Skip to main content

नष्ट झालेल्या आजाराचा निद्रिस्त विषाणू

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 14/06/2021 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने Brincidofovir या औषधाला देवीरोगावरचा (smallpox) उपचार म्हणून मान्यता दिली. हे वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस नक्कीच बुचकळ्यात पडेल ! तुम्हीसुद्धा पडले असाल, नाही का ? देवीच्या आजाराचे तर फार पूर्वीच उच्चाटन झालेले आहे. मग जो आजार आत्ता मानवजातीत अस्तित्वातच नाही, त्याच्यासाठी औषधाला मान्यता देण्याची गरज काय, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. याचे स्पष्टीकरण रोचक असून ते देण्यासाठीच हा लेख लिहीत आहे.

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

लेखक मनो यांनी सोमवार, 14/06/2021 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

गोष्ट सांगा गणित शिकवा... . ११

लेखक राजा वळसंगकर यांनी रविवार, 13/06/2021 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात ! चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला... चिंट्या!!! काहीतरी बावळट बडबड करू नकोस. ब्रेक नसेल तर बोट थांबेल कशी? दोघी त्याचावर फिस्करल्या. **************** आत्तापर्यंत: टीम पुणेला त्रिकोणी ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी कॅप्टन नेमोंनी पाठवले होते. एरेटॉसथिनिस काकांनी त्यांचे ग्रहावर स्वागत केले आणि आता ग्रहावरचे प्रेक्षणीय ठिकाणे दाखवत होते. सगळं इतकं छान होते की आपण अभ्यास करायला आलो का मजा करायला आलो हा प्रश्न पडावा.

खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग २: फुटबॉल (पूर्ण)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 13/06/2021 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत  मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित होते  आणि म्हणून त्याबद्दल  बरेच कांही  लिहिण्याचा संकल्प  ही मालिका सुरू करताना सोडला होता.   या आधीचे काही लिखाण केल्यानंतर वैयक्तिक जीवनांत  अनपेक्षितपणे सुरु झालेल्या आणि चालूच असलेल्या वादळामुळे हा संकल्प मधेच सोडून द्यावा लागत आहे.

आज काय घडले .... चैत्र व. ६ भारताचार्य चि वि वैद्यांचा स्वर्गवास !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/06/2021 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्य ची वि शके १८६० च्या चैत्र व. ६ रोजी सुप्रसिद्ध विद्वान् , मार्मिक संशोधक, मराठी व इंग्रजी भाषेचे विख्यात अभ्यासक भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचे निधन झाले. शिक्षणक्रम पुरा झाल्यावर चिंतामणरावांनी प्रथम कोल्हापूर व ग्वाल्हेर संस्थानांत न्यायाधिशाचे काम केले.

आज काय घडले... चैत्र व. ५ मत्स्येंद्रनाथांची समाधि !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/06/2021 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मत्सेंद्रनाथ शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली! महाराष्ट्र संस्कृतीचा बनाव होतांना जे अनेक धर्मपंथ वा सांप्रदाय उदयास आले त्यांपैकी नाथसांप्रदाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज काय घडले... चैत्र व. ४ यदुवंशविलासु' रामदेवराव दिल्लीस !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/06/2021 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
देवगिरी शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले. तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदेवराव यादव नांवाचा राजा देवगिरी येथे राज्य करीत होता.

मन न

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 11/06/2021 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला??

सुटका नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 11/06/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या प्रश्नांना नसते उत्तर तेच मला खुणविती निरंतर अज्ञेयाच्या पल्याडून कुणी म्हणते,"यातून सुटका नाही" तीन मितींची अभेद्य कारा तिचे दार किलकिले उघडुनी बघती प्रतिभावान थोडके तेही म्हणती,"सुटका नाही" तुंदिलतनु तुपकट ध्येयांची हाक ऐकुनी डळमळते मन उनाड भटकी पायवाट मग खेचून म्हणते,"सुटका नाही"
काव्यरस

आरसा (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 10/06/2021 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी मी या कथेवर आधारित एक शशक लिहिली होती. त्याच संपूर्ण कथेचं हे भाषांतर. मूळ कथा : The Mirror by Catulle Mendes *** आरसा त्या देशात मुळी आरसेच नव्हते. किती शोधले, तरी अगदी औषधाला सुद्धा सापडले नसते. राणीची आज्ञाच होती ना, "तोडून टाका ते आरसे. फोडून अगदी बारीक चुरा करून टाका. कोणाच्या घरात एक एवढासा तुकडा जरी सापडला तर याद राखा. घरातल्या सगळ्यांना हाल हाल करून मारून टाकीन." यापुढे कोणाची काय बिशाद, आरसे बाळगायची! कसली ही विचित्र आज्ञा! हं.. त्यामागे एक रहस्य दडलं होतं.. राणी अतिशय कुरूप होती. पाहणाऱ्याचा भीतीने थरकाप होईल, इतकी कुरूप.