Skip to main content

अंत... भाग- ४

लेखक दशानन यांनी सोमवार, 22/06/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
तोच रुम च्या खिडकीतून गोळ्या चालल्या व काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली व मी स्वतःला वाचवण्यासाठी... बेडच्या खाली जाण्यासाठी उठलो तोच डाव्या हातातून प्रचंड कळ आली व मी मटकन खाली पडलो... साठे आत दरवाजा जवळ जवळ तोडत आत येताना दिसले व माझ्या मागील खिडकीवर ते अंधाधुंद फायरिंग करु लागले... मी हळू हळू बेशुध्द पडलो.... मागील भाग - ३ ******************* काय झालं अचानक कुणाला काहीच कळले नाही, त्यानीं हल्ला का केला ? कुणावर केला.. माझ्यावर की रिंकीवर ? गोळ्या झाडल्या गेल्या... दोन जिवंत माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली..

स्वर्ग

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 22/06/2009 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज मंद वार्‍यातुनी वाजते बासरी सख्या हाय गात्रांतुनी धुंद ही शिरशिरी निरवताही डोलते वारियाच्या सवे तुझ्या स्वरांसवे धरा छेडिते सतारी रंग सृष्टीचे बघ जाहले कृष्ण निळे अन व्योमात सामावूनी उरला श्रीहरी हरिच्या सुरांतुनी मनी प्रित झिरपते तयांसवे डोलते मुग्ध राधिका लाजरी खुळावल्या गोपिका रास वृंदावनी जिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी अंतर गगनधरेतले गेले विरघूनी चांदण्यात अवतरे स्वर्ग यमुनातीरी विशाल

तू

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी सोमवार, 22/06/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
'तू' एक कोडे अत्यंत क्लिष्ट, अवघड असे.. 'तू' एक गूढ सत्य कधीही न समजणारे.. 'तू' एक साठा वेदनेचा, दु:खाचा, सहनशीलतेचा.. 'तू' पाण्यासारखा सर्वात मिसळणारा... 'तू' सागरासारखा सर्वांना सामावून घेणारा.. 'तू' माझा मित्र मला समजून घेणारा.. 'तू' माझा भाऊ माझे लाड करणारा... 'तू' माझा बाबा माझी काळजी करणारा.. मला सांभाळून घेणारा... माझ्यासारखाच ...... 'तू' माझा बाबा....
Taxonomy upgrade extras

मीरा कुमार

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 21/06/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या वर्गांसाठी आरक्षण राबवण्यात आले, त्या वर्गांची अद्याप पुरेशी प्रगती झालेली नाही आणि त्यामुळे आणखी काही काळ आरक्षण चालूच ठेवावे लागणार, हे ठीकच आहे. पण तसे करताना सत्ताधारी राज्यर्कत्यांना एक प्रश्न जनतेने विचारायला हवा, तो हा की, सर्व समाज एका पातळीवर यावा, म्हणून काय प्रयत्न झाले? केवळ शिक्षण व नंतर नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवल्याने सर्व समाजाचे उत्थान होते की, ज्यांना यापूवीर् आरक्षणाची सवलत अनेकदा मिळाली, अशांचाच तो पिढीजात अधिकार बनतो? ............ 'आरक्षण' हा भारतीय मनाचा एक दुखरा कोपरा आहे. भळभळणाऱ्या जखमेवर मलमपट्टी केली की, खपली धरू लागते.

एका सोनालीची महालढाई

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी रविवार, 21/06/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
सोनाली नवांगुळ
आजचा सकाळ पाहिला, पहिल्या पानावरच उजव्या कोप-यातील हे शीर्षक वाचले. बाकीचा पेपर टाकला आणि आधी सप्तरंग वाचायला घेतले. पहिल्याच पानावरचा सोनालीचा फोटो पाहीला, केवढी स्मार्टनेस आहे तिच्या चेहे-यावर.

फेनॉमेनल मिपाकट्टा

लेखक टारझन यांनी रविवार, 21/06/2009 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम्स .. रामराम्स !! (णको .. णमस्कार्स लै बोर झालं) काल बराच पाउस झाला नै ? लाईटही गेली .. करायला काही नव्हतं .. धम्याची धमी देखील नव्हती घरी .. त्यामुळे धम्या जाम पकला होता ... सगळी कामं हातानी करावी लागत होती .. किमान जेवणाचं तरी बाहेर होईल ह्या आशेनं त्याने कट्टा आयोजित केला .. (उसातनं आलेले) सुर्य .. मी .. आणि धम्या .. आणि जर खरडवह्या उचकण्यातून वेळ भेटला तर पर्‍या येणार होता ... लाईट गेल्यामुळे आपला लॅपटॉप वर "नाईट ट्रेन" नावाचा "के व ळ अ प्र ति म" मिस्ट्रीपट पहात होतो .. सहाला धम्याचा फोन वाजला .... म्हंटलं आता निघायला हवं .. साडेसहाला निघालो .... पावसाची रिपरिप होती ..

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 21/06/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

मोटरसायकलसाठी रदबदली.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 21/06/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
काल प्रो.देसायांचा नातू माझ्या जवळ येऊन आजोबांची तक्रार करीत होता.कारण काय तर त्याला मोटासायकल घ्यायची आहे आणि कसंतरी त्याने आपल्या आईबाबांना समजूतीने पटवून दिलं.पण त्याचे आईबाबा म्हणाले की आजोबांचा होकार मिळे पर्यंत काही खरं नाही. मला म्हणाला, "काका,तुम्ही जर का आजोबांची समजूत घातली तरंच हे शक्य आहे.कारण तुमचं ते कसंतरी ऐकतात." मी त्याला म्हणालो, "बाबारे,असल्याबाबतीत ते माझं कसं ऐकतील? कारण मी कधीही मोटरसायकल चालवली नाही.आणि तोच प्रश्न मला ते प्रथम विचारणार." "मग काय करायचं? तुम्हाला काही युक्ति सुचते का? कारण बि.एम.डब्ल्यु.

जनांचा प्रवाहो...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 21/06/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची वेळ. रणरणत्या उन्हामुळे रस्त्यावरची वाहतूक थंडावलेली. झाडाच्या आडोशाला, सावलीखाली उभ्या राहिलेल्या ट्रकखाली विश्रांती घेणारे ड्रायव्हर-क्‍लिनर सोडले, तर रस्त्यावर माणसांचा मागमूसदेखील नाही... मैलामैलांवर हीच स्थिती. शेगावकडे जाणारा रस्ता सुरू होतो आणि हे चित्र पालटून जातं. रणरणत्या उन्हात, माणसांचे घोळके संथ लयीत चालत असतात. तळपत्या उन्हात त्यांच्या हातातले भगवे झेंडे लांबवरून आणखीनच भडकभडक वाटू लागतात.