दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' ह्या पुस्तकाविषयी चौकशी
नमस्कार.
मला दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' हे पुस्तक वाचायचे आहे. हे पुस्तक कुठल्या ग्रंथालयात किंवा दुकानात मिळेल? ह्या विषयी माहिती हवी आहे.
धन्यवाद.
वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर
आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो.
रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्हेचे लिखाण केलेले असते.
अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते.
मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे.
'निवृत्ती'
आयुष्याच्या वळणावरचा..
अन्तिम टप्पा सार्थकतेचा!
पुर्णतेचा, परिपुर्णतेचा..
शुचितेचा, सुख-प्राप्तीचा..
उन्नतीचा...निवृत्तीचा !
आयुष्याच्या वाटेवरची...
सर्वोच्च पावती तृप्ततेची!
सुखाची, समाधानाची..
गोडी आगळी कर्तव्यपुर्तीची..
जाणीव सुखाची...निवृत्तीची!
मार्ग जिवनाचा, तृप्त मनाचा..
ऐहिकतेच्या विलोपनाचा!
भौतिकाच्या निरोपाचा..
पारमार्थिक प्रारंभाचा..
वेध तो अद्वैताचा..अनंताचा!
ज्ञानराज माऊली म्हणतसे..
मी वेडा 'सोपान' 'मुक्तीचा'..
हरीने कथिला मज..
मार्ग सुखाचा..
तो एकमेव ...निवृत्तिचा !!
विशाल.
माझे आगामी पुस्तक!!
नमस्कार मंडळी,
धाग्याचे शीर्षक बघून कदाचित तुम्ही विचार केला असेल की नाटक्याने नेहमीचा 'साकीया..." अस नेहमीचा विषय न निवडता असा गंभीर विषय का निवडला? आणि जरी तो तसा असला तरी आत स्वत:च्या पुस्तकाबद्दल लिहीले असेल तर ते कॉकटेल संबधीचेच असावे. खरं तर मला त्या विषयावर पण पुस्तक लिहायची ऑफर आपल्याचा एका मिपाकरांनी दिली होती. तर ते असो..
मी सध्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करायला घेतला आहे.
(गंड)
कार्यबाहुल्या मुळे गेले काही महिने जालावर फारसा वावर करता आला नाही.. आज थोडा निवांत वेळ मिळाला आणि आमच्या गुरुजींना केलेले खोडसाळ गंड काव्य आमच्या वाचनात आले . ते वाचून आम्हाला ही गंड झाला ..
मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!
वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे
चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!
वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे
चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
अलिप्त
का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?
दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?
पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?
रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे
एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ?
का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?
फणसाचे सांदण
जून जुलै महिन्यात घरी फणस पिकून दरवळू लागतात.बाहेरुन काटेरी पण आतून गोड, बरका गरा असा बचक्यात मावत नाही. तो अलगद ओठाशी धरायचा आणि आत ओढून घ्यायचा. शेजारीच ठेवलेल्या खोबरेल तेलाच्या वाटीत हाताला लागलेला चीक पुसत पुसत , एका मागोमाग एक किती गरे फस्त झाले त्याचा हिशेबच उरत नाही. गरे खाउन मंडळी कंटाळली की घरी सांदणांचा घाट घातला जातोच.
तांदूळ भिजवून कोरडे केले जातात. जात्यावर त्याच्या कण्या निघतात. बरक्या गर्यांचा रस काढण्यासाठी बाल गोपाळ चाळण्या घेउन बसतात. बाहेर पावसाच्या सरी कोसळताना गरमागरम सांदणे खाण्याची मजा औरच !!
कोकणात केली जाणारी ही पाककृती.तशी अनवट.
मिसळपाव