Skip to main content

मदत हवी आहे.

लेखक जागु यांनी गुरुवार, 25/06/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझे नेट कनेक्शन खुप स्लो झाले आहे. प्रतिसाद द्यायला अथवा कोणताही दुवा उघडण्यासाठी एक ते दिड मिनीट लागतोय. जाणकारांनी उपाय सांगावा.

पडसे

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 25/06/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
दबस्कार बित्रादो पावसाळा आला हा हबखास सर्दीचा सीझद. आता कुडाला सर्दी जाली त्याचे दाक हमखास चोद्दते.दाक असे बद्द झाले की पच्चाइत होते. सर्दी झालेल्या दाकादे काहिही बोलले तरी त्याचे कै च्या कै ऐकले जाते. बघादा आता बला जदातले बदातले असे भडायचे होते.पड ते ऐकु येतादाच विचित्र ऐकु येते. पावसातली सहल भडली की बला त्या दत्तरचे दोद तीद दिवस असेच बोलावे लागते. सगळी सादुदासीक व्यज्ज्दे अशी बदबदीत होउद जातात बग ठरवतो की बोलतदा सादुदासीक शब्द टाळूद बोलायचे बी असेच एक दिवस भरपूर पावसात कोकडात गेलो होतो. गुहागरला. चिपळूडहूद रत्दागिरी रस्त्यादे द जाता आत जायचे .

बी एम एम अधिवेशन २००९

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 25/06/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ जुलै २००९ उजाडायला असे कितीसे दिवस राहिले आता? बघता बघता “बी एम एम”चं अधिवेशन जवळ आलंच की ! खरंच वाटत नाहीये, म्हणजे अजूनही खरंच वाटत नाहीये. दोन तारखेला बिझनेस कॉन्फरन्स आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. तीन तारखेपासून अधिवेशन सुरू ! आत्ता तर अधिवेशनाच्या पहिल्या मीटिंगसाठी तासभर गाडी दामटवत एका मंदिरात गेलो होतो. त्याला जवळपास एक वर्ष झालं? आत्ता तर कुठे भारतातून आणायचे कार्यक्रम निवडण्यासाठी ’इंडिया प्रोग्रॅमिंग कमिटी’मधे आलो. त्याला जवळपास एक वर्ष झालं? आत्ता तर कुठे भारतातल्या कार्यक्रमांबद्दल शोधाशोध आणि चर्चा सुरू केली. त्याला जवळपास एक वर्ष झालं?

रेल्वे पोलीसांची स्वागतार्ह मोहीम

लेखक विकास यांनी गुरुवार, 25/06/2009 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत लोकलने कायम प्रवास करणार्‍यांपैकी बहुतांशी लोकांनी कधी ना कधी कुठल्यान कुठल्यास्थानकावर एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी जिन्याऐवजी रुळाचा उपयोग केला आहे असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. मात्र त्यात ज्यांच्या केसाला कधी असल्या निष्काळजी वागणुकीने फट्का बसला नाही ते आपण सगळे सुदैवी असलो तरी अनेकजण आणि त्यांच्यापोटी त्यांचे कुटूंबिय यांना आयुष्याची शिक्षा झाली आहे ही दुर्दैवी वस्तुस्थितीपण आहे. आत्ताच म.टा.

कृष्णबावरी..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 24/06/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
भारलेल्या त्या स्वरांची तान छेडे बासरी गीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी.. पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी.. मोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी.. पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी ऐकण्या आतूर राधा माधवाची पावरी.. नीळवर्णी मोरपीशी गुंतलेली राधिका ती मयूरा कृष्णवेडी नाचते या भूवरी.. सप्तरंगी नाहला वृंदावनीचा श्रीहरी ल्यायली श्रीरंग राधा त्या तिच्या कायेवरी.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

खेकडा भजी

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 24/06/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
कांद्याच्या भज्यांचा मुखपृष्ठावरील फोटो पाहिला. एक धागाही त्या निमित्ताने सुरू झाला आहे. मध्यंतरी एका विषयात कांद्याच्या भज्यांचा उल्लेख केल्यावर संदीप चित्रेनं (आणि परीकथेत(च) रमलेल्या राजकुमाराने) त्याची रेसिपी टाकायला सांगितली होती. आज हा समसमासंयोग जुळून आल्यानं रेसिपी देत आहे. यात काही विशेष असेल, असं अजिबात वाटत नाही.

अमृताच्या धारा

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
झाली शांत तृप्त धरा अशा बरसल्या धारा सांगे गंधाचा निरोप तुझ्या अंगणीचा वारा गर्द सावळे आभाळ राशी रुप्याच्या सांडते सौदामिनी उजळते तुझा गगनगाभारा झेलताना तनूवर हिरेमोती आनंदाने लाख डोळ्यांनी फुलतो मनमोराचा पिसारा तुझ्या करुणेचा मेघ माझ्या दारी झरताना जागेपणी पापण्यांत स्वप्न येतसे आकारा माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा
Taxonomy upgrade extras

तो आला!

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचा तो आला! =D> तब्बल ६ ते ८ महिने काहिलीत राहिलेल्या जीवासाठी जरासा का होईना, उतारा घेऊन आला! पण असा अचानक? :? दुपारी १ वाजता ऑफिसमधून ५ मिनिटांच्या रस्त्यावर असलेल्या बँकेत जाऊन येईपर्यंत सगळ्या आयुधांना [पक्षी - सनकोट, स्कार्फ, हातमोजे, बूट इ. इ. ] पुरून उरणा-या उन्हानं निखा-यावर मक्याचं कणीस भाजावं, तसं भाजून काढलं होतं. आल्यावरही पंखे, कूलर, एसी यांना दाद न देणारा प्रचंड उकाडा! ढगाच्या तुकड्याचाही मागमूस नाही! आणि अचानक ४.३० च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले, एकदम अंधारच झाला!