जनरल मोटर्सची दिवाळखोरी आणि ऑटो उद्योगाचे भविष्य ..
गेले काही दिवस आपण डेट्रॉईट बीग-३ संकटात, यु ए डब्ल्यु शी बोलणी फिसकटली, ट्रेझरी डिपार्टमेंटकडुन अजुन नवा बेल्-आउट पॅकजचा प्रस्ताव , क्रायस्लरची दिवाळखोरी, रिक वॅगनरची हकालपट्टी, जनरल मोटर्सला ३१ मे ची अखेरची मुदत, मॅग्ना आणि फियाट ओपेलच्या रेसमध्ये वगैरे बातम्या वाचत अगर ऐकत असाल ...
आज त्याची परमोच्चवधी झाली आहे ....
"आज जगातल्या नंबर १ च्या जनरल मोटर्सने दिवाळे घोषीत केले आहे".
त्यांनी आज फेडरल कोर्टात "चॅप्टर-११, बँकरप्सी प्रोटेक्शन" साठी अर्ज केला आहे ....
२-३ वर्षापुर्वीच यशाच्या शिखरावर असलेल्या वाहननिर्मीतीउद्योगाच्या इतिहासातला हा एक सर्वात वाईट क्षण, ऑटो उद्य
माझा रिकामपणाचा उद्योग.... १ ग्लास पेंटिग!!!
एकदा हॉटेलात जेवायला गेल्यावर सहज वरती नजर गेली...टेबलाच्या वर काचेवरती पेंटिग केलेले छान झुंबर होते.. अगदी वेगळं नि झक्कास दिसत होतं.. सोबतची मैत्रिण म्हणाली.. काचेचे तुकडे एकमेकांना जोडून जोड दिलेला भाग सोनेरी वा काळ्या रंगाने रंगवतात.... खूप नाजूक नि बर्यापैकी महाग प्रकरण असतं ते... नंतर विसरूनही गेले मी ते... त्यानंतर एकदा दिव्यांच्या दुकानात गेले असताना पुन्हा तसंच एक झुंबर दिसलं... आता मात्र जवळून पाहता आलं.. यावेळी ते जरा जास्तच क्लिक झालं.. घरी गेल्या गेल्या जालावर शोध घेतला.. नि अशी चित्रे शोधली... तर तिथे गंमतच होती... एकच बाऊल.. त्यावर रंगकाम केलं होतं..
असलेलं नसलेलं
वाचकांसाठी सूचना
प्रस्तुत लेख हा भावनेच्या भरतीच्या काळात लिहिलेला आहे. त्यामुळे त्या भावना वाचकांच्या अंगावर आदळून वाचक भिजण्याची शक्यता आहे. कृपया रेनकोट घालून लेख वाचावा. ;)
त्यादिवशी खूप दिवसांनी त्याला फोन केला तर त्याच्या कॉलर टयूनमधून नेहमीसारखाच रेहमान भेटला. युवराज चित्रपटातलं मनमोहिनी हे गाणं!
“लट उलझी सुलझा जा बालम…
माथे की बिंदिया बिखर गयी है…
अपने हाथ सजा जा बलमा”
अरेच्चा ही चीज ओळखीची असूनही अनोळखी का बरं वाटते आहे? भीमपलासच्या कोमल ग नी ची जादू असावी का?साखरेचे खाणार त्याला..!
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही.
पाहायचं आहे
पाहायचं आहे हळूच तुला
माझी वाट पाहताना
डोळ्यांची माझ्या वाटेवर
अधीर नजर रेंगाळताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्या आठवणीत रमताना
आठवण काढत काढत
तु गालात लाजताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्यासाठी अश्रू ढाळताना
काळजातले अश्रू ढाळत
वाहणारे प्रेम पाहताना
पहायचं आहे हळूच तुला
मी स्वप्नात येताना
स्वप्न पाहत पाहत
गोड भाव फुलताना.
Taxonomy upgrade extras
अदभुत
3
विरह
हिरव्या हिरव्या वनांत या
जरि पानोपानी छाया ग,
दृष्टि समोरी तूंच नाहि तर
हिरवळ डोळां जाळी ग |
सहा रसांचे स्वाद लेऊनी
अमृत जरि मम पात्रीं ग,
घांस द्यावया तूंच नाहि तर
ठसका कंठी रुतला ग |
फुलापरी ही कोमल शय्या
जरी निरव या रात्री ग,
स्पर्शावाचुनि मोरपिशी तव
उरांत भडका उठला ग |
Taxonomy upgrade extras
मिसळपाव