Skip to main content

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

बडीशोप सरबत

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 07/06/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी बडीशोप ( कच्ची ) , २ वाट्या साखर , मीठ , पाणी. कृती: बडीशोप १ वाटीभर पाण्यात २ तास भिजत ठेवावी , साखर २ वाट्या पाण्यात विरघळवून घ्यावी. बडीशोप मिक्सर मधून वाटून घ्या (पाण्यासकट) पूर्णपणे वस्त्रगाळ करून घ्यावी. मग साखरेच्या पाण्यात मिक्स करावे. आणि सर्व्ह करताना १ भाग मिश्रणात ४ भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून सर्व्ह करावे.

असे पाहुणे येती, आणिक स्मृती ठेऊनी जाती...

लेखक सुबक ठेंगणी यांनी रविवार, 07/06/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा च्या मेटामोर्फसिसच्या काळात हा लेख गहाळ झाला होता. तो आता प्रतिक्रियांसकट इथे चिकटवत आहे. आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात.

काव्य

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 07/06/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे? अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे! 'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती.. रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे! मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण.. चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे! जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या... कोपर्‍या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?

आठवणींची निर्मिती.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/06/2009 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली, "काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?" मी म्हणालो, "त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय." मला म्हणाली, "आज आमच्या घरी "पॉटलक" आहे." "म्हणजे ग काय?" ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते.

राधिका

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/06/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णसख्याची प्रीत राधिका सूर कन्हैया, गीत राधिका श्यामल करि अलगूज होउनी स्वरपुष्पे उधळीत राधिका नंदनंदनासंगतीत जणु रासरंगसंगीत राधिका श्रावणघन घननीळ बरसतो कदंबतळि झेलीत राधिका चंद्रसजण मुरलीधर गगनी, चांदणकण वेचीत राधिका मुकुंदकंठी वैजयंति, शिरी मोरमुकुट निरखीत राधिका देवकिनंदन झुलवित झूला, रोमांचित, पुलकीत राधिका देह श्याम अन् प्राणहि श्यामच, जणु अद्वैत, पुनीत राधिका जन्मजन्मिची सखी, हरीचे पूर्वजन्मसंचीत राधिका
Taxonomy upgrade extras

पद्मसिंह पाटलांना अटक

लेखक टायगर यांनी शनिवार, 06/06/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी खासदार पद्मसिंह पाटील यांनी सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पद्मसिंह पाटील हे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसातच पद्मसिंह पाटील यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. आता त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे.

पाककृती हवी आहे..

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 06/06/2009 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचा रिकामपणाचा नवीन उद्योग स्वतःच्या नि दुसर्‍यांच्या पोटावर प्रयोग करणे हा आहे.. जालावरच्या पाककृती वाचून दोन तीन वेळा कोल्ड कॉफी बनवली.. पण एकदा खूपच कडक नि कडवट झाली... सोबतच्या गिनिपिगने कशीबशी नरड्याखाली उतरवली.. दुसर्‍यावेळेस तिची बासुंदी झाली होती.. दूरदृष्टी ठेवून यावेळी गिनिपिग बदलला होता.. :D तर कृपया कुणी कॉफी, साखर, पाणी, दुध यांचे नेमके प्रमाण सांगेल का? त्याचबरोबर.. घरच्या घरी क्रीम बनवण्याचा काही सोपा उपाय आहे?? झालंय काय, तर मी एक नवीन चित्रफीत पाहिलीय, कॉफी आर्टची.. थोडी सांड-लवंड अपरिहार्य आहे.. पण पाककौशल्यात मी दगड आहे की वीट आहे.. हे जरा तपासून पाहायचंय.. आणखी एक..