Skip to main content

मराठी पंचलाईन - मदत करा.

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 08/08/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्ही काही लोक मराठी लिहीलेली टीशर्ट्स विकत घ्यायचं असं ठरवतोय. मात्र ती तशी तयार विकत मिळत नाही असं माहिती पडल्यावर मग ती छापून घ्यावी असं ठरतंय. या संदर्भात मिपाकरांची मदत हवी आहे. खाली दिलेलेले प्रश्न आम्हाला पडलेले आहेत. कृपया मदत करा. १) मराठी केंद्रस्थानी ठेऊन काही पंचलाईन हवी आहे. सध्या तरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा एकमेव पर्याय समोर आहे. कुणाला आणि काही सुचवता येईल का? २) टीशर्टचा प्रकार पोलो आहे. म्हणजे कॉलर आणि शक्यतो डाव्या बाजुला खिसा असावा. (की नसावा? ) ३) रंगसंगती सुचवता येईल का? ४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव?

कभी यह सिनेमा ना देखना..

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 08/08/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडी सिनेमांचा जर्मन रतिब इथल्या टेलिव्हिजनवर, सीडींमधून चालूच आहे अर्थात आता त्याची नवलाई संपली असली तरी कधी तरी एखादा सिनेमा पाहण्याची लहर येते. तसाच परवा त्या जोहरांच्या करणचा 'कभी अलविदा ना कहना..' लागला होता . नेहमीचेच खेळगडी , खानांचा शाहरुख, मुखर्जींची राणी , पिता बच्चनबरोबर पुत्र बच्चन (फ्री), वाडिया की झिंटांची प्रिती इ. इ... सिनेमाचे नाव केकता सारखेच करणही क ने सुरु करतो बहुदा आणि 'म्याच'नेच सिनेमा ओपन करायचा असतो असा त्याचा (गैर)समजही असावा बहुतेक..

मिपाची दुसरी पिढी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 08/08/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे कट्ट्यावर मी दोन प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील दुसर्‍या प्रश्नाचा उहापोह पुन्हा केव्हा तरी. "काय हो, चिरंजीव आज काल तुमची भरपुर काळजी घेतात." म्हणजे काय? मला सांगत होता," तुला उशीर होणार असेल तर बाबांसाठी काहीतरी खायला काढुन ठेव. ह्या आधी असा कधी बोलत नव्हता" हॅहॅहॅहॅ "हसताय काय, हा काय प्रकार आहे ते सांगा बघु" हलकट आणि नीच दुसरे काय. आता ग्रॅज्युएशन पुर्ण होतय ना. बापाने पुढच्या शिक्षणाकरता लागाणारा पैसा पुरवताना हात आखडता घेउ नये म्हणुन मस्का पॉलिश. आणि हे तु मला सांगणार ह्याची खात्री. मला कॅथरीन झीटा जोन्स आवडते.

संगीतप्रेमी विरेन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/08/2009 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो." कुणी तरी म्हटलंय, "जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं." हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश आहे.

उड जायेगा हंस अकेला

लेखक ॐकार यांनी शनिवार, 08/08/2009 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार गंधर्व यांनी गायलेली संत कबीर यांची रचना. उड जायेगा हंस अकेला जग दर्शन क

बायका आणि अंनिस!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 07/08/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज भल्या पहाटे कोकिलकूजनाने झोपेतून जागा झालो. हो, आमच्याकडे बारा महिने उन्हाळा असल्यामुळे श्रावण महिन्यातही कोकिल कूजतात (आणि आमची साखरझोप कुजवतात!!!). तर काय सांगत होतो? हो, जागा झालो, प्रातर्विधी, स्नान वगैरे आटपून आणि शुचिर्भूत होऊन आपल्या मिपामंदिरात डोकावलो. मंदिर पहाटे सुनसान होतं.... लांबूनच गाभार्‍यात डोकावून पहिलं तर श्री नंदनगिरी होडावडेकर स्वामीमहाराज हलक्या आवाजात तत्वज्ञानावर प्रवचन देत होते.... त्यांच्यासमोर चार हलकी मंडळी (वजनाने हो!!) बसून हलक्या आवाजात चर्चा करीत होती....... आता आम्ही पडलो फाटकी मुंडासंवाली सामान्य माणसं! आपल्याला गाभार्‍यापर्यंत कोण जाऊ देणार?

एका बोकडाची टक्कर कथा

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 07/08/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात चारचाकी गाडी चालविणे म्हंजे एक दिव्य गोष्ट झाली आहे. गेल्या चार महिन्यात माझ्या तीन चार मित्रांनी गाड्या घेतल्या; परंतु चार महिनेही त्या गाड्यांची लकाकी टिकली नाही. एक गाडी मागच्या बाजूने चेपलेली, दुसरीच्या दरवाजाला भला मोठा कोचा, तिसऱ्या गाडीला मागचे चाक ते पुढचे चाक असा पाच फुटांचा मोठा स्क्रॅच... तुमच्या लक्षात आलेच असेल... ही सर्व उदाहरणे पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकचे दृश्‍य परिणाम आहेत. पुण्यात चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे एका गाडीला दुसऱ्या गाडीचा ठोसा, हे प्रकार घडतच राहणार.

गीतकार गुलशन बावरा ह्यांना श्रध्दांजली !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 07/08/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिध्द गीतकार गुलशन बावरा ह्यांचे आज वयाच्या ७२व्या वर्षी आजाराने निधन झाले व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला.. ! *उजव्या बाजुचे गुलशन बावरा आहेत ह्यांनी अनेक अमर गाणी दिली त्यातील काही निवड खालील प्रमाणे.... १. मेरे देश की धरती सोना उगले २. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे ३. यारी है ईमान मेरा.. ४. तुम्हें याद होगा ५. चांदी के चंद टुकड़ों के लिए व अशी शेकडो अवीट गाणी ! ईश्वर त्याच्या आत्मास शांती देवो !!!

ठाणे मिपा कटटा १ ऑगस्ट ०९ व्रुत्तांत...(सविस्तर)........

लेखक समंजस यांनी शुक्रवार, 07/08/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे मिपा कटटा १ ऑगस्ट ०९ व्रुत्तांत...(सविस्तर)........ (वि. सु.): १. लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काहि चुका झाल्या असतीलच. तरी कृपया क्षमा करावे. २. संपादकांना ह्या लिखाणात कोठलाहि भाग वगळने किंवा संपादन करणे आवश्यक वाटल्यास तसे जरुर करावे. ------------------------------------------------------------------------------------------- मिपा चा मी नियमीत वाचक. साधारण ५-६ महिन्यांपासून. मिपा हे पहिलेच मराठी संकेत स्थळ जे माझ्या बघण्यात/वाचन्यात आले. मिपा चा शोध कसा लागला या मागे एक रुचकर कारण आहे.