Skip to main content

शाही टुकडा...

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 10/06/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
या पदार्थात शाही म्हणण्यासारखे काय आहे माहित नाही.. जिथे सर्वप्रथम खाल्ला.. तिथे याच नावाची पाटी होती.. [नाहीतरी.. नावात काय आहे?]. कृती आंतरजालावरचीच आहे.. थोडाफार बदल केलाय सुचेल तसा.. साहित्यः १. चार ब्रेड स्लाईसेस २. पाव वाटी तूप ३. १५०-२०० मिली दूध ४. वाटीभर साखर.. [गोडाच्या आवडीनुसार कमी-जास्त करता येईल ] ५. वेलची, चारोळी ६. रोझ इसेन्स ७. सजावटीसाठी बदाम पिस्त्याचे काप, चांदीचा वर्ख. पाककृतीसाठी लागणारा वेळ : तीस मिनिटे पाक़कृती: १. प्रथम आटीव दूध तयार करून घ्यावे.. त्यासाठी दुधात साखर नि वेलची घालून ते मंद आंचेवर आटवण्यास ठेवावे.. [लागणारा वेळ साधारण २० मिनिटे] २.

अंत... भाग-३

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/06/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी फोन बंद केला व गाडी बंद करुन सरळ.. जे होईल ते होईल हा विचार करुन त्या गाडीच्या दिशेने चालू लागलो... दरवाजा उघडा होताच, मी जरासे आत बघण्यासाठी वाकलो तोच एकदम पोटात जोरात कळ आली, माझा हात आपसूकच पोटाकडे गेला तर हाताला काही तरी ओले लागले..... मी ओरडलो... वोह शट... गोळी मारली मला तू.... असे म्हणत मी खाली कोसळलो.... ! मागील भाग... डॉक्टरांनी माझा जिव वाचवला, पण मला गोळी मारणारा तो कोण ?

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 10/06/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो.

तू येशील का रे आज?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 10/06/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
पेंगुळल्या आता गर्द सावल्या, फांदीसवे रे झुकली सांज! धुंदावल्या डोळ्यांत माझ्या, चढली आहे कसली झांज? अन कंटाळले रे इंद्रधनूही, प्रिया तू येशील का रे आज? बघ धुंद करी तो मृदगंधही, ल्याली धरणी अवघा साज! मिलनास तुझीया सिद्ध धरा, तूज कसला रे चढला माज! चल वरूणा झडकरी ये रे, मी वाट पाहते सोडूनी लाज! विशाल

अमानवी - भाग २

लेखक गोगोल यांनी बुधवार, 10/06/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
(पहिल्या लेखाला आलेल्या भरभरून प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय :)) .... उन्हाचि शेवटची तिरिप आता गढी च्या पुढील दरवाज्यापाशी होती. मंदा शिरीषच्या निर्जीव कलेवरावर डोक टेकवून धाय मोकलून रडत होती. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. अजिंक्य कसबसा पायतले त्राण गोळा करून इतर सर्वांना म्हणाला "आजची रात्र आपल्याला इथेच काढण्याशिवाय पर्याय नाही. उद्या सकाळपर्यंत आपण तग धरून ठेवला तरच शिरीष चे आपण योग्य ते अंतिम संस्कार करू शकू" ... पुढे अजिंक्य आणि राधानी पुढचा दरवाजा सुरक्षित करून पहारा द्यायचे ठरवले.

सर्वेक्षण-निष्कर्ष, म्हणी-सुविचार आणि ज्योतिषशास्त्र!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/06/2009 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये जवळपास रोजच विविध देशांमधील पाहणीचे आणि सर्वेक्षणाचे निकाल छापलेले असतात. उदा. चहा, सिगारेट पिणाऱ्यांपेक्षा, ते न पिणारे लोक दिर्घायुषी असतात वगैरे वगैरे. दहा- पंधरा वगैरे वर्षे ते लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून मग शेवटी एक निष्कर्ष काढला जातो. तो आपण वाचतो. बरेचदा आपल्याला तो मान्यही असतो. मान्य करण्याइतपत तो मुद्दा पटवून सांगितलेला असतो. बरोबर आहे. पण त्यालाही काही अपवाद मात्र सापडतात. म्हणजे ते सर्वेक्षण १०० टक्के कधीही लागू होत नाही. कारण, प्रत्येक नियमाला अपवाद असू शकतो. ( उदा.

श्रेष्टतम मैत्री.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 10/06/2009 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं खर्‍या मैत्रीमधे फक्त दोघांमधला विश्वास आणि लगाव ह्यांच्या पेक्षा काही तरी जास्त असतं." पुरूषोत्तम आणि मी एकाच गावात वाढलो.शाळेत एकत्र शिकलो.हायस्कूलची परिक्षा पास झाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो. मला आठवतं आमच्या सर्व मित्रमंडळीत शरद आणि पुरुषोत्तम यांची पहिल्यापासून गाढी दोस्ती होती. अलिकडे मी सुट्टीत गावाला गेलो होतो. पुरुषोत्तमची आणि माझी खूप दिवसानी भेट झाली.

पाहिली मी पंढरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 10/06/2009 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी माळ तुळशीची गळा, कासे पितांबर, कर कटी भाळि कस्तुरिटिळक, कानी मकरकुंडल शोभती स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुंठ शोभे भूवरी भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी चरणि माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी