Skip to main content

सुख एक पाखरू

लेखक जागु यांनी शनिवार, 20/06/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या पुष्पी अलगद येउन मधुआत्म्यास निर्मळ आनंद देतो त्या पाखरास आम्ही सुख म्हणतो पिंजर्‍याचे ह्याच्या मोकळे छप्पर पाखरू हे अवखळ चंचल गाव ना ठाव हिंडे निरंतर करीतो हा चोख व्यवहार देवाण घेवाण भर नफ्यात अपघातात विम्याला नसे भार कधी ह्याची उंच भरारी कधी विश्रांतीस पानाआडी विहार ह्याचा त्याच्याच मर्जी
Taxonomy upgrade extras

एमबीए / बीबीए

लेखक दशानन यांनी शनिवार, 20/06/2009 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
मला एमबीए करायचे आहे काय करु ? भाकरीच्या गडबडीत शिक्षण कधी सुटले कळालेच नाही पण आता मला तातडीने एमबीए / बीबीए करायचे आहे कोणी योग्य सल्ला देऊ शकेल का ? ऑनलाईन डिग्री मिळते का ? मला सुरवात कशी व कुठून करावी लागेल ? माझे शालेय शिक्षण जास्त नाही आहे दहावी पासून सुरवात करायची आहे तर एमबीए / बीबीए पुर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल ? ईन शॉर्ट मला एमबीए करायचे आहे ! मदत करा.

जमा - खर्च !

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 20/06/2009 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
काय म्हणावं गणिताला? तऱ्हेवाईकच वागण्याला मोजून दुखल्या बोटांना जमा-खर्च ना जुळण्याला ….१ काय जमा? खर्च सगळा वजाबाकीचा हिशोब हा जरा साठवू धन म्हणता पाय फुटती पैशाला ….२ थेंबे थेंबे तळे साचवा ऐका रे हा सल्ला ऐका (काय करावं जिथे पाणी तयार नाही थांबायला !) ….३ उलटा अनुभव वजन घटवता काय सोसशी बा मना ! सांभाळावे जरी जिभेला हवा फुगवते शरीराला ….४ धावा किंवा खूप चाला फरक कुठचा पडायला ? वजनकाटा आहे बसला इथे नुसता खिजवायला ….५ काय म्हणावं गणिताला? आकड्यांच्या गोंधळाला कष्ट पैसा जमवायला कष्ट वजन घटवायला ….
Taxonomy upgrade extras

काही अनुभव..पावसाळलेले!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 19/06/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
rain पावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची "खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे!) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या! दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.

अली अकबर गेले ! सूर लोपले!

लेखक टायबेरीअस यांनी शुक्रवार, 19/06/2009 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खा यांचे आज निधन झाले. भारतीय सन्गीत जगप्रसिध्द करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज भारतीय संगीताला जे आंतरराष्ट्रिय व्यासपीठ मिळालय त्याची बीजं अलि अकबर आणि रवि शंकर ह्यांनी रुजवली आहेत. उस्ताद्जींना भावपूर्ण श्रध्दांजली. - शुभंकर. फार वाईट झाले.. माझी भावपूर्ण श्रद्धांजली!! (एकाच बातमीचे दोन धागे झाल्याने दोन्ही धागे एकत्र करून दिले आहेत.) - संपादक.

विचार करा तडीपार

लेखक अजय यांनी शुक्रवार, 19/06/2009 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीची आय-माय कुण्या युपी बिहाऱ्याने काढली तर त्याची पार आपन वाट लावून टाकू बर्का. आता आपल्याच मान्साकडून बोल्लं जातं काईबाई.... काल आमच्या उदव सायेबाचं लेकरू (म्हंजे आदित्य ठाकरे सायेब) म्हने की राजकारनात येयाचं नाई. त्यांनी तर द ड्रीम वुई शेअर अशी शेअर बाजाराला जोडनारी नवी संगटनापन सुरू केली हाये. तीचे मराठीत नाव तुमीच सोदून मिपावर लिवा. त्यांनी आनकी काही तरी सांगीतलं. रोकठोक आनी खनखनीत- "जो विचार करशील, तो तडीपार ने, अशी शिकवण आई-बाबा देतात" (प्रसिद्धी - सकाळ, मुंबई, टुडे पान २) आता बगा आमंचा नवा नेताच ईचार तडीपार करायला सांगतो .

रक्ताच्या गरजेसाठी.. महत्वाची माहीती

लेखक नम्रता राणे यांनी शुक्रवार, 19/06/2009 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
Hi, Now it has become easier to get the blood we need. All you have to do is just type "BLOOD and send SMS to 96000 97000" EX: "BLOOD B+" A BLOOD DONOR WILL CALL YOU!! So please pass this message to all. It certainly would save many lives. Its a Must to Know & Share. Do it now.... Forward this to all your friends whom you care ....as the minute you spare to share this information can save somebody's life with rare Blood Group! If you couldn't be a Donor be a Communicator.

अतिशय छान उपक्रम.....

लेखक उमेश__ यांनी शुक्रवार, 19/06/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेना संचालनालयामार्फत ज्या विविध योजना राबविल्या जातात, त्या योजनांमधील जवळपास ८०% योजना या क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून युवक कल्याणविषयक फार कमी योजना राज्य शासन राबवित आहे. मुळात महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्या (२००१ च्या जनगणनेनुसार - ९,६८,७८,९२७ यातील १३ ते १५ वर्ष वयोगटातील युवांची लोकसंख्या ४,१३,४७,८२१) ४२.६८% लोकसंख्या ही युवांची असून या वर्गातील लोकसंख्येकरिता, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने कुठलेही धोरण ठरविलेले नाही.