी पूरा पाहिल्यास फारच मोहक वाटतो.पूर्वी परदेशात मोठ्या चान्यांच्या कातड्याच्या श्रीमंत स्त्रीया पर्स म्हणून वापरायच्या.प्रभू रामचंद्रांच्या लंकेपर्यंत सेतू बांधण्याच्या प्रयासात चानीचा वाटा होता.समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून मग किनार्‍यावरच्या वाळूत लडबडून झाल्यावर अंगावरची वाळू पुलावर टाकायला मदत केल्याच्या प्रयत्नाबद्दल भावूक होऊन प्रभू रामचंद्रानी प्रेमाने तिच्या पाठिवरून बोटं फिरवली.

पण म्हणुन काय झालं.....?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 27/05/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
चौथा पेग संपला सिगारेट विझवली... आणि तारवटलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला मित्रा, खुप आठवण येते रे तिची, तुला ? आठवण? मला नाही येत...! पाचवा भरला.... या वारुणीसारखेच रसरशीत होते तिचे मद्याने भरलेले नेत्र प्रीतीने ओथंबलेले, तुला आठवतात? आठवण? मला नाही येत...! आता शब्द अडखळु लागले होते.. ओठांशीच थबकू लागले होते.. दोस्ता...तुला आठवतात तिचे केस? नागिणीसारखे सळसळणारे... आठवण? मला नाही येत...! शिमल्याला म्हणाली होती मला हा बर्फ किती छान आहे ना... पांढराशुभ्र, निरागस्,स्वच्छ... त्याच्या मनासारखा, आठवते का रे? आठवण?

आठवणींचा पाऊस

लेखक अनामिक यांनी बुधवार, 27/05/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाविसाव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसातून आज बाहेर बघताना खूप काळे ढग जमलेले दिसताहेत. तसं ऍटलांटामधलं वेदर फारच अनिश्चित असतं, आणि एवढ्यात तर ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळताहेत. पण आज न जाणो का खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनातही आठवणींचे ढग जमून आले... खूप नॉस्टॅल्जीक वाटायला लागलं आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही. (भारतातही आता पावसाचं लवकरच आगमन होईल. वादळी पावसाने तर विदर्भात आधीच आपली वर्दी लावली आहे.) मे महिन्याचा शेवट झाला आणि जूनच्या सुरवातीला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहूल लागली की घरोघरी एकच प्रकार सुरू असतो ..

निशब्द - भाग १

लेखक सँडी यांनी बुधवार, 27/05/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक प्रयत्न. तो: अगं मी सहज काढला होता चिमटा. ती: सहज? रात्रभर हात दुखलाय माझा! तो: बरंsss! सॉरी बाई! ती: का छ्ळतोस? तो: छ्ळतो? ती: .... तो: चल कॉफी पिऊ... ती: नको. तो: (हात धरुन) चल, तुला बरं वाटेल.. ती: (डोळे मिटलेले).... तो: काय झालं?

ढाई अक्षर प्रेम के

लेखक फारएन्ड यांनी बुधवार, 27/05/2009 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला नातेसंबंधांचा अभ्यास करायचा आहे का? असेल तर हा चित्रपट जरूर पाहा. कारण डीव्हीडी वरील माहितीनुसार "It's a study in relationships..."! त्याआधी स्त्री स्वातंत्र्याचे काही पैलू पाहूनच आपण थक्क होतो. मुलीला 'हायस्कूल' नंतर लग्नाच्या मागे लावणारे आधुनिक विचारांचे पुरूष तर नेहमीच असतात, पण येथे एक सोडून दोन स्वतंत्र विचारांच्या आणि स्वत:बद्दल आत्मविश्वास असलेल्या नायिका यात आहेत. एक स्वत:च्या आई वडिलांना आपले लग्न झाले आहे का नाही ते ठामपणे सांगू शकत नाही, दुसरी तर स्पष्टपणे 'हम लडकिया पेड के बेल की तरह होती है, हम को सहारे की जरूरत होती है, जो भी सहारा दे उसे थाम लेती है" वगैरे सांगते.

मटातील संतापजनक शीर्षकः शिवस्मारक आधी विघ्न बाबासाहेबांचे

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 27/05/2009 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4579490.cms वरील बातमी पहा. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बनत आहे. त्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे आहेत. संभाजी ब्रिगेडसारख्या अन्य काही ब्राह्मणद्वेष्ट्या आणि आगलावू संघटनांनी बाबासाहेबांना हाकला नाहीतर त्यांच्यावर हल्ला करू अशी धमकी दिली आहे. का तर म्हणे बाबासाहेब दादोजी कोंडदेवांना शिवाजीचे गुरू मानतात म्हणून. वा रे वा! ह्यात बाबासाहेबांचे विघ्न काय आहे?

भारतीय समाज आणि कुटुंब

लेखक lakhu risbud यांनी बुधवार, 27/05/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साप्तहिक लोकप्रभा मधिल हा लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला, जाणकार मंडळी कडून या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यात यावा अशी विनंती कुटुंबसंस्था आम्ही पवित्र असल्याचे धरून चालतो. तिचे गोडवे गातो. पण प्रत्यक्षात तो काय आहे हे लक्षात घेत नाही. कारण येथे विचारांवर संस्कार मात करतात. कुटुंब संस्था ही मुळात शेती संस्कृतीची निर्मिती आहे. कुटुंब हे मालमत्तेचे एकक म्हणजे युनिट ऑफ प्रॉपर्टी असते. त्यात कुटुंबप्रमुखाची एकाधिकारशाही व इतरांचे दुय्यम स्थान अटळ असते. कुटुंब सत्ताकारणापासून कधीच मुक्त नसते. त्यामुळेच पिता-पुत्र संघर्ष उद्भवतात. शेतीचे संरक्षण स्वत:च करावे लागते.