Skip to main content

फोक

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 08/07/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
तोच जुलै महीना, तेच पालक, तोच मी ,तेच तेच प्रश्न. एक शिक्षण सम्राटांनी माझ्या सर्व अटी मान्य करुन १० वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालका़करता २० कार्यक्रम ठेवले आहेत. कुठल्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता हे कार्यक्रम होणार होते.

(प्रिय सौ. सासुबाईंस..!)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 08/07/2009 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधार: प्राजूताईंची कविता (आणि फालतू सास-बहू टिव्ही सिरीयल्स) (पस्तूत विडंबनात मला प्राजूताईंच्या कवितेची माझी भ्रष्ट नक्कल व त्यातील आईसारख्या (तसेच सासुबाईंसारख्यासुद्धा) व्यक्तींची टिंगल करण्याचा अजीबात हेतू नव्हता. प्रत्येक आई आदरणीय आहे, वंदनीय आहे. माझा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. मी केलेले विडंबन हि फक्त कल्पना समजावी.) माझं तुमच्यासोबत असणं.. तुमच्या (खोट्या)कौतुकात माझं बुडुन जाणं.. तुमच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी मी माझ्या पार्लरच्या कामांना बाजूला ठेवणं.. संपूर्ण आयुष्यभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!! पण...
Taxonomy upgrade extras

पुरोगामित्वाची चढाओढ ही तितकी वाईट नाही

लेखक धनंजय यांनी बुधवार, 08/07/2009 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागे दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावर "समलैंगिकता आणि समाज" चर्चा चालू होती, तिथे "डीजे" या आयडीखाली मी पुढील प्रतिसाद दिला होता. (त्या संकेतस्थळावर "धनंजय" हा आयडी उपलब्ध नाही, म्हणून वेगळा आयडी घेतला.) बारीक सारीक बदल करून - म्हणजे मिसळपावावरील माझ्या लेखाचा दुवा देऊन, तो प्रतिसाद येथे देत आहे. - - - एका सामाजिक विषयावर चर्चा चलली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे मतमतांतरे ऐकू येत आहेत. या विषयाच्या अनुषंगाने आत्मकथन मी मिसळपावावर केले आहे.

प्रिय सौ. आईस..!

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 07/07/2009 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझं तुझ्यासोबत असणं.. माझ्या कौतुकात तुझं बुडुन जाणं.. माझ्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी तू तुझ्या कामांना बाजूला ठेवणं.. संपूर्ण महिनाभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!! पण... काहितरी राहून गेलंय.. आपलं निवांत गप्पा मारणं.. एकमेकींच्यासोबत ! केवळ अन केवळ बोलणं.... असं झालंच नाही गं! हिंडलो, फिरलो.. खेळलो.. पण.. फक्त आणि फक्त आपण दोघी कितीवेळ एकमेकीसोबत होतो?? आता तू येणार... तुझं येणं तसं वर्षभर लांबलं.. .... अन शेवटी हो नाही करता करता तू आलीसही.. तू इथे आल्यावर.. हिंडण्या फिरण्यासोबतच तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या...

माझीपण फोटोग्राफी - राम-सीतेच्या स्वयंवराचे ठीकाण भद्राचलम, A.P.

लेखक सातारकर यांनी मंगळवार, 07/07/2009 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
आंध्र प्रदेशमधे हैद्राबादपासून साधारण ३२५ कि.मी वरती खम्मम जिल्ह्यामधे हे ठीकाण आहे. इथे राम - सीतेचे स्वंयवर झाले अशी आख्यायीका आहे. तिथल्या भटजींनी तर सांगितले की आजही तिथे स्वंयवर पद्धतीने विवाह होतात म्हणून. पण ते प्रत्यक्ष पाहायची संधी काही मिळाली नाही. असो, गोदावरी किनार्‍यावरच हे मंदीर बरच जुनं आहे. गोदावरी नदीच पात्र जवळ जवळ १ कि.मी रुंद आहे. तिथे अतिशय शांत वाटत. सकाळी देवळात जाण्यापुर्वी स्नानास जाणारे भक्तगण सोडले तर नदीवर अजिबात वर्दळ नसते. हा भाग नक्षलवाद्यांचा आहे. ह्या भागापासून फक्त ३६ कि.

कॉन्स्टेबलची रामकहाणी

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 07/07/2009 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कुणाचीच कैफियत नाही. हा आहे फक्त एक प्रयत्न, अनेक वर्षे जे पाहिले आणि त्यातुन जे जाणवले, ते शब्दात मांडण्याचा. वाचा, वाटले तर विचार करा, वाटलेच तर नजरेआड करा. माझे असे काहीच म्हणणे नाही. अन्यत्र पुर्वप्रकाशित झालेल्या माझ्याच लेखावर आधारित असे हे लिखाण आहे.) त्याचे नाव बहुधा राम असावे, किंवा रहमत, किंवा रफाएल! रामशरण असेल नाहीतर रणबीरसिंग. असो! आपल्याला काय त्याचे. तसे त्याच्या घरचे लोक आणि काही जिवलग सोडले तर कुणालाच त्याच्या नावाशी काहीच घेणेदेणे नाही.

गुरुवंदन

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 07/07/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वत्साला गाऊली | पांथस्था साऊली बालका माऊली | तसे गुरू आम्हां || निर्धनासी धन | अडाण्यासी ज्ञान दरिद्र्या सन्मान | तसे गुरू आम्हां || अन्न भुकेल्याला | जल तृषार्ताला सुख पीडिताला | तसे गुरू आम्हां || गंध चंदनाला | मधु जसा फुला कंठ कोकिळाला |तसे गुरू आम्हां || पथिका निवारा | नौकेला किनारा संकटी सहारा | तसे गुरू आम्हां || शांत आसमंत | पवित्र दिगंत थोर साधुसंत | तसे गुरू आम्हां || तप्त भुईवर | पावसाची सर भक्ताला ईश्वर | तसे गुरू आम्हां ||

[ मिपा आवडणार्‍यांकरता सप्रेम भेट...:( ]

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 07/07/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ धागा: http://www.misalpav.com/node/8445 मरा मरा चंडाळो, अमिपा हे संस्थळ सर्व सावत्रमायबाप अमिपाकरांचं अत्यंत ऋणी आहे आणि यापुढेही राहील. अमिपाकरांशिवाय अमिपाला शोभा नाही असेही आम्ही वेळोवेळी म्हटले आहे. परंतु असेही काही जण आहेत की ज्यांना मिपा आवडते. हरकत आहे! या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नावडलीच पाहिजे अस्साच काही नियम आहे. पण मग करायचं काय नाही? अमिपा तर काही बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना मिपा आवडते त्यांचा पूर्णत: आदर करून त्यांना अमिपा प्रशासनातर्फे खालील वस्तु सप्रेम भेट देण्यात येत आहे. ती घालायची आणि पाडायचं!

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 07/07/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची (काही सत्य घटनांवर आधारीत) शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती. तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली.