मुंबईत लोकलने कायम प्रवास करणार्यांपैकी बहुतांशी लोकांनी कधी ना कधी कुठल्यान कुठल्यास्थानकावर एका फलाटावरून दुसर्या फलाटावर जाण्यासाठी जिन्याऐवजी रुळाचा उपयोग केला आहे असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. मात्र त्यात ज्यांच्या केसाला कधी असल्या निष्काळजी वागणुकीने फट्का बसला नाही ते आपण सगळे सुदैवी असलो तरी अनेकजण आणि त्यांच्यापोटी त्यांचे कुटूंबिय यांना आयुष्याची शिक्षा झाली आहे ही दुर्दैवी वस्तुस्थितीपण आहे.
आत्ताच म.टा. मधे एक बातमी वाचताना लक्षात आले की आता पश्चिम आणि मध्य रेल्वे पोलीस असे क्रॉसिंग करणार्यांना तुरूंगात टाकू लागले आहेत आणि त्यांच्याकडून तसेच तरूण विद्यार्थी असल्यास त्यांच्या आईवडीलांकडून लेखी प्रतिज्ञा लिहून घेऊ लागले आहेत की परत असे करणार नाहीत.
काहि काळापुर्वी त्यांनी गांधीगिरी करण्याच्या नादात अशा रुळ ओलांडून येणार्या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना गुलाबाच्या फुलाची "लालू"च देऊन नीट वागायला सांगितले. पण मग लक्षात आले की असली "ममता" काही उपयोगी नाही आणि मग हा बडगा दाखवू लागले आहेत. ;)
कधी काळी असली चूक केली असली तरी आता त्यातील गंभिर परीणाम काय असू शकतात हे कळू शकत असल्याने या मोहीमेबद्दल रेल्वेपोलीसांचे स्वागतच करावेसे वाटत आहे.
वाचने
3500
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्यच
उत्तम
व्यवस्था आणि शिक्षा
सहमत. हा
In reply to व्यवस्था आणि शिक्षा by नितिन थत्ते
सहमत
In reply to व्यवस्था आणि शिक्षा by नितिन थत्ते
हम्म..
In reply to व्यवस्था आणि शिक्षा by नितिन थत्ते
आणखी
अवांतरः अडाणी कोर्ट
In reply to आणखी by नितिन थत्ते
जादा
वाजवीपेक्
In reply to जादा by चिरोटा
+१
In reply to वाजवीपेक् by नितिन थत्ते
मी पुलावर
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे!
In reply to मी पुलावर by नितिन थत्ते
एक गोष्ट
रेल्वे पोलिसांचा असाही एक पराक्रम.....