Skip to main content

या माध्यमांचं काहीतरी करा रे....

लेखक अ-मोल यांनी मंगळवार, 16/06/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
या माध्यमांचं काहीतरी करा रे.... टीम इंडिया २०-२० मधून बाहेर पडली आणि वखवखलेल्या माध्यमांनी रीतसर धोनी आणि कंपनीच्या डोक्यावर पराभवाचं खापर फोडलं. २०-२० क्रिकेट हे बरंचसं जुगार आणि नशिबावर अवलंबून आहे. त्या दिवशी तुमच्या चाली यशस्वी झाल्या, की तुम्ही जिंकणार. चुका करायला जवळपास शून्य जागा आणि १०० हून कोटी भारतीयांच्या अपेक्षेचे ओझे डोक्यावर घेवुन खेळणे सोपे नाही. गेली जवळपास दोन वर्षे धोनी आणि कंपनी विजयाचे मनोरे रचत आहे. तेव्हाही त्यांना नको इतके डोक्यावर घेवून नाचणारा हाच मीडिया होता. हल्ली वर्तमानपत्रांनाही चॅनल पत्रकारितेची इंगळी डसली आहे.

ठसे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/06/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुख माझे कसे, मलाच महाग झाले सोसवेना विरह , मन पिसे झाले जपले आजवरी मी, गे कसे हरवले अश्रु आज माझे, शुष्क कसे झाले वेदना मनीची नच, जाणिली कुणी भावनांचे आज, माझ्या हंसे झाले डोळ्यात साठलेले, प्रेम लुप्त झाले तुझे टाळणे मला, नित्य असे झाले आता आठवांचेही, वार दुधारी झाले शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले विशाल

मला आवडलेला फोटो

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 16/06/2009 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो. शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्‍या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे. मस्त फोटो. तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ? अमोल --------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 16/06/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा दिवस फारच धांदलीचा गेला. सुमारे १५० फोन आले. ३ सोडता बाकी सर्व 'आता आमच्या मुलांच्या भविष्याचे काय होणार' अशा प्रकारचे. जर 'पुण्य' नावाच्या गोष्टीवर विश्वास असेल तर आजुबाजुला असलेल्या १० वीच्या किंवा १२ वी च्या पालकांना लेखातील माहीती जरुर पोचवा. जर पोचवु शकाल तर तुम्हाला ह्या वर्षी आणखी काही 'पुण्य' करायची गरज नाही. १० वी मधॅ जर १०० मुलांना ९०% मार्क मिळाले तर तर त्या पैकी ५जण हेच यश १२ वी सायन्स मधे कायम ठेवु शकतात. आणि ह्या ५ पैकी फक्त २ जण सीईटी मधे १८०+ ला पोचतात. ह्या वर्षी सीइटी मधे फिजिक्स मधे मुलांची कत्तल झाली.

चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 16/06/2009 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपावर कम्युनिस्ट विरुद्ध इतर असा एक जबरदस्त कलगीतुरा रंगला होता. पब्लिक नुसतं तुटून पडलं होतं. बरीच राळ उडली होती. त्या निमित्ताने लहानपणी वाचलेली रशियन भाषेतून (बहुतेक अनिल हवालदार यांनी) मराठीत भाषांतरित केलेली पुस्तकं, एका मित्राच्या घरी (त्यावे वडिल सीपीआयचे मेंबर) येणारे सोविएत साहित्य (मासिकं, पुस्तकं) वगैरे आठवणी जाग्या झाल्या. मग काही दिवस जालावर कम्युनिस्ट विचारसरणी, सोविएत युनियन, पोलादी पडदा वगैरे बद्दल वाचत होतो. शीतयुद्धाच्या काळात पोलादी पडद्यामागचं जग खरंच कसं होतं हे कुतूहल तेव्हाही होतंच.

अगं अगं बशी..! - १

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारणपणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट.. म्हणजे सार्वजनिक वाहतूकीची साधने कोणती ?? असा प्रश्न जेव्हा शाळेमध्ये विचारला जायचा तेव्हा अगदी न चुकता बस, टांगा, रिक्षा .. अशी यादी असायची. कारण मी शाळेत होते तेव्हा सिक्ससीटर, पिग्गि, मिनी बस असले प्रकार नव्हते. तुम्ही श्रीमंत असाल तर रिक्षातून जा.. नाहीतर टांगा, बस आहेच. इचलकरंजी मध्ये तेव्हा डेक्कन पासून एस टी स्टॅण्ड पर्यंत टांग्याची वाहतूक होती. म्हणजे गुरू टॉकि़ज पर्यंत १ रूपया आणि एस टी स्टँड पर्यंत १.५० रूपया. घोड्याच्या मागे असलेल्या टांग्यात बसायला खूप आवडायचं.

'फिटे अंधाराचे जाळे' - एक सुरेल अनुभव

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 15/06/2009 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. किशोर भिसे यांच्या ’सिद्धकला’ या ठाण्याच्या संस्थेतर्फे शनिवार दि. १३ जून ला गडकरी रंगायतन येथे "फिटे अंधाराचे जाळे’ हा श्री. श्रीधर फडके यांच्या व कै. बाबुजींच्या गाण्यांचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता. संकल्पना व संयोजन डॉ. किशोर भिसे व श्री. रवि चौबळ यांचे. ही संस्था केवळ कार्यक्रमच नव्हे तर अनेक उपक्रमही सातत्याने सादर करीत असते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीधरजींनी देवाचे नाव घेत केली - ’देव देव्हार्‍यात नाही’.

आकांत

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 15/06/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्राण झाला शांत आता संपला आकांत आता यायचे ना फिरुन येथे, सोडला हा प्रांत आता तोडले सारेच धागे, का पडावी भ्रांत आता? सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता सोहळे सोसून फसवे जीव झाला क्लांत आता वादळाचे धुमसणे हे का न होई शांत आता?
Taxonomy upgrade extras