Skip to main content

रोग प्रतिकारशक्ती

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 10/08/2009 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
साथीच्या रोगांमध्ये ज्यांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना त्याचा कुठेनकुठेतरी फायदा होतच असणार. सध्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांकडे लक्ष दिल्यास त्यात ऍन्टी-ऑक्सिडंट्स, भरपूर प्रथिने असलेले आहार, व्हायटामिन्स (प्रामुख्याने सी), व स्वच्छतेची काळजी (आंतर्बाह्य सुरक्षा) हेच उपाय सुचविलेले दिसत आहेत. प्लेटलेटस काऊंट हा एक ह्या चर्चेशी जोडला जाणारा आणखी एक विषय. लढाई करायची तर सैन्याची जादा कुमक असणे महत्वाचे. सध्या आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (बहीण, मामेभाऊ) हे सगळे करत आहोत.

चले जाव!

लेखक विकास यांनी सोमवार, 10/08/2009 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑगस्ट ९. ६७ वर्षांपुर्वी आजच्या दिवशी मुबईतील ऑगस्ट क्रांतीमैदानावर अरूणा असफली यांनी झेंडा उंचावला आणि ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध चलेजाव ची घोषणा झाली. आज हा चर्चा प्रस्ताव केवळ विंदांच्या भाषेत "इतिहासाचे अवजड ओझे घेऊन डोक्यावर ना नाचा" या उद्देशानेच म्हणजे केवळ उर भरून येऊन लिहीण्यासाठीचा नाही आहे. त्यावेळेस कोण बरोबर आणि कोण चूक, चळवळ यशस्वी होती का अयशस्वी वगैरेचा काथ्याकुट करायला देखील नाही आहे.

मॅरेज लाईफ.....१

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 09/08/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो, वेळ आहे का रे या रविवारी?? का रे? अरे आपल्याला एका काम आहे मुंबईत!! मला तुझी मदत लागेल... रविवारी..... ?? बघतो.. बघु नकोस मी वाट पाहतोय. नि तू इकडे येतोहेस हे नक्की. आता हे लक्षात ठेऊन तू बाकीचं प्लॅनिंग कर. अरे पण काय आहे ते सांग ना.. ते नंतर सांगतो सविस्तर बोलू ना आपण.... तरी पण... फोनपेक्षा सविस्तर भेटून बोलू..... पराला निखिलचा अचानक फोन आला आणि मुंबईला का बोलावतोय ते तो सांगायला तयार नव्हता.... काही विचारले तर तू फक्त ये इकडे असं म्हणत होता.. शनिवारी संध्याकाळी निखिलने पराला पुन्हा फोन केला.. उद्या निघतोयस ना पाचच्या बस ने? पाच??? अरे तेव्हा तर माझी मध्यरात्र होते..!!!

गोरख कल्याण

लेखक अन्वय यांनी रविवार, 09/08/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
गोरख कल्याण हा अनेकांप्रमाणे माझाही अत्यंत आवडता राग आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहारात गातात असे म्हणतात. (अचूक वेळ माहीत नाही. याबाबत तात्या अधिकाराने बोलू शकतात.) पण या रागाची सुरावट ही रात्रीच्या वातावरणाला अजिबात पोषक नाही, असे माझे मत आहे. याविषयी कुणाचे म्हणणे वेगळेही असू शकेल. पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो. हा राग मी पहिल्यांदा कोणत्याही मंदिरात वगैरे एकलेला नाही. प्रथम संजीव अभ्यंकरची ध्वनिफित ऐकली होती. त्यानंतर जसराज ऐकले आणि नंतर अनेक गायकांना ऐकले आहे.

स्वाईन फ्लू चा विळखा...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/08/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लू चे आत्तापर्यंत ५ बळी. पुण्यानंतर आता मुंबईतही लागण.. उत्तर न मिळालेले काही प्रश्न - हा रोग असाध्य आहे का? टॅम्लिन फ्लू की कायसं, एवढं एकच औषध उपयोगी आहे का? फक्त हवेतूनच पसरतो की अन्न्-पाण्यातूनही? लक्षणं काय आहेत? कुणीतरी योग्य ती वैद्यकीय माहिती पुरवावी... तात्या.

पुन्हा

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 09/08/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा? वाहती वारे विनाशाचे पुन्हा यायचे नव्हते तुला येथे कधी, का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा? वादळाहातीच ज्याचे होडके, कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा? कोरडे रडणे, उमाळे बेगडी, दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा? सोंगट्यांनी डाव केव्हा साधला? का बदलले दैव फाशाचे पुन्हा? बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

अंनिस व धर्मश्रद्धा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 09/08/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
अंनिस ही विवेकजागराची चळवळ आहे. विवेक ही काही अंनिसची मक्तेदारी नाही. समाजात विवेकाचा विचार सांगणारे संतजन होतेच की. बर्‍याच लोकांना अंनिस ही डामरट वाटते. दाभोलकर म्हणजे अंनिस हे समीकरण रुजण्याच कारण त्यांनी चळवळ प्रसारमाध्यमातुन रुजवण्याचे प्रयत्न केले. खरतर अंनिसचा विचार हा नवीन नाही. बुवाबाजीचा भंडाफोड झाल्यावर लोक बुवा बदलतात पण मानसिकता बदलत नाहीत.

शेयर मार्केट (बेसिक) भाग -२

लेखक दशानन यांनी रविवार, 09/08/2009 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग -१ ******** मागील भागात आपण शेयर्स म्हणजे काय हे पाहीले आता आपण ह्या भागात डिमेट अकाउंट कसे उघडावे व त्यासाठी काय काय करावे व काय पहावे ह्याची माहीती घेऊ. तुम्हाला जर शेयर विकत घेणे असेल अथवा आयपीओ मध्ये शेयर साठी निवेदन करणे असेल तर तुम्हाला एक डिमेट अकाउंटची गरज असते, ते तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे आपले ड्रेडिंग अकाउंट तथा डिमेट अकाउंट ओपन करु शकता.

हिरव्या भोपळ्याची भाजी

लेखक अडाणि यांनी रविवार, 09/08/2009 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
'हिरव्या भोपळ्याची भाजी' शी खुप जणांचे वाकडे आहे. बाकी 'हिरव्या' म्हंटलं कि काहींच्या भुवया वर होतात, भोपळा म्हंटलं कि काहिंची तोंडे वाकडी होतात... परंतु भोपळ्याची भाजी हा माझा खुप आवडता प्रकार आहे ... हि भाजी अशी करावी - साहित्य : अर्धा किलो भोपळा दोन मध्यम हिरव्या मिरच्या (जास्त तिखट पाहीजे असल्यास अजून एक) कोथिंबीर मेथ्या (मेथिच्या बिया) आले (अर्धा चमचा) दोन मोठ्या पाकळ्या लसून अर्धी वाटी सुके खोबरे चवीपुरते मोहरी, हळद, मिठ, गूळ दोन चमचे तेल प्रथम कोथिंबीर व मिरच्या धुवुन घ्या.