लोकहो,
गेले काही दिवस 'मिसळपाव'वर मी सप्तपदी विषयी जी चर्चा सुरू केली होती, तीचा मी आता समारोप करू इच्छितो.
मी ज्योतिषी असल्याने मला पत्रिका जुळविण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळेला माझ्या पाहण्यात आलेल्या गोष्टी अशा की एकतर आधुनिक मुक्त विवाहेच्छु स्त्री लग्ना अगोदर आपल्याला लग्नातून काय हवंय हे व्यवस्थित सांगू शकत नाही किंवा जाणूनबूजून सांगत नाही. लग्नानंतर काय कौटुंबिक जबाबदार्या तिला पेलाव्या लागतील हे समजून घेण्यात आणि प्रत्यक्ष निभावण्यात ती कमी पडते.
यातून धूसफुस आणि चिडचिडीला सुरुवात होते. आपण लग्न करून फसलो ही तिची भावना होते, आपल्या जबाबदार्या ती हळूहळू झटकू लागते.