Skip to main content

पुरुषांचेही नियम- ही घ्या उदाहरणे

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 14/08/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक खूप फनी फॉरवर्ड आली. त्यात एक ऍटॅचमेंट आहे त्यात लिहीले आहे- "आम्ही स्त्रीयांनी पुरुषांसाठी घालून दिलेले नियम बऱ्याचदा ऐकलेत; आता वेळ आली आहे पुरुषांनी काही नियम करण्याची." पुढे काही नियम आहेत ते भाषांतर करुन त्यातील मासलेदार नमुने येथे दिली आहेत- १. तू जाड झाली आहेस असे तुलाच वाटत असेल तर तू सरळ जाडी कमी करायला सुरुवात करावीस; आम्हाला विचारु नये की, "मी जाड झाली आहे का?" २. डोकेदुखी सलग १७ महिने असेल तर जनरली डॉक्टरला दाखवतात ३. तुला जर काही सांगायचे असेल तर ते कमर्शियल ब्रेकमधे सांगावेस ४. कोलंबसला कोणत्याही दिशादर्शकाची गरज पडली नाही, आम्हालाही ती नसते ५.

नाक

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/08/2009 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचे शीर्षक "नाक" असेच आहे. खरेतर नाक हा मानवी शरीराचा एक ठसशीत अवयव. पण आपण त्याच्या कडे तसे उपहासानेच पहातो. माणसाच्या चेहेर्‍याकडे पाहिल्यावर नजरेत भरतात ते दोन अवयव. डोळे आणि नाक. डोळ्यांबद्दल लोकानी शायरानी फार काही लिहिलय. डोळे जुल्मी असतात , डोळे लबाड असतात , डोळे खट्याळ असतात, डोळे बोलके असतात, डोळे पाणीदार असतात्.....असे बरेच काही. आता पाणीदार हे विषेशण डोळ्यांपणे नाकालाही लागु होते. पण पाणीदार डोळ्याची मुलगी असे म्हंटल्यावर एखादी झाशीची राणी आठवते. तिची करारी मुद्रा नजरेसमोर येते.

राधा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 13/08/2009 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळींना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! From Pandurang" alt="" /> त्या सावळ्या सख्याच्या रंगात रंगले मी त्या साजिर्‍या सुखाच्या स्वप्नात दंगले मी ते स्वप्न सत्य होते, की
काव्यरस

नमन

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 13/08/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे तुला की, तू एकटा न संगे कोणी , दिवस सरता खायला येई , सुन्न भयाण शांतता न कळे काही , त्रस्त तु सर्वथा मग, कर तू , वाच तू, स्मर तू हे नमन , आहे हे तुजकरिता! मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता साथ मिळे तुला , जीवन एक कविता सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता असावी ही , पुस्तकातली परिकथा मग, स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला, हे नमन , आहे हे तुजकरिता!

एक प्रश्न माझाही .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 13/08/2009 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
विमुक्तांचं एक कोडं वाचताना मलादेखील लहानपणी कायम पडणारा एक प्रश्न आठवला. (त्याचं उत्तर मला आजही अज्ञात आहे) प्रश्न असा आहे. पाण्याची रासायनिक संज्ञा आहे H2O, यापैकी ऑक्सीजन हा ज्वलनास मदत करतो आणि हायड्रोजन स्वतःच ज्वलनशील आहे. मग हे दोघेही ज्वलनाला मदत करणारे असे घटक असताना पाणी जळत का नाही? (इथे थट्टेचा विचार नसुन ही एक प्रामाणिक शंका आहे.) विशाल.

लंटनची वारी ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 13/08/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन आय जायंट व्हील ऑन थेम्स.... या जायंटव्हीलचा कारच्या साईड विंडोमधुन काचेआडुन काढलेला हा फोटोदेखील तेवढाच मस्त आला होता. टॉवर ब्रिज....

मी आणि माझा फोन

लेखक अनामिक यांनी गुरुवार, 13/08/2009 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
अबे अभितक तु यही फोन युज कर रहा है, अब तो बदल ले... - एक मित्र जरूरत क्या है? - मी आज कल तो कितने सही सही मॉडेल्स मिलते है... कबतक वही डिब्बा युज करेगा... - एक मैत्रिण वो सब ठिक है, पर मेरे लिये यही ठिक है. और ऑफिसका सेलभी है मेरे पास. - परत मी पर वो भी तो डिब्बाही है.. तु आय फोन, या एल जी व्ह्यु क्यों नही लेता... या फिर ब्लॅकबेरी तो ले ही ले... - दुसरा मित्र कितनी कंजुसी करेगा... नही तो हम सब काँट्री करके तुझे सेलफोन गिफ्ट करते है... - मित्रांपैकीच कुणीतरी अरे लेकीन फोन किसलिये होता है? बात करनेके लिये ना? मेरा डिब्बा वो काम कर लेता है... मुझे नये फोन की जरूरत नही लगती....

भय इथले संपत नाही.

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 12/08/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार पुण्यात स्वाईन फ्लु ने दहावा बळी घेतला असून संपुर्ण देशात एकंदर १७ जण ह्या रोगाला बळी पडले आहेत व अनेक जण उपचार घेत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या १७ पैंकि १३ बळी हे महाराष्ट्रात व त्यातकरून १० पुणे, २ मुंबई व १ नाशिक अशी परिस्थिती आहे. हे सर्व पाहता काहि गोष्टींचा तर्क नीट लागत नाही व बरेच प्रश्न पडत आहेत. १. देशभरात अशी साथ असताना किंबहुना पुण्या आधीच हा रोग हैद्राबाद/बंगलोर अशा ठिकाणी पोहोचला होता तरी देखील जास्त बळी हे पुण्यातच कसे काय पडत आहेत? ससून रुग्णालय खरोखरच नीट काळजी घेते आहे कि नाहि? २.