मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मटातील संतापजनक शीर्षकः शिवस्मारक आधी विघ्न बाबासाहेबांचे

हुप्प्या · · काथ्याकूट
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4579490.cms वरील बातमी पहा. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बनत आहे. त्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे आहेत. संभाजी ब्रिगेडसारख्या अन्य काही ब्राह्मणद्वेष्ट्या आणि आगलावू संघटनांनी बाबासाहेबांना हाकला नाहीतर त्यांच्यावर हल्ला करू अशी धमकी दिली आहे. का तर म्हणे बाबासाहेब दादोजी कोंडदेवांना शिवाजीचे गुरू मानतात म्हणून. वा रे वा! ह्यात बाबासाहेबांचे विघ्न काय आहे? असली दळभद्री हेडलाईन बातमीला काय दिली आहे? हे विघ्न संभाजी ब्रिगेडादी विघ्नसंतोषी लोकांचे आहे. बाबासाहेबांची शिवाजीबद्दलची भक्ती जगजाहीर आहे. एक क्षणभर असे मानू की दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरु नव्हते. पण म्हणून काय तसे म्हणणार्‍या लोकांवर हल्ला करायचा? असला डोकेफिरूपणा मुसलमान करतात (आठवा महंमदाचे व्यंगचित्र व त्यानंतर झालेला दंगा). तो आपण करू नये. शिवाजीचे थोरपण हे निव्वळ त्याच्या गुरु, आई, वडिलांचे नाही. शिवाजीचे स्वतःचे आहे. त्यांचा गुरू कुणी होता का नव्हता यावर त्यांचे बावनकशी कर्तृत्व कमीजास्त होणार नाही तेव्हा असले डोक्यात राख घालायचे प्रकार बंद केले पाहिजेत. बघू आता आपले लाडके कॉंग्रेस सरकार काय करते ते.

वाचन 8657 प्रतिक्रिया 0